
विषय : राशी चक्रातील १२ राशींचे वर्गीकरण व प्रभाव (भाग ४)
लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : प्रेडीक्टीव्ह स्टेलर ॲस्त्रोलॉजी रीडर
नमस्कार,
राशी वर्गीकरण भाग १, २ व ३ मध्ये आपण राशींचे १३ विभागात केलेले वर्गीकरण व सकारात्मक व नकारात्मक राशि, उतरी व दक्षिणी, विषुवीय, अयन वृत्तिय राशि,अग्नी, पृथ्वी, वायु, जल राशि, चर, स्थिर व द्विस्वभाव राशी या बद्दल जाणून घेतले.
आज आपण (५) फलदायी व निष्फल राशी (६) मूक राशि (७) हिंसक राशि (८) मानवीय राशि (९) स्वर राशि (१०) चतुष्पाद राशि (११) द्विसंख्या राशि (१२) द्वि तनु राशि (१३) लघु व दीर्घ उदित राशि या बद्दल माहिती घेणार आहोत.
(५अ) फलदायी राशि :
कर्क, वृश्चिक व मीन या राशि फलदायी म्हटल्या जातात. वृषभ, तुळ, मकर व धनु या राशि अर्ध फलदायी राशी आहेत. ५ व ७ वे स्थानामध्ये फलदायी राशि असेल व त्यांचे राशी स्वामी फलदायी राशि मध्ये असेल तर विवाह लवकर होतो. निष्फळ राशि ५ वे लग्न स्थानी असतील (व इतर सूचक ग्रह स्थिती व घटक) हे दर्शवते की, योग्य समयी विवाह होणार नाही. फलदायी राशि ११ व ५ वे स्थानी असतील व त्याचे राशी स्वामी फलदायी राशि मध्ये असतील तर संतती होते.
(५ब) निष्फळ राशि :
मेष, मिथुन, सिंह व कन्या राशि निष्फळ अथवा वांझ राशी म्हटल्या जातात. लग्न स्थानी, ५ वे व ११ वे स्थानी निष्फळ राशि असेल, अथवा त्यांचे राशी स्वामी निष्फळ राशिमध्ये असतील, चंद्र फलदायी राशि मध्ये नसेल अथवा कोणताही फलदायी ग्रह ५ वे व ११ वे स्थानी नसेल, तर संतान योग कमी करतो.
(६) मूक राशि :
सर्व जल राशि कर्क, वृश्चिक व मीन राशि मूक राशि आहेत. जर बुध ६ वे स्थानाचा अधिपती असून २ रे स्थानी मूक राशि मध्ये स्थित असेल आणि बुध कुठेही मूक राशीत स्थित असेल व मंगळ व शनि ने पीडित असेल, तर अडखळत बोलणे, तोतरे बोलणे असू शकते. या वर मंगळाची अशुभ दृष्टी पडत असेल, तर जातक खूप जलद घाईत बोलणारा, बोबडा, चुकीचे शब्दोच्चार करणारा असू शकतो. बुध मूक राशीत चंद्राच्या प्रतियोगात असेल तर वाणी मध्ये दोष असू शकतो. लग्न स्थानी मूक राशीतील शनि वाचा दोष देऊ शकतो. २ रे स्थान स्वर इंद्रिये दर्शवते. जर २ रे स्थानी स्वर राशी मध्ये विशेष करून शुक्र वा बुध कोणत्या अशुभ दृष्टी विना स्थित असतील, तर वक्तृत्वाची अथवा विशेष आवाजाची देण दर्शवते. गुरु सल्ला व उपदेशात्मक आवाज (मग तो व्यवसाय असला नसला तरी) अथवा भाषण देणारा दर्शवतो.
मंगळ व गुरु दृढ़ वक्ता बनवितात व तो व्यक्ति आपल्या उतेजक वाणी द्वारा सभेमध्ये बदल घडवून आणू शकतो. बुध व शनि हे दाखवितात, की ती व्यक्ति काल प्रसंगानुसार वा समूहाच्या मानसिकतेनुसार आपल्या बोलण्यामध्ये बदल वा सुधारणा करतात.
(७) हिंसक राशि :
मेष व वृश्चिक राशि हिंसक राशि म्हणविली जाते, ते भयहीन असतात. हे जातक सर्व साहसी कार्य हिमतीने व आत्मविश्वासाने करितात. हे जातक संकटाचा सामना करण्यास सक्षम असतात.
(८) मानवीय राशि :
मिथुन, कन्या, कुंभ व धनु राशीचा पहिला अर्ध भाग मानवीय राशि मध्ये येतात. यांची राशी चित्रे मानवीय आकृती युक्त आहेत. काही लेखक तुळ राशि ला ही मानवीय राशि मानतात. होरा सार १ ला श्लोक अध्याय ११ मध्ये पृथुयास चे म्हणणे आहे की, या राशि बलवान असतील जर लग्न मानवीय राशि मध्ये असेल अथवा कोणत्याही जातकाच्या कुंडली मध्ये प्रमुखग्रह मानवीय राशि मध्ये नसेल, तर तो सामाजिक नसतो. अधिक मानवीय पण नसतो. जर लग्न अथवा प्रमुख ग्रह मानवीय राशि मध्ये नसेल तर तो जातक स्वतः स्वभावाने विकृत असू शकतो.
(९) स्वर राशि :
मिथुन, तुळ व कुंभ या वायुमय राशि आहेत, त्याना स्वर जथवा संगीतमय राशि म्हणतात. काही पश्चिमी विद्वान कन्या व धनु राशिला स्वर राशि मानतात. काही वृषभला पण मानतात. स्वरा करिता वायुचे माध्यम आवश्यक आहे, म्हणून स्पर वायु राशिना स्वर राशि मानतात.
(१०) चतुष्पाद राशि :
मेष (मेंढी), वृषभ (बैल), सिंह (सिंह), मकर (बकरी) व धनू राशीचा उत्तरार्ध पशुच्या चित्राच्या आधारित चतुष्पाद वा पशु राशि म्हणतात.
पृथुयासच्या अनुसार या राशि जर १० वे स्थाना मध्ये असतील, तर शक्तिशाली म्हणविल्या जातात. जातकाच्या लग्न स्थानी या राशी असतील, तर त्या त्या पशुच्या गुणानी युक्त असू शकतात. सिन्हा प्रमाणे दृढ़, बकरीचाप्रमाणे विलासप्रिय ई.
(११) दिसंख्या राशि :
मिथुन, धनु व मीन या जुळ्या चिन्ह वाल्या राशि आहेत यांना का द्विसंख्या राशि म्हणतात.
(१२) द्वितनु राशि :
राशी चिन्हात मिथुन एक मुलगा एक मुलगी, धनु चा पूर्वार्ध धनुष्य व बाण युक्त व्यक्ती (धनुर्धारी) व मीन राशि दोन एकत्र बांधलेले मासे दर्शवतात. या राशि द्वितनू राशी मानल्या आहेत.
(१३अ) लघु उदीत राशि :
दक्षिण गोलार्धात मकर, कुंभ, मीन, मेष, वृषभ व मिथुन लघु उदित राशि आहेत, कारण या पुष्कळ कमी वेळात उदय पावतात.
(१३ब) दीर्घ उदीत राशि :
उत्तर गोलार्धात कर्क, सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक आणि धनु या राशि अन्य राशिंपेक्षा उशीरा पर्यंत उदित राहतात, म्हणून दीर्घ उदीत राशी मानल्या जातात.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)