ऋतू, मराठी महिना, तिथी, पक्ष, वार व काळ अनुसार जन्मफल


विषय : ऋतू, मराठी महिना, तिथी, पक्ष, वार व काळ अनुसार जन्मफल
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : आपले नशीब आपले ग्रहयोग

नमस्कार,
हिंदू ज्योतिष शास्त्रात इतक्या विविध प्रकारे फळकथन केले गेले आहे, की वाचणारा गोंधळात पडेल की कोणत्या प्रकारचे अनुकरण करायचे. पण ही माहिती नक्कीच काही तत्वांवर आधारित व रसपूर्ण असते, असे निदान मला तरी वाटते. मला तर हा छंदच जडला आहे की विविध ज्योतिष शास्त्रीय माहिती संग्रहित करायची व त्या महितीमागे कोणते तत्व व विचार अथवा कोणत्या ग्रहास नजरेसमोर ठेवून वैशिष्ट्ये दिलेली आहेत. त्यामुळे नक्कीच आपल्या उजाळा मिळतो, काही ठोकताळे पक्के होतात व काही माहिती आपल्या विचारांना नवीन दिशा देते, नवीन पैलू समोर आणते.

आज कोणत्या ऋतू मध्ये, मराठी महिन्यामध्ये, कोणत्या तिथीला, कोणत्या पक्षात, कोणत्या वारी व कोणत्या काळी जन्म झाला तर काय फळ असेल ही माहिती वा स्थूल वर्णन आज आपण पाहणार आहोत.

सहा ऋतू

वसंत : विद्यावान, नृत्य, अभिनय, संगीत मध्ये गती असलेला, सुगंधी द्रव्यांचा शौकीन, दीर्घायू

ग्रीष्म : ऐश्वर्यवान, जलक्रीडा शौकीन, कलावंत

वर्षा : स्त्रियांच्या बरोबर रमणारा, दुधाची आवड

शरद : वात प्रकृती, वाहन सुख, सुखी कामुक

हेमंत : मंत्री, सदैव आनंदी, कर्मयोगी, शेतीची आवड

शिशिर : जास्त भूक, व्यसनी, मिष्टात्र प्रिय

बारा मास

१) चैत्र : कलेत पारंगत, आनंदी, विनयशील, मंत्री, सुखी, वेदशास्त्रनिपुण

२) वैशाख : गुणवान, बलवान, रुपवान, चतुर, धनवान, शास्त्रज्ञ, स्वातंत्र्यप्रिय

३) ज्येष्ठ : उंच, परदेशाची आवड, चंचल वृत्तीचा, मंत्र तंत्र जाणणारा पुत्रवान, श्रीमंत

४) आषाढ : मितभाषी, विलासी, खर्चिक गुरुप्रिय, धनवान्, भोगी, परद्वेषी, कृपाळू

५) श्रावण : मित्रमैत्रिणीत प्रिय देव ब्राम्हण पूजेत रस असणारा ज्योतिषी

६) भाद्रपद : किरकोळ शरीरयष्टी, कल्पना विलासी, फिरणारा, स्वच्छंदी

७) आश्विन : दाता, लोकाश्रयी, सरकारी दरबारी मान, चंचल, स्वजनांचा द्वेषी

८) कार्तिक : धनाढ्य, कुरळे केस, शुर, पुष्ट, विशाल नेत्र

९) मार्गशीर्ष : सुशिल, आस्तिक, तीर्थयात्रेची आवड, देवपूजेत रमणारा, धार्मिक, पितृभक्त

१०) पौष : गुप्त चिता, वडिलांचे धन मिळत नाही, मंत्रज्ञ, गुणवान

११) माघ : बुद्धीवान, यंत्राची आवड, काळानुसार चालणारा

१२) फाल्गुन : कुशल, विलासी, चतुर, गायनपटू, परोपकार करणारा

पक्ष :

शुक्ल पक्ष : धनाढय, कृपाळु, धर्मरत, पुत्रपौत्रवान

कृष्ण पक्ष : शीलवान, प्रसन्न, चंचल, बंधूजनाशी वैर, मातृभक्त

तिथी :

शुक्ल पक्षात व कृष्ण पक्षात प्रत्येकी १५ तिथी असतात.

प्रतिपदा : रूपवान्, गुणवान, धनवान्, उद्योगी, पुण्यवान

द्वितीया : प्रसन्न व्यक्तीमत्व, दयाळू, कलाकार

तृतिया : भित्रा, धनवान्, अतिकामी

चतुर्थी : कृपण, जुगारी, कर्जबाजारी साहसी

पंचमी : कौटुंबिक सुख, राजदरबारी मान सन्मान

षष्ठी : बलवान, शुर, लांब पाय

सप्तमी : ज्ञानी, देवपूजेत रस, विशाल नेत्र, कफ प्रकृती

अष्टमी : दयाळू प्रतिष्ठित, कुटुंबावर प्रेम करणारा

नवमी : बंधूशी वैर, कठोर वचनी, आदर न मिळणारा, नामवंत

दशमी : विनयशील, दानी, देवपूजेत तत्पर

एकादशी : व्रत, दान, जप करणारा, तापट

द्वादशी : जन्मभूमी प्रेमी, दानी, राजाकडून सौख्य, पंडीत

त्रयोदशी : आजानबाहू, उंच, सुस्वरुप, लोभी

चतुर्दशी : शूर, कठोर, पराक्रमी, वाचाळ, रागीट

अमावस्या : पितृ-मातृभक्त, कठोर परिश्रमाने धनप्राप्ती

पौर्णिमा : धर्मशील, कुलवान, सौंदर्यवान

सात वार :

रविवार : क्रोधी, शुर, पित्त प्रकृती, मानी, श्रीमंत

सोमवार : चतुर, नाजुक आवाज, कफ तब्येत, चंचल, धार्मिक, प्रवासी

मंगळवार : धाडसी, संपत्तीवान, तमोगुणी, साहसी बलवान, शेती, यंत्राची आवड

बुधवार : चतुर, सुंदर, व्यापारी वृत्तीचा, एकवचनी, ज्योतिषी

गुरुवार : विद्वान, सर्वगुणसंपन्न, गोड बोलणारा

शुक्रवार : कुरळे, विपुल केस, शुभ्र रंगाची आवड यशप्रिय सौंदर्यवृत्ती,

शनिवार : वादविवाद प्रिय, परधन लुटणारा कृश शरीर, भांडखोर, चिरचिर करणारा, चिकाटीने काम करणारा.

काळ फळ :

पहाट : स्वधर्मप्रेमी, सत्कर्मे करणारा, सुखी, विचारवंत

सूर्योदय – समाधानी

माध्यान्ह : राजतुल्य, गुणवान

अपराण्ह : धनवान

संध्या : सुगंधप्रिय, स्त्रीलंपट, शौकीन

रात्र : खल, क्रूर कृत्ये करणारा, गुन्हेगार वृत्तीचा, साहसी

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment