राशी चक्रातील १२ राशींचे वर्गीकरण व प्रभाव (भाग ३)


नमस्कार,

राशी वर्गीकरण भाग १ व २ मध्ये आपण राशींचे १३ विभागात केलेले वर्गीकरण व सकारात्मक व नकारात्मक राशि,  उतरी व दक्षिणी, विषुवीय, अयन वृत्तिय राशि,अग्नी, पृथ्वी, वायु, जल राशि या बद्दल जाणून घेतले. आज आपण चार, स्थिर व द्विस्वभाव राशी बद्दल माहिती घेणार आहोत.

(४) चर, स्थिर व द्विस्वभाव राशि :

बारा राशींचे चर, स्थिर व द्विस्वभाव राशी असे वर्गीकरण करताना त्यामध्ये समान तत्व अथवा गुण विहीत केलेले असतात. परन्तु प्रत्येक राशिमध्ये हा गुण त्या त्या राशीच्या इतर गुणधर्मानुसार विभिन्न प्रकारे प्रत्येक कार्य करत असतो. हिंदू धर्मात त्रिगुणाची संकल्पना आहे. सत्त्व, रज, तम हे त्रिगुण मानले जातात.

मेष, कर्क, तुळ, मकर या चर राशी रज(राजस) या गुण अंतर्गत येतात.

वृषभ, सिंह, वृश्चिक, कुंभ या स्थिर राशी तम या गुण अंतर्गत येतात.

मिथुन, कन्या, धनु, मीन या द्विस्वभाव राशी सत्त्व या गुण अंतर्गत येतात.

(४अ) चर राशि : चर राशी एका स्थानापासून दुस-या स्थानी फिरणे दाखवते. ज्या प्रकारे एका नदीचे पाणी एका जागे पासून दुस-या जागी वाहून जाते तसे. चर राशि साहस, उत्साह, महत्वाकांक्षा, शक्तिपूर्णता, विकास करण्याची इच्छा, प्रसिदी, मान्यता, योजना पूर्णत्वास नेण्याची क्षमता करण्याची देते. जातक नेहमी काही गोष्टींत बदल व संशोधन करण्यास तत्पर असतो. चर राशीच्या व्यक्ती कामात व्यग्रता, उत्तम व्यापारी, नेतृर्व गुण, स्वप्रयत्नानी आयुष्य घडवणारा, स्वतंत्र व स्वावलंबी असू शकतात.

चर राशि लग्न स्थानाच्या भावारंभी असता डोके, पोट, गुर्दे या बाबतीत सतत सक्रिय राहण्यामुळे पीडा उत्पन्न होते. त्याना डोके तापणे, डोके दुखी, पोटामध्ये विकार, बोटांचे विकार, गुदामध्ये पीडा, सर्दी, संधिवात, डोके व गुडघ्यासंबंधी पीड़ा उत्पन्न होते. चर राशि पीड़ित असेल तर गंभीर आजार उद्भवू शकतो.

चर राशि २ रे स्थानाच्या भावारंभी असता, जातकास नाव, प्रसिद्धी  व जनमान्यते, द्वारे धनप्राप्ति होण्यास  सहाय्यकारी ठरते. हा जातक चेतनाशील व गतिशील असल्याने त्याला क्रियाशीलता, महत्वाकांक्षा व साहस द्वारा अधिकाधिक लाभ प्राप्त करू शकतो, जेथे पैशाचा संबंध येतो, तेथे क्रीयाशिलतेद्वारे भाग्य संबंधी घडामोडी व भाग्य बदलण्याची संभावना वाढते.

चर राशि ३ रे स्थानाच्या भावारंभी असता, जातक चांगली इच्छाशक्ती असणारा, क्रियाशील, महत्वाकांक्षी, साहसी, परंतु परिवर्तनशील असतो. त्याला बदल करणे अथवा प्रवासाची आवड असू शकते. पुतणे, शेजारी, व सर्व साधारण पणे सर्व नातेवाईकाशी चांगले संबंध व संपर्क राखेल.

चर राशीचा जातक पुष्कळ गतिशीलता असल्यामुळे तो मुलभूत कार्य करणारा, नेता अथवा मार्गदर्शक बनू शकतो. हे जातक कोणतेही सामाजिक, राजनैतिक, धार्मिक अथवा शैक्षणिक कार्य हाती घेतले, तर स्वतः शक्तिपूर्णता असल्याने पूर्ण झोकून देऊन व आवडीने करून सफलता प्राप्त करतात. हे जातक अशी कामे करण्यास योग्य असतात, ज्या मध्ये गति, शीघ्रता, बुद्धि, प्रयत्न, युक्ती, कूटनीती ची आवश्यकता असते. हे हाती घेतलेले कार्य पूर्ण होईपर्यंत थांबत नाहीत व कोणावर अवलंबून हि रहात नाहीत. हे जातक जबाबदारीचे व अधिकारयुक्त कामाकरिता सुयोग्य असतात.

जेव्हा जन्म कुंडलीमध्ये अधिकांश ग्रह जर चार राशीमध्ये स्थित असतील अथवा चर राशी केंद्र स्थानी म्हणजे १, ४, ७ व १० वे स्थानी स्थित असतील तर, हे दर्शवितात, की तो जातक प्रमुख स्थिति मध्ये व्यापार, राजनीति, अथवा व्यवसाय मध्ये प्रमुख अथवा उच्च अधिकार पदावर असू शकतो. तो अत्यंत महत्वाकांक्षी उद्योजक असेल व  जो ठरवलेल्या उद्दिष्टावर यश व अधिकार मिळवत नाही तो पर्यंत पूर्णपणे समाधानी असणार नाही. यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन ही पुष्कळ होऊ शकते. जर गुरु ११ वे स्थानी चर राशि मध्ये असला, तर तो प्रशासकीय योग्यता व उन्नति दर्शवितो.

चर राशी केंद्र स्थानी म्हणजे १, ४, ७ व १० वे स्थानी स्थित असतील, तर ती व्यक्ति साधन संपन्न व अतिशय सतर्क असतो. तो कोणतीही कल्पना वा विचार पटकन ग्रहण करतो. साहसी व क्रियाशील, उद्यमशील असल्यामुळे त्याला कोणत्याही कार्यामध्ये सफलता प्राप्त केल्याशिवाय प्रयत्न सोडत नाही. तो कोणत्याही साहसिक कार्यामध्ये सफलता प्राप्त करेल. एक धाडशी, दृढ व कधीहि न वाकणारा उत्साही जातक चर राशी द्वारे दर्शित होतो.

(४ब) स्थिर राशि : स्थिर राशि स्वाभाविक इच्छा दर्शवते. हे जातक दृढ व निश्चित इच्छा ठेवणारे असतात. ते पूर्ण गंभीर असतात. जर ते कोणत्याही कार्यास करण्याचा विचार करतील, तर त्याला धैर्य व दृढतापूर्वक व संयमाने मार्गी लावतील व सफलता प्राप्त होत नाही तो पर्यन्त आपला प्रयत्न सोडत नाही. ज्यांनी याचे प्रेम प्राप्त केले आहे, त्याचा करिता वाटेल ते करण्याची तयारी असते. ते वास्तववादी दृष्टिकोण ठेवतात. पण जर त्यांनी एकदा आपली विचारधारा वा मत निश्चित केली, तर त्यावर ठाम राहतात. मग त्यांचे मत परिवर्तन करणे फार कठिण असतात. पण जर त्याचे कारण त्यांना पटले, तर ते शेवट पर्यन्त तुम्हाला त्यासाठी साथ देतील. ज्या जातकावर स्थिर राशींचा प्रभाव असतो. तो स्पष्टवक्ता, आत्मविश्वासी, विश्वसनीय व धैर्यवान असतो. हे जातक एक दृढ़ व स्वाभिमानी, कठोर व मागे न फिरणारे असतात. ते एक निश्चित दिशा धरून जातील व कोणतेही कारण किंवा तर्क यांना विचलित करू शक्त नाही. त्याची प्रवृति एकातप्रिय आत्मलीन होण्याची असते. यांचे मध्ये एक उत्तम प्रशासकीय योग्यता असते. स्थिर राशि जातक आरामदायक, विलासिता व अन्य शृंगारिक प्रभावामध्ये रमणारे असू शकतात.

स्थिर राशि हृदयास प्रभावित करणाऱ्या पीड़ा व संततीनिर्माण संस्था कुप्रभावीत करते. जुनाट आजार, पेशी बदल वा अंग रोग सूचित करतात. हिस्टेरिया, फुफ्फुसावर सूज, दमा, हृदय रोग, रक्त संचार मध्ये उपरोध, व मणक्याच्या हाडामध्ये दुखणे उत्पन्न करतो. स्थिर राशि पीड़ित असेल तर त्या व्यक्तिस वांशिक व दीर्घ रोग दर्शवते.

स्थिर राशि वाल्या कोणत्याही व्यक्तिस अधिकारपूर्ण प्रभावाने, गुंतवणुकीद्वारे व विना कष्ट प्राप्ति मध्ये लाभ होऊ शकतो. या मध्ये कश्याहि प्रकारे कमतरता येत नाही व स्थिर उत्पन्न मिळत रहाते. स्थिर राशि ३ रे स्थाना मध्ये असेल, तर त्याचा स्वभाव दृढ व कठोर असतो. तो उद्यमी, कठोर परिश्रमी, दुःख सहन करणारा, गर्विष्ठ व अधिकारपूर्ण असु शकतो. त्याला प्रवासाची जास्त आवड नसते. अगदीच आवश्यक असेल तरच प्रवास करू शकतो.

स्थिर राशीचा जातक शासकीय सेवा व प्राचीन संस्था मध्ये, प्रस्थापित व्यवसायामध्ये नोकरी करण्यास प्राधान्य देऊ शकतो. सावकाश, नियमित व स्थिर प्रयत्नानें सफलता प्राप्त होते. स्थिर राशि जातकांना संधि फार सावकाश प्राप्त होते. परंपरावादी, स्थिर विचारधारा असल्याने ते नव्या वातावरणाचा स्वीकार शीघ्र होत नाही व प्रस्थापित व रुळलेल्या गोष्टींना पसंत करतात.

जर गुरु ११ वे स्थानी स्थिर राशि मध्ये असला, तर तो मित्रांमध्ये इर्षा व गर्व दर्शवितो. शनि ११ वे स्थानी स्थिर राशि मध्ये स्थित असला, तर त्या जातकास मित्र द्वारा कोणत्याही कार्यामध्ये बाधा व विघ्न येऊ शकतात.

स्थिर राशि केंद्र स्थानी म्हणजे १, ४, ७ व १० वे स्थानी स्थित असतील अथवा स्थिर राशि मध्ये अधिक ग्रह स्थित असतील, तर तो जातक दृढ़, निश्चित वागणारा, गर्वित व आत्मविश्वासी असतो. तो हळूहळू परिश्रमपूर्वक कार्य करणारा व शेवटी सफलता प्राप्त करेल त्याला कोणताही निर्णय घेण्यामध्ये वेळ लागेल. प्रत्येक काय धैर्यपूर्वक परिश्रम करण्याचा मनोदय राहील. पण त्याचा उत्कर्ष निश्चित व प्रयत्नपूर्वक उद्योग करण्यामध्ये व्हावा हाच त्याचा प्रयत्न असतो. तो आपल्या योग्यताचा उत्तम उपयोग व प्रयोग करेल. अडथळे आले तरी डगमगत नाही. तो कोणत्याही कार्यावर दृढ़ तेव्हांच राहिल, जेव्हा त्याला खात्री होईल, की हे कार्य त्याची इच्छापूर्ति करेल. त्याला परिवर्तित करणे असंभव आहे. पण बदलाचे निश्चित कारण व महत्व पटेल तर, तो विश्वास व मन:पूर्वक परिवर्तन करेल.

(४क) द्विस्वभाव राशि : द्विस्वभाव राशि जातकाची तुलना घड्याळाच्या लोलकाशी करता येईल. जो एक बिंदू ते दुसर्या बिंदू पर्यन्त हेलकावे घेत राहतो. याचा स्वभाव द्वंद्वात्मक व कधी स्थिर कधी अस्थिर असे असते. स्वभावात लवचिकपणा व नरमपणा असू शकतो.

द्विस्वभाव राशि जातक बुद्धिमान, सहानुभूतिपूर्ण, भावुक, सूक्ष्मबुद्धी, चंचल व परिवर्तनशील स्वभावाचा असू शकतो. जन्म कुंडली मध्ये अधिकांश ग्रह द्विस्वभाव राशिमध्ये असल्यास नेहमी अस्थिर, अनिश्चयी, डगमगणारे व व्यग्र स्वभाव वाले असतात. लवचिक स्वभाव असल्याने ते आत्मशक्तिचा पूर्णपणे उपयोग करत नाही.

त्याचा स्वभाव कारण देण्याचा व स्वप्न पाहण्याचा असतो. कोणतेही कार्य योजनापूर्वक कार्य होत नाही व तेव्हाच कार्य करतात, जेव्हा त्याचावर दडपण येते. हे लोक शांतिपूर्ण व सहानुभूतिपूर्ण असतात. व्यवहार मधुर व आनंदमयी असतो. ते कधीकधी दुसर्याचे दुःख पण घेतात. त्याचे कारण मुख्य म्हणजे ते भांडणाचे दुःख सहन करू शकत नाहीत. द्विस्वभाव राशि जातकास स्थाई रूपाने कोणात्याही गोष्टीचे आकर्षण वाटत नाही. परिवर्तन करणे व इकडे तिकडे निरुद्देश फिरण्याचे कारणामुळे कोणतीही दृढ इच्छा होत नाही. द्विस्वभाव राशि मध्ये जन्मलेले जातक श्रीमंत घरातील नसतील, तर स्वत: नोकर ठेवण्यापेक्षा दुस-याच्या अधीन राहून कार्य करतात. ते आयुष्यभर उच्च मार्ग न स्वीकारता नेहमी विलासप्रिय उत्साहहीन होत राहतात.

द्विस्वभाव राशि जातक भावुक असतात व आसपासच्या वातावरणाने भारावून जातात. कारण स्वतःमध्ये दृढ़शक्ती नसते. द्विस्वभाव राशिवाले जातक संयमपूर्वक व नियमित कार्य करण्यायोग्य नसतात. ते अडचणी येताच उत्साहहीन होतात व साधारणश्या कारणामुळे रडवेले होतात. कठिण परिश्रम हे याचे स्वभावाविरुद्ध असल्यामुळे आपल्या विचार शक्तिच्या आधारावर चमकतात. म्हणून ते जेव्हा एजेंसी कमीशन एजेंटचे काम करतात, तर त्यामध्ये उत्तम सफलता प्राप्त होते, ज्या मध्ये अधिक प्रशासनिक कार्य करण्याची आवश्यकता नसते.

द्विस्वभाव राशि जातकास सामान्य कार्य व नोकरी द्वारे प्राप्ति होऊ शकते. त्याचे आर्थिक स्थिती मध्ये उतार चढाव जास्त राहतो. हे जातक आळशी व उदासीन असल्यामुळे धन संपत्ती मध्ये उदासीन राहतात.

द्विस्वभाव राशि जातक फुफ्फुस, अंग, श्वसन अवयव व रक्ताभिसरण ई. संबंधी आजाराची तक्रार करत असतो व याचा आजार नेहमी परिवर्तनशील असतो., त्याला यो हळूहळू बारा करू शकतो अथवा आजारी होउन जाईल हे सर्व त्याच्या मानसिक विचारावर निर्भर राहिल.

३ रे स्थानाचे भावारंभावर द्विस्वभाव राशि असल्यास तो जातक भावूक, प्रणालीयुक्त, वातावरणाचा प्रभावात ताबडतोब येणारा असतो. जर उभय राशिचा संबंध २, ६, १० वे स्थानाशी असेल, तर तो नोकरी करण्यायोग्य असतो. उदा. दलाल, एजेंट, निरोप्या, क्लर्क, शिक्षक, संपादक असू शकतो. पश्चिमी ज्योतिषी एलन लियोच्या मतानुसार हा कधीकधी ते उद्योग दर्शवितो ज्यामध्ये गणवेश धारण करावे लागतात.

१ ले व ७ वे स्थानाचा स्वामी अनुकूल दृष्टिमध्ये असेल अथवा परिवर्तनयोग मध्ये असेल, तर तो पार्टनरशिप मध्ये कार्य करेल व परस्पर संबंध चांगले ठेवेल. जर ११ वे स्थान व त्याचा स्वामी द्विस्वभाव राशि मध्ये असेल तर संशयकारक स्थिती राहते, राशिमध्ये अधिकांश ग्रह या स्थानी स्थित असतील, तर जातक अतिशय चंचल, अस्थिर, भांडखोर, संदिग्ध व बदलणारा असतो. कोणताही विचार पटकन डोक्यात घेऊन  कोणत्याही निर्णयावर येऊ शकतो. दुसर्याच्या सहाय्यताने द्विस्वभाव राशि जातक सफल होती. परन्तु त्याची योग्यतानुसार परिणामच्या अनुसार इच्छित लाभ प्राप्त करू शकत नाही. अस्थिर विचारधारा असल्यामुळे तो मिळणाऱ्या संधी गमवतो.

जर गुरु ११ वे स्थानी द्विस्वभाव राशि मध्ये असेल, तर तो त्याचे मित्र वैज्ञानिक प्रभाव असणारे, धार्मिक प्रवृतिचे असू शकतात. एखादा मित्र अविश्वासू पण असू शकतो.

जर शनि ११ वे स्थानी द्वि स्वभाव राशि मध्ये असेल, तर त्यास आपल्या इच्छेप्रमाणे प्राप्ती होणे कठीण जाईल व मित्र द्वारा दुःख अथवा संकटे येतील.

(टीप : हे वर्णन वर्गीकरण समजण्यासाठी गुणधर्मानुसार केलेले आहे. हे स्थूल वर्णन आहे. व यात स्थित ग्रह, युती, दृष्टी, नक्षत्र स्वामी, चरण, उपनक्षत्रे ई. गोष्टींमुळे बदल होत असतो.)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment