होरा : एक प्राचीन भविष्य कथन पद्धत


नमस्कार,

आपल्या सर्वांनाच हे माहित आहे कि, पृथ्वी स्वत:भोवती साधारण २४ तासात एक प्रदक्षिणा पूर्ण करते. जर  पृथ्विवरून आकाशस्थ राशीचक्राचे निरीक्षण केले असता हे दिसेल की, सर्व राशि पृथ्वी भोवती चक्कर लावतात व राशिचक्राचा तोच भाग पूर्व दिशेत २३ तास ५६ मिनीटे व काही सेकंदाने पुन्हा उदित होतो.

मेष ते मीन पर्यन्त प्रत्येक विभाग जवळजवळ २ तास आकाशात उदित होताना दिसते. हे चक्र अहोरात्र चालू असते.हिन्दू ज्योतिषानी प्रत्येक राशिला २ भागात विभक्त केले आहे व प्रत्येक भाग होरा म्हटला जातो. प्रत्येक होरा पूर्व दिशेला उदित होण्या करिता अथवा माथान्य बिन्दु हून जाताना जवळ-जवळ १ तास लागतो. गंमत अशी कि,अहोरात्र याचा भाग अ आणि त्र काढून टाकल्यावर होरा शब्द तयार होतो. 

विद्वानानी अथक निरीक्षण व अभ्यास करून हे जाणून घेतले की, प्रत्येक दिवस वेगळा परिणाम दर्शवतो. व लोकांच्या कामावर ग्रहाचा असणारा प्रभाव जाणून पैतला, त्यातसुद्धा काही तास काम करण्या करिता लाभप्रद असतात व काही तास कामा करिता अशुभ असतात हे त्यांनी शोधून काढले. भविष्य कथनाच्या या पद्धतीस होरा म्हटले जाते. हिन्दूना हे माहित होते की काही घटिका मधे उन्नति, समृद्धि व सफल कार्य होते पण काही घटिका मध्ये कार्य असफल होते.

दिवसाचे नाव दोन्ही प्रकाश ग्रह  सूर्य व चंद्र व अन्य ५ ग्रहावर आधारित ग्रह प्रभावानुसार ठरवले गेले. उदा – रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार…ई.

ग्रा द्वारा दर्शित फलानुसार पटित होतात म्हणून या दिवसा नाव काही विशेष रूपाने निधारित केले जाई, संभवत:ते प्रभावानुसार रविवारला काही प्रकरणात समृद्धि प्राप्त होते, सोमवारता काही प्रकरणी, अशा प्रकारे फळ निर्धारित केले आहेत. त्यानंतर प्रत्येक दिवशी अथवा वारी सूर्योदयापासून प्रत्येक तासावर कोणत्या ग्रहाचा जसा प्रभाव असतो त्यानुसार होरा स्वामी निश्चित केले गेले.होरा कोष्टक या लेखा सोबत देत आहे.

अचूक प्रभाव कळण्यासाठी त्या त्या दिवसाची सूर्योदयाची वेळ व मध्यान सूर्य यातील वेळ तेवढ्या तासांनी विभाजित केली असता येते. पण सोयीसाठी १ तास वेळ धरली आहे.अनुकूल

येथे प्रत्येक होरा स्वामीची सामान्य फळे देत आहे.

१. सूर्य होरा : राजसेवेसाठीअनुकूल

२. चंद्र होरा : सर्व कार्यांसाठी अनुकूल

३. मंगळ होरा : युद्ध, वादविवादास अनुकूल

४. बुध होरा : शिक्षणासाठी अनुकूल

५. गुरु होरा : विवाहासाठी अनुकूल

६. शुक्र होरा : वाहन सौख्यासाठी अनुकूल

७. शनि होरा : द्रव्य संग्रह करण्यासाठी अनुकूल

अशा तर्हेने तुम्ही याचा दैनंदिन आयुष्यात उपयोग करून घेऊ शकता. समजा विवाहाविषयी एखादी गोष्ट करायची असेल तर एखाद्या दिवशी गुरु होरा किती वाजता येतो त्यानुसार तुम्ही नियोजन करू शकता व अनुकुलता प्राप्त करू शकता.

एखादा विद्यार्थी बुधाच्या होर्यामध्ये अभ्यास करेल तर, त्यास जास्त चांगल्या तर्हेने ज्ञान प्राप्त होईल.

एखादा मुद्दा कोणांस पटवून द्यायचा हे तर मंगळ होरा बघून तुम्ही  अनुकूल परिणाम मिळवू शकता.

अशा र्रीतीने दिवस स्वामी आणि होरा स्वामी दोन्ही अनुकूल असतील तर, जास्त प्रभाव साधता येईल. 

अर्थात हि सर्व सामान्य फळे आहेत, कारण यात त्या त्या वेळेचा ग्राहस्न्चा सर्वांवर होणारा प्रभाव लक्षात घेतला आहे. उदा. सूर्य दुपारी डोक्यावर आला की, उन्हात असणारे सर्व लोकांना उन्हाची झळ जाणवेल, सावलीत असणार्यांना नाही. कोणाला त्याचे तब्येतीनुसार चक्कर येईल, कोणाला नुसता घाम येईल. कारण होरा भविष्य कथन पद्धतीत तुमची कुंडलीतील स्थिती, गोचर ई. गोष्टी विचारात घेतलेल्या नाहीत.

तरी हि पद्धत सोपी असल्याने व गणिताचे फार अवडंबर नसल्याने होरा पाहून कार्य करणारे बरेच जन आहेत.

माझ्या विचारांनुसार ग्रहांच्या कारकत्वाचा व गुणधर्मांचा फार चांगला वापर या पद्धतीत करता येऊ शकतो.

उदा. 

ज्या विवाहित जोडप्यांना संतती हवी असेल त्यांनी शुक्रवारी गुरुचे होराकाळात किंवा गुरुवारी शुक्राचे होरा काळात एकत्र आले तर तो काळ संततीसाठी योग्य असेल. कारण शुक्र वैव्साहिक सौख्याचा व गुरु संतती कारक आहे.

एखादे आधुनिक पती पत्नीस काही कारण वश लगेच संतती नको आहे. त्यांनी शनिवारी बुधाचा होरा बघून, किंवा बुधवारी शनीचा होरा बघून  त्या काळी एकत्र आले तर  गंमत अशी कि, गर्भ संभव होणार नाही व  जन्म नियंत्रणसाठी प्रभावकारी उपाय ठरू शकतो. कारण शनि व बुध दोन्ही नपुंसक ग्रह आहेत. जर कोणी या होरा काळात पिके वा फळे लावतील, तर पुष्कळ कमी उत्पादन होईल, शिवाय पाणी व खत कमी वा जास्त घातल्याने नुकसान होईल.

म्हणून प्रत्येक कार्या करिता हे पाहणे आवश्यक आहे कि शांति, समृद्धि, सफलता, इत्यादि देतो व कोणता नुक्सानदायक आहे. 

जातकास ग्रहाच्या दशा अनुसार अथवा अनुपातिक गौवर च्या अनुसार याचा अनुकूल वा प्रतिकूल प्रभाव जास्त अनुभवास येतो.

माझ्या विचारानुसार यात अजून सूक्ष्मता साधण्याचा तुम्ही प्रयोग करू शकता. त्या होरा स्वामीच्या काळास ७ ग्रहाच्या त्या होरा क्रमाने उपविभाग करू शकता, जो काही मिनिटांचा असेल. पहिला उपविभाग त्या गृहाचा असतो जो होराचा अधिपति घेऊन  नंतर उपविभा त्याच क्रमामध्ये अधिपतित्व मध्ये असतात. 

माझ्या विचार धारेनुसार प्रत्येक होरा स्वामीचा त्याचे वैशिष्ट्यानुसार वापर करून घेता येईल.

(टीप : विविध अभ्यास, शक्यता, विचार मांडले असून विनाकारण प्राचीन ग्रंथ दाखले मागू नयेत व वादविवाद करू नयेत. आपल्याला उपयोगी वाटत असेल तर स्वीकारावे अन्यथा सोडून द्यावे.)

सूर्य होरा :

सूर्य रविवार चा स्वामी आहे, सूर्य होरा तेव्हा अधिक प्रभावी होईल, जेव्हा सूर्य आपल्या उच्चराशि अथवा स्वराशि, किंवा त्याची नक्षत्रे कृतिका, उ. फाल्गुनी, उत्तराषाढ मध्ये गोचरीत असतो, 

सूर्य सजीवत्व व रोगा पासून शीघ्र मुक्त करतो म्हणून औषध देणे अथवा शल्य चिकित्सा करिता अनुकूल.

सुर्य, शक्ति, अधिकार, प्रभाव, मान, सन्मान, व प्रसिद्धी दर्शवितो, त्यामुळे कार्यभार ग्रहण करण्या करिता’ अथवा अश्या लोकांपासून सहायता प्राप्त करण्या करिता सूर्य होरा उपयुक्त ठरेल. वकील, शासकीय अधिकारी, राष्ट्रपति (सूर्य, मंगळ युति), उपराष्ट्रपति (सूर्य, बुध व मंगळ), राज्यपाल, चिकित्सक (सूर्य, बुध, गुरु) सभापति, न्यायाधीश (सूर्य, गुरु, शुक्र), शल्य चिकित्सक (सूर्य, बुध, मंगळ), ठेकेदारी (सूर्य-बुध-गुरु) कोणी सूर्य नारायण भगवान विष्णु उपासना, तोडगे ई. गोष्टी करू शकता.

या प्रमाणे इतर ग्रहांचे कारकत्व, गुणधर्म, रास, नक्षत्र यांची वैशिष्ट्ये याचा अनुभवाप्रमाणे वापर करून होरा अधिक उपयुक्त कसा ठरेल, या विषयी संशोधन करू शकतो.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment