
महर्षी व्यास हे महर्षी पराशर आणि सत्यवती यांचे पुत्र. महर्षी व्यासांचा जन्म आषाढ पौर्णिमेचा. महर्षी व्यासांनी मानवजातीला प्रथमच चार वेदांचे ज्ञान दिले होते, म्हणून त्यांना मानवजातीचे पहिले गुरु देखील मानले जाते. धर्मग्रंथानुसार व्यासांना तिन्ही कालखंडांचे जाणकार मानले जाते आणि त्यांनी महाभारत ग्रंथ, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, अठरा पुराणे, श्रीमद् भागवत आणि अगणित सृष्टींचे भांडार मानवजातीला दिले आहे. वेद रचल्यानंतर ते वेदव्यास म्हणून ओळखले जाऊ लागले.
गुरुपौर्णिमेची प्रथा महर्षी व्यासांच्या पाच शिष्यांनी सुरू केली होती.
वर्षभरात आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते. याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असेही म्हणतात.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य गुरूंची पूजा करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात आणि गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करतात, कारण गुरूच त्यांना अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात.
सनातन धर्मात गुरूंना भगवंतापेक्षाही श्रेष्ठ मानले जाते, कारण गुरू कृपेविना ब्रह्मज्ञान व मोक्षप्राप्ती चा योग्य मार्ग मिळणे अत्यंत कठीण.
गुरुपौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचीही पूजा केली जाते.
या दिवशी गो मातेची पूजा, सेवा अथवा दान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि आरोग्य प्राप्त होते असे मानले जाते. गुरूची पूजा केल्याने कुंडलीत दर्शवली जाणारी गुरु पीडा टळते अशी श्रद्धा आहे.
🙏गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरु: साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः॥🙏
सर्वाँना गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 💐
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)