राशी चक्रातील १२ राशींचे वर्गीकरण व प्रभाव (भाग १)


नमस्कार,
आपण राशी चक्रातील १२ राशींचे वर्गीकरण व प्रभाव वेगवेगळ्या भागात पाहणार आहोत, ज्याचा कुंडली अभ्यास करताना अथवा भविष्य कथन करताना खूप उपयोग होतो.

उदा. सकारात्मक राशी –
जर लग्नरास पुरुष राशि असेल व अन्य गोष्टी देखिल सहाय्यक असतील तर एखाया आधुनिक परिवारा मध्ये जन्मलेली स्त्री देखिल पुरुष स्वरूपाची वाढते. पण पुरुष लग्न राशिमध्ये एखादा अमूक स्त्री ग्रह बसला असेल तर अथवा लग्नेश स्त्री राशि असेल तर स्त्रियोचित गुणवाला पुरुष असतो.

जर ५ व्या स्थानाचा भावारंभ पुरुष राशी असेल व पंचमेश पुरुष ग्रह असून पुरुष राशि मध्ये स्थित असेल तर अधिकांश अपत्ये पुरुष लिंगी असतात अथवा स्त्री राशि असल्यास अपत्ये स्त्री लिंगी असतात. हा सामान्य नियम आहे.

लग्नाचे भावारंभी सकारात्मक राशि चेतना देते व नकारात्मक राशि इतकी बलवान नसते जोपर्यन्त बळी पुरुष ग्रह लग्नस्थानाच्या जवळ नसतील.

पृथ्वीच्या आसपासचे वातावरण आहे त्याभोवती ३६० अंशांत सर्व ग्रह एका काल्पनिक पट्टीमध्ये फिरताना दिसतात. जो राशीमार्ग आहे. हा तो मार्ग हे ज्यामध्ये पृथ्वीवरून पाहिल्यास सूर्य पृथ्वीच्या आसपास फिरताना दिसून येतो, यास क्रांती वृत्त म्हणतात.
राशि चक्र सारख्या १२ भागामध्ये विभाजित केले आहे, सोयीसाठी त्यातल्या पहिल्या भागाला मेष, दुसरे भागास वृषभ या प्रमाणे (१) मेष, (२) वृषभ, (३) मिथुन, (४) कर्क, (५) सिंह, (६) कन्या, (७) तुळ (८) वृश्चिक, (९) धनु, (१०) मकर, (११) कुंभ, (१२’) मीन अशा १२ राशी आहेत.
प्रत्येक सौर्यमान किंवा राशि ठीक-ठीक ३० अंशाचा असतो. राशिचक्रातील प्रत्येक राशिच्या नावाची उत्पत्ति, या मध्ये असलेल्या नक्षत्र समूहाच्या तुलनेनुसार केलेली आहे.

या राशींच्या जड़ किंवा चेतन पदार्थावर पडणाऱ्या प्रभावाच्या आधारावर स्थूल प्रमाणात १३ विभागात वर्गीकरण केले जाऊ शकते.
(१) सकारात्मक व नकारात्मक राशि
(२) उत्तरी व दक्षिणी राशी, विषुवीय राशि, अयन वृत्तिय राशि
(३) अग्नी, पृथ्वी, वायु, जल राशि
(४) चर, स्थिर व उभय राशि
(५) फलदायी व निष्फल राशी
(६) मूक राशि
(७) हिंसक राशि
(८) मानवीय राशि
(९) स्वर राशि
(१०) चतुष्पाद राशि
(११) द्विसंख्या राशि
(१२) द्वि तनु राशि
(१३) लघु व दीर्घ उदित राशि

सोबत एक तक्ता दिलेला आहे ज्यामध्ये १) सकारात्मक व नकारात्मक राशि
(२) उत्तरी व दक्षिणी राशी, विषुवीय राशि, अयन वृत्तिय राशि
याचे विश्लेषण दिलेले आहे, बाकी वर्गीकरण आपण सोयीसाठी वेगवेगळ्या भागांत पाहणार आहोत…

(क्रमशः)……….. पुढील भागात

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment