
विषय : राशीची देवता प्रसन्न करून घेण्याचे मंत्र
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : बापट शास्त्री लिखित रावण संहिता
नमस्कार,
सर्वांनाच माहित आहे की, महाप्रतापी त्र्यैलोक्य विजेता, महापंडित, महर्षि पुलस्त्य यांचा नातू व महर्षि विश्रवा यांचा पुत्र लंकाधिपति दशानन रावण सर्वगुणसंपन्न होते. ज्योतिष- शास्त्रातील प्रकांड पंडित होते; व जप, तप, यज्ञ, अनुष्ठान आदि गोष्टीत पारंगत होते. सखोल ज्ञान, कठोर साधना याचे जोरावर त्याने भगवान शंकरास देखील प्रसन्न करून घेतले होते. भू – स्वर शास्त्रानुसार ८ लाख ८० हजार ७८ वर्ष जुना असलेला रावण संहिता हा ग्रंथ आज देखील तेवढाच उपयुक्त आहे.
त्याच रावण संहितेत राशी ची देवता व त्या देवतेस प्रसन्न करण्यासाठी चा मंत्र दिला आहे. आपल्या माहितीसाठी ते मंत्र येथे देत आहे.
बारा राशींचे तंत्रोक्त मंत्र
प्रत्येक व्यक्तिने आपल्या सोयीनुसार दररोज आपल्या राशीच्या अधिष्ठित मंत्राचा एक माळ जप केल्यास त्याला शुभफल प्राप्ती होते. किंवा संकटाचे ढग आले असतील तर या मंत्राच्या जपाने संकट निवारण होऊन आपण अधिक सक्षम होऊ शकाल.
१) मेष :- आपले मुख्य दैवत हनुमान आहे की, जो अत्यंत बलवान् व भक्तांची संकटे दूर करण्यात मदत करतो. म्हणून प्रत्येक मंगळवारी, गव्हाच्या चपात्या करून गूळ, तूप घालून लाडू (मलिदा ) तयार करावा व त्याचा नेवैद्य दाखवावा म्हणजे मनोकामना पूर्ण होतील.
मंत्र :- ॐ हुं श्रीं मंगलाय नमः ।
जप संख्या – १८ हजार.
२) वृषभ :- आपले मुख्य दैवत कार्तवीर्यार्जुन आहे. जो देवतामध्ये श्रेष्ठ आहे. सर्व प्रकारच्या अडचणी दूर करून सर्व कार्य हे दैवत निर्विघ्नपणे सिद्धिस नेतो. त्याची मूर्ति देवघरात ठेवावी.
मंत्र :- ॐ ह्रीं श्रीं शुक्राय नमः ।
जप संख्या – २१ हजार.
३) मिथुन : मूर्तीची प्रतिष्ठापना करावी व सकाळी मुखप्रक्षालन झाल्यावर पुढील आपले मुख्य दैवत लक्ष्मी आहे. घरात लक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा.
मंत्र :- ॐ ऐं स्त्रीं श्रीं बुधाय नमः ।
जप संख्या ११ हजार.
४) कर्क:- आपले मुख्य दैवत शंकर आहे. नियमित दर्शन घेऊन भोजन करावे. घरात शंकराची मूर्ति स्थापित करावी म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होतील.
मंत्र :- ॐ श्रीं क्रीं चं चंद्राय नमः ।
जप संख्या – ११ हजार.
५) सिंह आपले मुख्य दैवत सूर्य आहे. सूर्योपासना करावी. उगवत्या सूर्याचे दर्शन घेऊन दैनंदिन कामे करावीत. त्यानंतर पुढील मंत्राचा जप करावा म्हणजे त्याचे फळ आपल्या अनुभवास येईल.
मंत्र :- ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः ।
जप संख्या – १० हजार.
६) कन्या :- भगवान् श्रीकृष्ण आपले मुख्य दैवत आहे. श्रीकृष्णाचे ध्यान करावे. पिवळे तांदूळ, पिवळा हलवा याचा नैवेद्य दाखवावा म्हणजे प्रगतीच्या संधि मिळतील.
मंत्र ॐ ह्रीं पीताम्बराय परमात्मने नमः ।
जप संख्या १२ हजार..
७) तूळ :- तूळ राशीच्या व्यक्तिंनी सहकुटुंब प्रभु श्रीरामाची पूजा करावी, म्हणजे फायदा होईल, मिष्ठान्नासह रामाची पूजा करावी.
मंत्र :- ॐ शुं शुक्राय नमः ।
जप संख्या १६ हजार.
८) वृश्चिक :- नरसिंह या राशीचे दैवत आहे. जर शक्य झाले तर नरसिंहाचे दर्शन घेऊन नरसिंह पुराण वाचून पुढील मंत्राचा जप करावा.
मंत्र :- ॐ हुं श्रीं मंगलाय नमः ।
जप संख्या -९ हजार.
९) धनु :- विष्णु हे या राशीचे दैवत आहे. म्हणून या राशीच्या लोकांनी भगवान् विष्णूची उपासना करावी. सकाळी उठल्यावर विष्णूच्या मूर्तीचे दर्शन घेतल्यास लाभदायक ठरेल.
मंत्र :- ॐ बृं बृहस्पतये नमः ।
जप संख्या १६ हजार..
१०) मकर :- मकर राशीच्या लोकांनी गोविंदगोपाळची पूजा करावी. गाईला हिरवे गवत, पेंड साखर टाकून घालावी. कृष्णासह गुराख्यांचेही स्मरण करावे.
मंत्र :- ॐ ह्रीं श्रीं क्रीं धरणीधराय नमः ।
जप संख्या – १७ हजार.
११) कुंभ : कुबेर या राशीचे दैवत आहे. नियमितपणे कुबेराची उपासना करावी. शक्य झाल्यास अमोघ मंत्राचा जप करावा म्हणजे जीवन समृद्ध होईल.
मंत्र :- ॐ ऐं ह्रीं श्रीं शनैश्चराय नमः ।
जप संख्या २० हजार.
१२) मीन :- जगदम्बा ही आराध्य देवता आहे. घरात जगदंबेची मूर्ति स्थापन करावी. पांढरी फुले वाहून तिची पूजा करावी. व नियमितपणे जप करावा म्हणजे समृद्धि मिळेल.
मंत्र :- ॐ ऐं क्लीं बृहस्पतये नमः ।
जप संख्या – १६ हजार.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)