
नमस्कार,
आज आपण ज्योतिषशास्त्रातील बाधक आणि मारक ग्रहांची भूमिका याविषयावर थोडे मंथन करणार आहोत.
जातकास अनिष्ट ठरणारे ग्रह शोधण्याचा प्रत्येक ज्योतिषी आपापल्या परीने प्रयत्न करत असतो.अर्थात जातकास वाईट काळाची पूर्व कल्पना असली, तर तो योग्य ती काळजी घेऊन फळ पूर्णतः नाही तरी किमान काही अंशी त्याची तीव्रता कमी करू शकतो. कितीही भाग्य अटळ, जे घडणार आहे, ते टाळता येत नाही हे कितीही खर्र मानले तरी माणूस असो वा ज्योतिषी असो, त्याने प्रयत्नवादी असायला हवे असे माझे वैयक्तिक मत आहे.
अनिष्टता तपासण्यासाठी, कोणी नैसर्गिक पापग्रहांना व त्याच्या कारकत्वास महत्व देतील, कोणी त्रिक स्थान मानणारे ६ वे, ८ वे १२ वे स्थानावर लक्ष देतील. नक्षत्रचक्र मानणारे चंद्र नक्षत्रा पासून ३ रे विपत्ती दायक, ५ वे प्रत्यरकारक, ७ वे वध नक्षत्र अनिष्ट मानून फलादेश देतील. कोणी या सगळ्या गोष्टी तपासून पाहिलं. वस्तुत: त्रिक स्थानांचे भावारंभ तपासले तर तीच नक्षत्र येतील जी नक्षत्र चक्रात अनिष्ट सांगितली आहेत.
उदा. समजा एखाद्या कुंडलीचे लग्न या भावारंभ मेष राशीत अश्विनी या केतूच्या नक्षत्रात आहे. तर
१) ६ वे स्थानाच्या भावारंभावर कन्या रास व उत्तरा फाल्गुनी हे नक्षत्र येईल जे रविचे नक्षत्र आहे. जे केतुपासून ३ रे विपत्तीकारक असेल.
२) ८ वे स्थानाच्या भावारंभावर वृश्चिक रास व विशाखा हे नक्षत्र येईल जे गुरुचे नक्षत्र आहे. जे केतुपासून ७ वे वधकारक असेल.
३) १२ वे स्थानाच्या भावारंभावर मीन रास व पूर्वा भाद्रपदा हे नक्षत्र येईल जे गुरुचे नक्षत्र आहे. जे केतुपासून ७ वे वधकारक असेल.
आता यात तुम्हाला असे लक्षात येईल कि त्रिक स्थानात ५ वे प्रत्यरकारक नक्षत्र येत नाही, जे नक्षत्र चक्रात अनिष्ट सांगितले आहे. मग ते गेले कोठे? स्वअभ्यास व संशोधन करताना मला ते सापडले मारक भावांत.
हिंदू ज्योतिष शास्त्रात ७ वे व २ रे स्थान सर्व लग्न स्थानांना मारक सांगितले आहेत.
४) २ रे स्थानाच्या भावारंभावर वृषभ रास व कृत्तिका हे नक्षत्र येईल जे रविचे नक्षत्र आहे. जे केतुपासून ३ रे विपत्तीकारक असेल.
५) ७ वे स्थानाच्या भावारंभावर तूळ रास व चित्रा हे नक्षत्र येईल जे मंगळाचे नक्षत्र आहे. जे केतुपासून ५ वे प्रत्यरकारक असेल.
या व्यतिरिक्त हिंदू ज्योतिष शास्त्रात ग्रहांच्या स्थितीच्या आधारे प्रत्येक लग्नांकरिता नियमानुसार बाधक भाव असतात. बाधक भावाच्या स्वामीला ‘बाधक स्थानाधिपती’ असे म्हणतात. चर राशींना ११ वे, स्थिर राशींना ९ वे व व्दिस्वभाव राशींना ७ वे स्थान बाधक सांगितले आहेत.
१) चर लग्नाकरिता एकादश भाव बाधकस्थान म्हणजेच त्याच्या राशीचा स्वामी बाधक स्थानाधिपती असतो.
२) स्थिर लग्नाकरिता नवम् भाव बाधकस्थान म्हणजेच त्याचा राशीचा स्वामी बाधक स्थानाधिपती असतो.
३) द्विस्वभाव लग्नाकरिता सप्तम भाव बाधक स्थान म्हणजेच त्याच्या राशीचा स्वामी बाधक स्थानाधिपती असतो.
बाधक ग्रहांचे नक्षत्रसुद्धा बाधकच ठरते आणि बाधक स्थानाधिपती तथा बाधक भावांतील ग्रहांचे, नक्षत्रांतील ग्रह आपल्या दशा- अंतर्दशांमध्ये कष्टदायक असतात. परंतु जातक पारिजात (अध्याय ११, श्लोक ४८ अनुसार) बाधक स्थानाधिपती त्याच स्थितीमध्ये अशुभ फलदायक असतो, जेव्हा तो ‘मान्दी’ आणि ‘गुलिका’द्वारा अधिष्ठित भावांचा स्वामी असेल.
कृष्णमुर्ती पद्धतीप्रमाणे निर्णय करताना सर्व ग्रहामध्ये ते ग्रह सर्वात अधिक पापग्रह आहेत, जे वरील अनिष्ट स्थानामध्ये स्थित ग्रहांच्या नक्षत्रामध्ये आहेत. त्यानंतर अनिष्ट स्थानामध्ये स्थित ग्रह विचारात घ्यावेत. त्यानंतर अनिष्ट स्थानाधिपती ग्रहांच्या नक्षत्रामध्ये स्थित ग्रह तपासावेत.
तात्पर्य कि अनिष्टता तपासताना या सर्व बाबींचा सर्वंकष विचार करावा. व एखाद्या जाणकार ज्योतिषाकडून मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे उपाय करावेत.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
👍 ha charta jara lakshat nahi ala, jara samjun sangal ka
LikeLiked by 1 person
Kiran Bhatkar tumchya kundalit je sarvat dokyavar, pahile sthan asate tyas lagn sthan mhantat. Tithe ek ank asto e g. 1 asel tar mesh 2 asel tar vrushabh etc. Ti tumchi lagn ras aste. Tithe kontihi ras ank aso tya sthanapasun anticlock wise 1…2…3…4… Ya pramane 12 sthan mojtat.
Donhi chart madhe tumchya lagnarashi samor je grah badhakadhipati, markesh, 6sthesh, 8mesh, etc grah dile ahet tuanchya dasha athva gochar madhe tya grahanchya nakshatra t grah ala ki waait phal milu shakate…
Thodkyat chhoti yukti… Tumhas je Anisht grah sangitle astil tyache nakshatra panchangat kinva Google var aajache nakshtra takle ki milte… Tya divashi sawadh Raha 😊
LikeLike
Thanks for information 🙏🙏
LikeLiked by 1 person
Upyukt mahiti
Ram Krushn Hari 🙏
LikeLiked by 1 person
Khup chan mahiti. Dhanyavaad
LikeLiked by 1 person
Khupach Sundar Ani niswarth pane mahiti dili ahe 👌
Amhala abhyasasathi ekdam upyukt 🙏
LikeLiked by 1 person