
विषय : ग्रह विचार – शुक्र (Venus)
नमस्कार,
आज आपण शुक्रविषयी जाणून घेणार आहोत.
खगोल शास्त्र :
हिन्दू लोक शुक्रास अत्यंत प्रकाशमान ग्रह मानतात. यद्यपि काही महिने सकाळी दिसणारा व काही महिने सायंकाळी दिसणारा हा तारा आहे, पूर्वीच्या काळी काही देशामध्ये असा समज होता की सकाळचा शुक्र व सायंकाळ चा शुक्र वेगवेगळे आहेत. गौरस महान यूनानी गणितज्ञ याने हे सांगितले की सकाळी व सायंकाळी दिसणारा शुक्र एकच जाहेत.
शुक्र प्रातःकाळी तेज चमकणारा दिसतो, जेव्हा गावातील शेतकरी शेतामध्ये त्याचे दैनिक कार्य प्रारंभ करतात व जेव्हा वैदिक ब्राम्हण दैनिक प्रार्थना पूजा ह. प्रारंभ करतात. शुक्र सर्वात अधिक चमकणारा ग्रह आहे.
शुक्र पृथ्वीपेक्षा अधिक सूर्याजवळ आहे, म्हणून कधी शुक्र, पृथ्वी व सूर्य च्या मध्ये दिसेल तर कधी सूर्य पृथ्वी व शुक्रच्या मध्ये असेल. सूर्य व शुक्राचे साधारण अंतर ६ कोटी ७० लाख मैल आहे. विभिन्नता पुष्कष्ठ कमी आहे. कारण शुक्राचा भ्रमण मार्ग जवळ-जवळ गोलाकार आहे. पृथ्वी व शुक्राचे अंतर आंतरिक युतीच्या वेळी २ कोटी ५० लाख मैल असते. शुक्राचा आकार पृथ्वी तुल्य आहे. शुक्राचा व्यास ७६०० मैल आहे, जसे पृथ्वीचा ७९०० मैल आहे. याचा काल २५५ दिवस आहे. शुक्राचे आसपासचा वायू मंडळाचा पट्टा विशेष प्रकारचा व प्रभावशाली आहे, शुक्राची चमक या वायु मंडळाच्या परिवर्तन शक्ति मुळे आहे.
पृथ्वीवरून पहाणा-याला शुक्र सूर्याशी कधी पण ४८ अंश अधिक दूर नाही दिसू शकत. म्हणून शुक्र जेव्हा सायंकाळचा तारा असेल व सूर्यापासून ४८ अंश दूर असेल तेव्हा सूर्यास्तानंतर आपण त्याला आकाशामध्ये ३ तास १२ मिनीटे चमकताना पाहू शकतो.
पौराणिक कथा :
शुक्राला प्रेम विवाह, सौंदर्य व ऐषोआराम ची देवी म्हटली जाते. ही महालक्ष्मी, विष्णुची पत्नी म्हटली जाते. शुक्रास काणा (एका डोळ्याचा ही म्हटले जाते, त्यामुळे शुक्र खराब स्थित असेल तर जातकाचे नेत्र प्रभावित होतील.)
राजा बली चक्रवर्ती पृथ्वी व स्वर्गाचा राजा होता. देव व इंद्राने भगवान विष्णुची प्रार्थना केली कि त्यांना महाबलीपासून मुक्त कर, म्हणून भगवान विष्णुने वामन अवतार घेतला. हे राजा बलीजवळ गेले व त्याचेकडे तीन पावले जमीन मागितली. बलीचे गुरु शुक्राचार्य बुद्धिमान होते. त्यांना भगवान विष्णुची चालाखी लक्षात आली व राजाची मागणी स्वीकार करण्यापासून परावृत करू लागले. परंतु राजाने वामन रूपी भगवान विष्णु जे दान स्वीकारण्यासाठी पाणी सोडू लागले, तेव्हा शुक्राचार्य माशी बसून आपल्या एका डोळ्याने पाण्याचा पात्राच्या नळा मध्ये प्रवेश करून पाणी थांबविले. भगवान विष्णुने चा-याचा एक तुकड़ा घेतला व अडथळा दूर करण्याकरिता शुक्राचार्य यांच्या डोळ्यात घातला. अश्या प्रकारे शुक्राचार्य यांचा एक डोळा गेला अशी आख्यायिका आहे.
शुक्र यजुर्वेद व वसंत ऋतू चा स्वामी आहे. शुक्राला ‘काम’ म्हणतात. कारण कामुकता शुक्रावर व त्यावर पडणाऱ्या दृष्टि वर निर्भर करते, व हा भावना व चरित्राशी संबंधित आहे.
ज्योतिष शास्त्र : शुक्र स्त्री ग्रह आहे. हा वृषभ व तुळ राशिचा स्वामी आहे. ज्या राशि चक्रातील दूसरी व सातवी राशि आहे. वृषभ ही पार्थिव राशि व स्थिर राशि आहे. तूळ वायु व चर राशि आहे. स्त्री ग्रह असल्यामुळे का सभ्यता व संस्कृतपणा, पसन्नता दर्शवितो हेच कारण आहे की शुक्र जातक व्यक्ति दयाळू व सामाजिक असतात. वृषभ हे दाखविते की जातकाची मुखाकृति हसतमुख, व सुंदर असते, कारण ही राशि चक्रातील दुसरी राशि जाहे, द्वितीय स्थान गाल, डोळे इत्यादि दर्शवितात.
तुळ हे दर्शविते की जातकाचा आकार सुडौल व व्यवहार सभ्य असेल. कोणत्याही किंमती वर शांति स्थापित करणारा, संकुचित डोळ्याचा, सुखी व अनुकूल वैवाहिक जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करणारा असेल. त्याचे आनंदी व्यक्तित्व, शांतिप्रियता दुस-याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकणे, संशोधित स्वभावद्वारे दुस-याची व्याकुळता कमी करतील, त्याचा व्यवहार बदलतील व हे सिद्ध करतील की ते वास्तविक निर्माता आहेत. शुक्र परिवारचा सर्वसहाय्य प्रति पुढाकार दर्शवितात, मग कोणतेही नाते असो, तुला राशि चक्राची सातवी राशि असल्याने शुक्र प्रेम दर्शवितात. ज्योतिषी मेस्त हेन्डलचे म्हणणे आहे की, शुक्र अभिमानी नसतो, वागण्यात दिखावा वा स्वार्थ नसतो. उलट सत्य प्रेमी असतो, सर्व वस्तुंशी प्रेम करतो, विश्वास करतो व सर्व सहन करतो.
शुक्र मीन राशि मध्ये उच्च असतो. मूल त्रिकोण राशि तुळ आहे. हा कन्या राशि मध्ये नीच असतो. मेष, वृश्चिक राशि या करिता हानिकारक आहे.
मीन राशि चक्राची बारावी राशि आहे. बारावे स्थान शयन सुखाचा, संभोग आनंद दर्शवितो. म्हणून एखाचाचे जन्म कुंडली मध्ये बली शुक्र या गोष्टीचे प्रमाण आहे की, जातक पुष्कळ लवकर विपरित लिंगाकडे आकर्षित होईल व इंद्रियसुख कारक सर्व गोष्टीचा कडे आकर्षित होईल. मीन द्विस्वभाव राशि जाहे म्हणून जातक अनेक व्यक्तींशी संबंधित असेल. हा या बाबतीत एकदम अग्रेसर असतो, जेव्हा ते मंगळ व शनि दोन्ही ग्रहाशी युती मध्ये वा दृष्ट असेल, कारण मंगळ त्याला प्राप्त कार्याचा अवसर, साहस प्रदान करतो व शनि मानव निर्मित नियमाशी अलग वागवतो.
वृषभ मध्ये चंद्र उच्चचा असतो, जेव्हा की तुळ मध्ये शनि उच्चचा असतो. वृषभ मध्ये ग्रह नीचचा नसतो, पण तुळ मध्ये सूर्य नीचचा असतो. हे प्रमाणित आहे की शुक्र इह लोकांच्या सुखा करिता आहे. व जातकास सर्व सुविधा प्रदान करतो. योग्यता प्रदान करतो ज्यामुळे तो सुखी जीवन व्यतीत करतो.
शारीरिक आकृति :
शुक्र साधारण उंची, मनुष्यास जाड़ शरीर, गोल व गुबगुबीत चेहरा, अंडाकार व आकर्षक चेहरा, चमकदार दयाळू व सुखदायक डोळे, आनंददायक वाणी, मधुर हास्य, कुरळे केसवाली व्यक्ति दर्शवितो. जर शुक्र पीडित असेल तर तो कमी सुन्दरता प्रदान करतो. सामान्यपणे शुक्र जातक एखादे प्रतिस्पर्धा मध्ये विजय प्राप्त करतात. विशेष रूपाने जेव्हा ते आतिथ्य विभागा करता, प्रायवेट सेक्रेटरी, विक्रेता, प्रचारक ई कार्यरत असतात. ह्या व्यतिरिक्त स्वयंवर सारख्या प्रतियोगिता मध्ये विजयी होतात.
शरीराचे अंग : डोळे, जननेन्द्रिय प्रणाली, गळा, हनुवटी, गाल, इत्यादि,
रोग :
डोळ्यांचे विकार , मोतीबिन्दु, सर्दी संबंधी रोग, चर्म रोग, सूज, गाठ, एनीमिया, रक्ताची कमतरता, अतिरिक्त खानपान मुळे होणारे त्रास, अधिक आनंद करिता परिणामस्वरूप होणारे रोग, ज्यामध्ये सूज व उष्णता संमिलीत होत असते. जर सूर्य व शुक्र पीडित असेल तर डोळ्यात दोष उत्पन्न होईल. जर एखादे कुंडलीमध्ये मंगळ, चंद्र व शुक्र पीडित असेल तर स्त्री जातकास अनेक दिवस पर्यन्त अधिक मात्रामध्ये मासिक धर्म होतो. जर शनि पीडित असेल तर तो रक्तस्त्राव कमी होती परन्तु पाळीच्या वेळी पहिले व नंतर छातीजवळ, पोटा खालील भागी दुखेल. जर बुध शुक्रास अर्धं केन्द्रीय दृष्टिच्या अर्धं केन्द्रीय दृष्टिमध्ये पीडित करीत असेल, तर तो जातकास नाडीमंडळ मध्ये दोष होईल, ज्यामुळे हिस्टेरिया संभवतो.
शुक्र त्वचेची सुन्दरता दाखवतो. जर शुक्र केतुशी पीडित असेल तर जातकास एक्जीमा, कोड वा श्वेत रोग होईल. म्हणून शुक्रावर प्रतिकूल दृष्टिने विचार करताना आजाराच्या स्वरूपाचा निर्णय करावयास हवा.
एखादे वाहनामध्ये अपघात, वायुयान दुर्घटना, बैलगाड़ी वरुन निघून जाणे, सायकल अपघात इत्यादि मध्ये जखमी होऊ शकतो. हे शुक्र द्वारे दर्शित पशु-पक्षी मुळे होऊ शकतो. उदा. चित्ता, गाय, म्हैस, बकरी हत्यादि. हे लोक कबूतर मोर, गोरक्ष पक्षी हत्यादि पशु-पक्षिना पाळण्याचा छंद ठेवतात.
स्थान : शयन कक्ष, नृत्य, उपहार कक्ष, सिनेमा थिएटर, नाट्य गृह, बगीचे, चिकित्सालय, फव्वारे, भोजनालय, अत्तर निर्मिती कारखाना, स्वयंचलित, औद्योगिक स्थान, जहाज व बंदर, एरोड्रम, केमिकल उद्योग, रेशिम व रेशिम उद्योगाचे स्थान, अभ्रक खाण, जर शनि शुक्र च्या जोडीस, दृष्टीत असेल तर काच निर्मिती उद्योग इत्यादि.
राजनैतिक : युद्ध विराम, शांति, देशामध्ये समृद्धि, बंधने किंवा परमिट ची अधिक आवश्यक्ता नाही, परन्तु स्वतन्त्र व्यापार चे अवसर, यातायात, जहाज, रेल्वे इत्यादि करिता अनुकूल नियम, रेशम वस्त्र, रैयान, श्रृंगार साधन, सुगंधित वस्तु, अभ्रक, केमिकल्स, सिनेमा, फिल्म, स्त्री कल्याण, हत्यादि विस्तार कार्यक्रम नियति सुविधा.
आर्थिक : संतोष जनक लाभांश, हिस्सेदार व शेअर होल्डर मध्ये उत्तम संबंध, बोनस, शेअर देणे, उद्योग विकास व चांगली समृद्धि, शेअरच्या किंमती मध्ये वृद्धि, शुक्र द्वारे दर्शित वस्तुचा व्यापार ई.
उत्पादन : सुती वस्त्र, रेशिम व रेयान च्या तयार वस्तु, चांदी, तांबे, काच, अभ्रक, श्रृंगारिक साधन, सुगंधित वस्तु, सौंदर्य प्रसाधने, फोटोग्राफ, फिल्म, स्त्रियांकरिता होजियरी, कन्फेक्शनरी, चंदन तेल, फळ-फूल, साखर, कैमिकल्स, रबर, कार, जहाज, वायुयान, कशिदाकारी, शिवण मशीन, संगीत वाद्य, रेडियो, रंग, दूध, पैट्रोल, कापूस, चमेली, कस्तूरी, जायफळ, मसाले, चटण्या, अशोक वृक्ष, पांढरी खसखस, अश्वरोह, अंजीर, सफरचंद व सर्व रसदार स्वादयुक्त फळे, रबर, तंबाखू इत्यादि.
व्यवसाय : संगीतज्ञ, खेळाडू, सिनेमा एक्टर, सिनेतारका, फिल्म निर्माता, नाटक संबंधीत, वाद्य विक्रेते व उपयुक्त सर्व वस्तु उत्पादनाचा व्यापारी, यातायात, स्वचलित उद्योग, रेल्वे, मोटार, टैक्सी, वायु, जहाज, खाद्य विभाग, पशु चिकित्सा, कृषि, राज्य, चहा, कॉफी, रबर इत्यादि, चष्मेवाला, काच, अभ्रक, प्लास्टिक,
ड्राय मटर, दर्जी, पेन्टर, सराफ, खेळाडू, कशिदाकारी, मेकअप, ड्रेस, इ. सेवा करीत असेल. व्हायोलिन, पूंगी वाजविणारा जर द्वितीय स्थान बलवान असेल व शु व्यवसायास इंगित करीत असेल तर तो संगीतज्ञ, गायक अथवा कवि असेल कारण शुक्रास कवि म्हटले जाते.
जर तृतीय स्थानाचा संबन्ध नैपच्यून व शुक्राशी असेल तर (शुक्र जर एखायाचा व्यवसाय दर्शित करीत असेल तर) तो तार वाल्या यंत्राचा उपयोग करेल. जर लघु उदित राशि जशी कुंभ असेल तर तो वायलिन वादक होईल. परन्तु जर हा मिथुन वा तुळेचा असेल तर दीर्घ प्रदीप्त राशि आहे तो हा विणा वादक होईल. जर शुक्र तृतीय अथवा नवम स्थानी असेल तर बुध या शुभ दृष्टि मध्ये असेल तर (18, 30, 36, 60 अंश) व जर वायु राशि मध्ये असेल तर तो बासरी अथवा नाद स्वरम मध्ये निपुण असेल. लघु उदीत राशि कुंभ बासरी करिता इंगित करतो. दीर्घ उदित राशि नादम्बरम इंगित करतो, जलराशी चांगली कल्पना शक्ति देती व जातक जलतरंग मध्ये रुचि ठेवणारा असतो.
बली मंगळ शुक्राशी शुभ दृष्ट असेल तर हा दर्शवितों की गतम मध्ये निपुण असेल, शनि, शुक्र, मंगळ दर्शवितों की तो मृदंग मध्ये निपुण असेल कारण मंगळ परिश्रम चा दर्शक आहे, शुक्र त्वचे करिता, शनि मृता करिता, म्हणून शुक्र व शनि चामड्या करिता असतो. म्हणून हा योग त्याचे करिता आवश्यक आहे. अश्या प्रकारे व्यापाराचा धंदा, ज्यामध्ये कोणी निपुण असेल हे दाखविले जाऊ शकते.
अधिपतित्व : शुक्र विवाहाचा प्रमुख अधिपति ग्रह आहे. ती दर्शवितों की जातक प्रेमा मध्ये विश्वसनीय आहे व जीवन साथीला सुख प्रदान करेल. जर कोणी व्यक्ति दुःखी व अविश्वसनीय असेल त्याचे वैवाहिक जीवन पृथ्वीवर नरकाचे समान असेल.
शुक्र व्यापारा मध्ये सर्वांना दर्शविते जर एखादे कुंडली मध्ये त्याचा संबंध 2, 6 व 10 वै स्थानी असेल, शुक्र वाहनाचा प्रमुख कारक ग्रह आहे. चतुर्थ स्थान व शुक्र एखादे व्यक्तिची वाहनाची सुविधा दर्शवितात, हे वाहनकारक आहे, शुभ मातृकारक आहे (चतुर्थ स्थान ज्याचा स्वामी पण माता दर्शवतो).
शुभ रंग : पारा, क्रिम, हस्तीदंताचे सामान
शुभ अंक : 6, 15, 24, 33, 45, 51,
शुभ दिवस: शुक्रवार.
शुभ धातू व खडा : तांबे, चांदी, पितळ, हस्तीमणी, मूंगा, हीरा, जिप्सम
शुभ नक्षत्र : ज्या दिवसामध्ये चंद्र भरणी, पूर्वा, फाल्गुनी व पूर्वाषाढा नक्षत्रा मध्ये असेल.
शुक्र वर दृष्टया व संशोधन :
सूर्याची शुक्र मध्ये शुभ दृष्टि : ज्याचा शुक्र अधिपति ग्रह आहे सूर्य शुक्र मध्ये शुभ दृष्टि बनवितो, हे दर्शवतों की जातक समाजास प्रसन्न करण्याकरिता आनंद, सरळ, जीवन, आराम, विलासिता, क्लब, सोसायटी, मनोरंजनाचे स्थळ, इत्यादि जातक विशेष रूपाने, वा भिन्न लिंगी व्यक्ती बरोबर रहाण्याचा शौकीन असेल. तो अतिथी सत्कार करणारा असेल. हा उदार, नम्र व प्रसन्नचित स्वभाववाला व कलात्मक स्वभाव देतो. हा व्यक्तिला कला, संगीत व कविताचा शोकीन बनवितो. हा विशुद्ध वैवाहिक सुखाचा साक्षी आहे, जर शुक्र एखाद्याची कमाई दर्शवितो, तो शुभ दृष्टि होण्यामुळे व्यापारातील भागीदार, पति या पत्नी, व्यवसाय, सट्टया- मुठे चांगली प्राप्ति व उच्च जनकार्यालया प्रगती मध्ये होते.
साहसी कार्यामध्ये प्राप्ति मध्ये वृद्धि व स्तर वृद्धि मध्ये नवे नवे अवसर प्राप्त होतील व सफलता प्राप्त होईल, जातक सर्वांशी चांगले सम्बन्ध द्वारा सुखी होईल. शुम दृष्टि असल्यावर हे निश्चित जाहे की जातक एक सफल इंजीनिजर, व फिल्म फायनेन्सर होईल,
सूर्य व शुक्र पूर्ण युति मध्ये असेल व ५, ७, ९ वे स्थानात असेल तर पत्नीचे वा स्वत:चे प्रजनन प्रणाली मध्ये अंगामध्ये दोष असेल. प्रतिकूल दृष्टि असेल तर तो दर्शवितों की जातक स्वभावाचा रसिक असेल. विवाह मध्ये उशीर अथवा निराशा प्राप्त होईल, सुखी व वैवाहिक जीवन प्राप्त होणार नाही. शुभ दृष्टिबै सर्वं शुभ फल प्राप्त होणार नाही व त्याचे विपरित फल प्राप्त होईल. पारिवारिक जीवन सुखी होणार नाही. काही करता ही एक समय्या होऊन बसेल.
उपरोक्त परिणाम त्याची परस्पर दशा, युति व अंतर च्या वेळी असतील. जर सूर्य विवाहाचा कारक असेल तर जोडीदाराचे नक्षत्र कृतिका व पूर्वाफाल्गुनी असेल.
चन्द्राची शुक्रावर शुभ दृष्टि : व्यक्ति ज्याचेवर शुभ दृष्टि असेल व शुक्र त्याचा अधिपति ग्रह असेल, तर शुक्राची राशि वा लग्न मध्ये बली द्वारे जन्म असेल तर तो चांगले विशुद्ध स्थान वाला असेल तो कला विकासाचा वेडा असेल, त्याचा स्वच्छ पेहराव फार सुंदर दिसेल व काही मात्रामध्ये सुगंधित अत्तर, पावडरचा प्रयोग करेल, तो संगीताचा शौकीन, आनंद, थिएटर, सिनेमा, ड्रामा व अन्य मनोरंजन चा शोकीन असेल.
तो प्रेमी व आकर्षक, सभ्य व सुशील, सामाजिक, व सहानुभूतिपूर्ण होतील. तो भिन्न लिंगी व्यक्ति संगतीत सन्मानित होईल. चांगली प्राप्ति असेल. आई व पत्नी दोन्ही व्दारे पिढीजात धन प्राप्त करेल. विलासिता, बहुमूल्य वस्तुवर अधिकार होईल, फर्नीचर, वाहन ई युक्त असेल. साधारण पणे बुद्धि व कल्पनाशक्तिचा विकास होईल. सुखी व अनुकूल जीवन बनून राहिल. त्याचे मामल्या मध्ये ही म्हण खरी ठरेल, की पोशाख ज्याचा तो चालेल व दुनिया त्याची जो आनंद उचलेल. त्याची प्राप्ति लोकांना एक रूचकर व आवश्यक्तानुसार भोजन देण्यात, सुगंधित वस्तु निर्मित करण्यात, रेस्टारेन्ट बोर्डिंग व लॉजिंग भवन अथवा अत्तरचा व्यापारी, संगीत, सिनेमा, पैट्रोल, यातायात, जहाजराणी, कार्य द्वारे संतोषजनक असू शकते. जातक व्यवहारामध्ये असावधान राहिल, जोडीदारा द्वारे अनिष्ट हार्दिक संबंध राहतील, ते कलंक व अप्रतिष्ठाव्दारे पीडित होणार नाही. जर चन्द्र विवाहाचा दर्शक आहे तर तो जोडीदार रोहिणी नक्षत्राचा असेल व २३ मे पासून ६ जून पर्यन्त (जेव्हा सूर्य रोहिणी मध्ये) असेल हा काळ चांगला असतो. विपरित दृष्टिचा अत्याधिक अवांछित फळ प्रदान करेल व जातकाला भयानक अडचणीने त्रस्त करेल.
मंगळाची शुक्रावर शुभ दृष्टि: मंगळ मेष व वृश्चिक राशिचा स्वामी आहे जेव्हा’ कि शुक्र वृषभ व तुळेचा स्वामी आहे. दोन्ही एक दूसरे विपरित आहे, कारण दोन्ही ग्रह गुण परस्पर विरोधी आहे. मंगळ, दृढ सैनिक व शीघ्रता करणारा असल्याने दर्शवितो, जेव्हा कि शुक्र शांति अनुकूलता, नम्रता व विजय दर्शवितो. म्हणून तो दृष्टि दर्शवितों को जातक, विनयशील, आनंदी, उत्तम व्यवहार व व्यक्तिगत सुन्दरता ने सर्वांना आकर्षित करेल. हा हिम्मत व विश्वास प्रदान करतो. जातक साहसिक कार्याचा शौकीन, रसिक व महत्वाकांक्षी असेल, वाद्य मध्ये तो कुशल असेल, मोटर कारचा, व्यापारच्या शोकौन असेल. ती अतिव्ययी पण असू शकतो.
मंगळ शुक्रावर दृष्टि टाकतो, तर कमविण्याची क्षमता व योग्यता अधिक असेल, शनिची शुक्रावर दृष्टि असेल तर त्याची शिल्लक मुळीच पडणार नाही. मंगळ पर्याप्त शक्ति, अधिकार, उत्तरदायित्व, कुशलता, दबाव व क्रियाशीलता प्रदान करतो. जर बुधाची शुभ दृष्टि टाकत असेल तर जातक विज्ञापन, शौ-प्रचार खर्चाची पर्वा करणार नाही. तो अधिकाश क्लब सोसायटीचा सदस्य असेल, तौ खेळाद्वारे चांगला लाभ प्राप्त करेल. एक उत्तम खेळाडूचे रुपाने ने कोणत्याही कार्यालया मध्ये लायक पद पण प्राप्त करू शक्तात. यद्यपि ते त्याची योग्यता ठेवू शकणार नाहीत. प्रायोगिक, कलात्मक योग्यता अथवा मैकेनिकल, स्वयंचलित इंजीनिरिंग, टेलरिंग, गाणे, नृत्य, सिनेमा, थिएटर, पालक, फिल्म निर्माता, विक्रेता, ड्रेस, जवाहरात, दागिने, हीरे, वस्त्र, फोटोग्राफी, कृषि व चहा बागायत इत्यादि.
मंगळाची शुक्रावर पीडित दृष्टि असेल तर जातक अनैतिक जीवन व्यतीत करितो, परन्तु विरोध, द्रोह, हव्यास उद्वेग जनक होतील व जीवन सुखी होणार
नाही व विलासाची भावना नियंत्रण मध्ये राहणार नाही. हिंसक कामाद्वारे वियोग, व भांडण होउन त्याचा अंत घटस्फोट मध्ये होऊ शकतो. शनिची वाईट दृष्टि पडत असेल तर तो व्यक्ति जापल्या जीवन साथीची हत्या पण करू शकते. स्त्री पासून कष्ट, अत्याधिक घुमाव, कुस्वभाव, धनहानि, कलंक व बदनामी हे प्रतिकूल परिणाम होतात. काहींचा वाहन द्वारे मृत्यु होतो.
चांगली दृष्टि असेल व मंगष्ठ विवाहाचा दर्शक असेल तर नक्षत्र, मृग पूर्वार्ध, अथवा चित्रा उत्तरार्धं मध्ये जन्म होऊ शकतो. म्हणून शुभ वेळ २५ एप्रिल ते १० मे, ९ जून ते १४ जून व १७ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर पर्यन्त असू शकतो.
बुधाची शुक्रावर शुभ दृष्टि में बुध व शुक्र कधीही ७६ अंशापेक्षा अधिक दूर होणार नाही. म्हणून ते काही दृष्टि बनवतिल, जै परिणाम देण्यामध्ये सामान्य आहेत. केन्द्रीय व त्रिकोण जसे शक्तिशाली दृष्टि बनवू शकत नाही.
शुभ दृष्टि जातकास चांगला स्वभाव देते हे. सर्व सदस्यांना आनंददायक व गमतीच्या गोष्टीमध्ये प्रसन्न ठेवतात. उत्तम कलाकार, फाइन आर्ट, संगीत, हत्यादि मध्ये अधिक रुचि घेणारे असतात. तेज कल्पना व साहित्य मध्ये कुशलता असते. चिकित्सा इंजीनिअरिंग, काव्य, नाटक, एकांकिका लिहिणे व साहित्यिक लोकांशी अधिक संपर्क असतो. तो एखादे व्यक्तीला जामीन देण्यामध्ये का कू करणार नाही, मग त्याचेशी घनिष्टता असो वा नसो. अधिकांश रूपाने एजेंट विक्रेता, दलाल, मैनेजर, स्त्रियाच्या मध्ये जीवनात उच्च स्थिती मध्ये असेल, सिनेतारका सहायक, संगीतज्ञ ई. रूपाने पैसा कमवतील, वा सहायक बेल वाजविणारा व पालकास नेहमी प्रसन्न करणारा, स्वास्थ्य संबंधी, इंजीनियर, इलेक्ट्रीकल, पंख्याचे व्यापारी ई. जर शनि शुभ दृष्टि मध्ये पहात असेल तर जातक थंड, शीत पदार्थाचे काम करण्यामध्ये सहायक असेल, तो इलेक्ट्रीक हीटर, मोटर बेटरी, ई. व्यापारी असतो.
जर बुधाची विपरित दृष्टि असेल तर एखादे व्यक्तिकरिता कधीही जामीन वा बँकेत हस्ताक्षर करणार नाही. तो त्याची वास्तविक तपास करून मानसिक कष्टी होत राहील. कोणतेही गोपनीय पत्र के भिन्न लिंगी घनिष्ठ मित्रास लिहित असेल कारण बुध पोस्टल संबंधी गोष्टींना दर्शवतो, म्हणून पत्र चूकिच्या व्यक्तिना दिले जाईल. जर गुरु अनुकूल नसेल तर तो जातकास हा विश्वास होऊ शकेल की एखादे दिवशी त्याला इन्कम टैक्स विभागात दंड भरावा लागेल, विशेष रूपाने बुध व शुक्र पण सम्मिलित असेल तेव्हा.
गुरुजी शुक्रावर शुभ दृष्टि : हे दोन्ही ग्रह तेज चमकणारे आहेत व स्वभावत: पुष्कळ बली ग्रह आहेत, म्हणून जातक, नम्र, कर्तव्यशील, ईमानदार, गुणवान व विश्वासपात्र असेल, हे लोक रहस्यविज्ञान, ईश्वर इत्यादि मध्ये आस्था ठेवणारे असतील, परंपरा पाळतील व कधी ही नियम मोडणार नाही व शांति भंग होऊ देणार नाहीत. हे विश्व प्रेम, मातृत्व, व बहिणीत्व दोन्ही अंगीकारतील. भरीव कार्य करणारे व पुष्कळ अतिथी सत्कार करणारे होतील. दान शुद्धता, न्याय, दया व हे गुण असतील. अध्ययनची इच्छा करणारा व अध्ययनची सुविधा व संधि प्राप्त होणारा असेल. साहसिक कामामध्ये सफलता प्राप्त होईल.
चांगले स्वास्थ्य व सरळ जीवन अनेक वर्षे त्यांना लाभेल. जातकास चांगले आर्थिक सल्लागार प्राप्त होतील. तो ईमानदार व नेहमी मदत करणारा राहिल. व्यापारा मध्ये पुष्कळ सफलता व फायदा, निश्चित रूपाने प्राप्त होईल. जातक कोर्टामध्ये इन्कमटेक्स, सेल्सटैक्स, बैंक महिला कॉलेज मध्ये सफलता व समृद्धि, सन्मान व प्रसिद्धी मिळवेल. कोणी एखादे मंदिरचा ट्रस्टी होऊ शक्ती, कंपनी डायरेक्टर, परिवहन विभागा’ मध्ये मैनेजर अथवा कैशीयर होऊ शकतो. एखादे उच्च स्थितवाले शी विवाह द्वारे जातकाची स्थिती व आर्थिक दशा अकस्मात वाढेल. जातक या संसारा मध्ये सर्व सुख प्राप्त करू शकतील, पवित्र व ईश्वर भक्त होतो. उपयोगी विनियोग, जीवनामध्ये विकास, पुत्र जन्म व सौभाग्य दर्शवतो.
जर गुरु पति अथवा पत्नीचा दर्शक असतो. ते पूर्वाषाढा वा विशाखाचे तीन चरण तुळ राशि मध्ये जन्म घेणारे असतात. २५ डिसेम्बर ते १० जानेवारी, अथवा ७ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर चा काळ सावधानी बाळगावी.
शनिची शुक्रावर शुभ दृष्टि : जातक एखादे साहस कार्यामध्ये प्रारंभ करण्याचे पहिले पुष्कळ गंभीरपणे विचार करावयास हवा. चांगली कल्पनाशक्ति व दूरदर्शिता, दृढता व धैर्य, ईमानदारी व विश्वसनीयताने जातक योजना बनविण्या मध्ये पुष्कळ निपुण होईल. जातक एखादे ट्रस्टीची उत्तरदायित्व पूर्ण स्थिती करणारा होतो.
तो सर्वं दर्शित खर्च वहन करेल. तो बुद्धिमान, मितव्ययी, कमी खर्चिक असेल व कंजूस होणार नाही. विवाह द्वारा उत्तरदान, जमीन, बगीचे, दवाखाना, शेअर व कोळसा व खाणी संबंधी व्यापार, चामडे व हाडे, सूती वस्त्र व इंजीनियरिंग कार्य हत्यादि वर विनियोग व्दारे लाभ होईल.
शनिची शुक्रावर शुभ दृष्टि असल्याने योग्य वयामध्ये विवाह व पति-पत्नी दोन्ही मध्ये परस्पर प्रेम राहिल. परन्तु विपरित दृष्टि विवाहामध्ये विलंब, निराशा, जोडीदार वृद्ध, विधवा, विधुर इत्यादि असून संतोष जनक सुख प्राप्त करू शकतो. त्याचे नैतिक आदर्श होणार नाही. आर्थिक हानि, पारिवारिक दुःख, वियोग, मृत्युशी वियोग, लैंगिक कष्ट व कोढ़ होईल. पैतृक सम्पत्ति प्राप्त करण्यामध्ये फार अडचण होईल, एखादयाची संरक्षक पदी नियुक्ति होऊ शकेल. अथवा पिता मृत्युद्वारे अन्य व्यक्तिंचा पुत्राचे नावे संपत्ती सोडू शकतो. जातकाचे सर्व अधिकार समाप्त करून देईल, जातकाची स्थिती खराब राहिल त्याचा विश्वासघात होईल. परिस्थितीत परिवर्तन व पतन संभवेल. चांगले मित्र पण जातकाची संपत्ति लुबाडतील. जातक घूसखोरी, बेईमानी, हिशोबात चूक, पक्षपात इ, आरोपा मध्ये दोषी राहिल, जातक मस्तवाल पणाने अथवा दारुने दंड होईल. जातकाचे पतिचा न्यायालयात घटस्फोट होऊ शकतो.
सामान्यपणे ज्याचे शुक्र व शनिची कुदृष्टि असते ते प्रथम आपल्या जीवनामध्ये उन्नति प्राप्त करतात व शेवटी ते महान पतन पावतात. शनि स्वस्थान दर्शवितो, म्हणून वाईट दृष्टिवाला शनि दर्शवितों की तो एक पाय स्मशानात आहे.
आज इथेच थांबू.
ज्योतिष मित्र मिलिंद
ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी (सशुल्क) संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in
Uttam Ani sahaj samajnyasarkhe likhan
LikeLiked by 1 person
Sundar varnan kele aahe…
LikeLiked by 1 person
Sundar lekh, Shani chi shubh drushti kinva viprit drushti Kashi olakhayachi yababat krupaya thodkyat margdarshan karave…
LikeLiked by 1 person
Jyotish mitra milind
Dhanyawad 🙏
Khup changlya prakare samjun sangitlet apan
LikeLiked by 1 person
Very nice information..
LikeLiked by 1 person
Nice 👍
LikeLiked by 1 person
Savistar vistarit Ashi mahiti…
Vidhyarthani sangrahi thevavi …
Dhanyawad sir..
LikeLiked by 1 person
Paripurn lekh 👌
LikeLiked by 1 person
🙏
LikeLiked by 1 person
Milind sir,
Chhan mahiti dilit..
👌👌👌
LikeLiked by 1 person