
विषय : विशोत्तरी दशा पध्दतीतील हीच समतोल तत्वानुसार ग्रहांची खगोलशास्त्रीय बैठक (ज्योतिष शास्त्र)
लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : नक्षत्र संचित दर्पण
नमस्कार,
निसर्गात प्रत्येक गोष्टीचा समतोल राखला जातो त्यामुळेच सर्व चराचरांचे अस्तित्व टिकून आहे. आग आहे तिथे पाणीही आहे. अॅसीड आहे तिथे अल्कलीही आहे. प्राणीमात्र श्वसनातून कार्बनडाय ऑक्साइड सोडतात तो शोषून घेण्यासाठी वनस्पती आहेत, ज्या आपल्यासाठी ऑक्सीजन देतात. आणि म्हणूनच समतोलत्वाच्या तत्वा प्रमाणे हे फक्त पृथ्वीच्याच बाबतीत शक्य असल्यामुळे पृथ्वीवर चराचर सृष्टी निर्माण होऊन ती अजून पर्यंत टिकून राहिली आहे.
मध्यंतरी माझा “ विंशोत्तरी दशा पद्धति : आयुष्यातील चढ़ उतार जाणून घ्यायचे एक गणिती तंत्र “ हा लेख प्रकाशित झाला होता. त्यामध्ये राशी चक्र आणि नक्षत्र चक्र यांची आपल्या पूर्वसुरींनी कशी सुंदररित्या सांगड घातली आहे हे विषद केले होते.
आज आपण थोड़े ज्योतिष शास्त्रातील विशोत्तरी दशा पध्दतीत देखील हीच समतोलत्वाची ग्रहांची खगोलशास्त्रीय बैठक गोष्ट कशी साधलेली आहे याचे विश्लेषण करणार आहोत.
पूर्वीच्या काळी हिंदू ज्योतिष शास्त्र कारांनी विंशोत्तरी, अष्टोत्तरी, योगिनी, पाराशरी अशा ४३ विविध प्रकारच्या दशा शोधल्या होत्या. नंतर काळाच्या ओघात या पद्धति लोप पावल्या. सध्या विंशोत्तरी, अष्टोत्तरी आशा मोजक्या दशा प्रचलित आहेत हे आपणांस माहित आहेच. ज्याला ज्या पद्धतीचा अनुभव जास्त आलाय, तो तो ज्योतिषी ती पद्धत भविष्य कथनासाठी स्वीकारतो. माझे गुरुजी कृष्णमुर्ती पद्धतीचे अभ्यासक होते. सहाजिकच विशोत्तरी दशेचा अभ्यास, प्रभाव व अनुभव आहे.
आपण ज्योतिषी, पृथ्वीच्या सापेक्ष प्रत्येक ग्रहाची आकाशातील स्थिती चे अवलोकन करून व गणित मांडून ग्रहांना कुंडलीतील बारा राशीत विभागतो. पण आकाशात ते सात ग्रह व राहू-केतूचे दोन बिंदू कसे भ्रमण करतात, त्याकडे कधी मान वर करून बघण्याची तसदी घेत नाही. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण केले, तर असे दिसेल की
१. पृथ्वीला मध्ये ठेवून दोन ग्रह बुध व शुक्र आतील कक्षेत आहेत
२. तर मंगळ, गुरु व शनी हे बाहय कक्षेत आहेत.
३. आतील कक्षेत बुध-शुकाबरोबर आपल्या सूर्यमालेचा मध्यबिंदू जो सूर्य तोही आतील कक्षेत आहे.
म्हणजेच तीन ग्रह आतील कक्षेत व तीन ग्रह बाह्य कक्षेत आहेत
४. सातवा ग्रह जो चंद्र तो पृथ्वीभोवता फिरून दोन्ही कक्षेत भ्रमण करीत आहे.
५. राहू-केतू हे दोन बिंदू आकाशात कुठे आहेत हे गणिताने मांडलेले आहे. केतू हा बिंदू पृथ्वीच्या आंतरकक्षेत तर राहू बिंदू बाहय कक्षेत धरला.
आपण वैश्विक किरणांचे स्त्रोत म्हणून सात ग्रहांकडे पहातो, आणि म्हणूनच जिथून हा स्त्रोत उगम पावतो त्या नक्षत्र मंडळालाही ही सात नावे व राहू-केतूची दोन नांवे देवून त्याप्रमाणेच त्यांच्याकडे स्वामित्व दिलेले आहे.
विशोत्तरी दशेत जन्मकाळी चंद्र ज्या नक्षत्रात असेल तिथुन त्या नक्षत्राच्या मालकीच्या ग्रहाची महादशा सुरु होते. प्रत्येक महादशेची वर्षे ही ठरलेली आहेत. केतू ७ बर्षे, शुक्र २० वर्षे, रवी ६ वर्षे, चंद्र १० वर्षे, मंगळ ७ वर्षे, राहू १८, गुरु १६, शनी १९, बुध १७ असे मिळून १२० वर्षे, १२० अंश पूर्ण होतात. याप्रमाणे जन्मदशा अंशात्मक विभाजन करुन अंतर्दशा, विदशा, सुक्ष्म दशा, प्राण दशा ई. शोधतात. व त्यामुळे कुंडलीत दिसत असलेले एखादे फ़ळ कधी प्राप्त होईल याचे अगदी वर्ष, महीना, दिवस असे सुक्ष्म अनुमान घेता येते.
सत्तावीस नक्षत्रांचे, तीन नक्षत्रांचा एक विभाग इयाप्रमाणे नऊ विभाग करून या नऊ ग्रहांना त्यांचे स्वामित्व दिले आहे. आश्विनी नक्षत्रांची सुरुवात धरून त्यानी स्विकारलेले स्वामित्व खालील क्रमाने येते.
केतू – शुक्र – रवि – चंद्र – मंगळ – राहू – गुरु – शनि – बुध
या क्रमातील बुध सूर्याच्या सर्वात जवळ असल्याने जर सुरुवातीस घेतला तर क्रम असा होईल.
बुध – केतू – शुक – रवि = चंद्र = मंगळ – राहू – गुरु – शनि
चंद्र हा दोन्ही कक्षेत फिरणारा ग्रह मध्य घेतला तर आंतर कक्षेतील चार ग्रह व बाह्य कक्षेतील चार ग्रह पृथ्वीच्या दोन बाजूस येतात. आपल्या विंशोत्तरी प्रमाणे या ग्रहाना देण्यात येणा-या वर्षाची बेरीज करून काय मिळते ते पाहू.
बुध १७ वर्षे + केतू ७ वर्षे + शुक २० वर्षे + रवि ६ वर्षे + चंद्र १० वर्षे एकूण ६० वर्षे
तसेच
मंगळ ०७ वर्षे + राहू १८ वर्षे + गुरु १६ वर्षे + शनी १९ वर्षे = एकूण ६० वर्षे
म्हणजेच राशी चक्रा प्रमाणेच नक्षत्र चक्र आधारित विशोत्तरी दशा पध्दतित देखील ग्रहांचे अंशात्मक अंतर पार होण्यास व त्याप्रमाणे आपल्या आयुष्यातील घटना यांना लागणारा काल मोजताना निसर्ग रचनेप्रमाणे समतोल साधलेला आढळतो.
म्हणूनच आपण विशोत्तरी दशा पध्दती वापरून कालनिर्देश केला तर तो अचूक येतो असा माझा अनुभव आहे.
ज्योतिष मित्र मिलिंद
ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी (सशुल्क) संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in
Khup chan mahiti. Thank you
LikeLiked by 1 person
Me tumche sagle article vachle aet. Te nehamich abyaspurvak astat. Khup knowledge milte.
Mazya friend la tumcha no dila ahe. He will contact you tomorrow.
LikeLiked by 1 person
More than excellent…
LikeLiked by 1 person
Khup chhan mahiti dili aahe tumhi
Dhanyawad…
LikeLiked by 1 person