कुंडलीची रचना म्हणजे पृथ्वी वरून दिसणारी सूर्यमाला


नमस्कार,

अनेक समस्यां वा संधी जाणून घेण्यासाठी ज्योतीषाकडे जाऊन कुंडली दाखवून मार्गदर्शन घेण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. परंतू कुंडली म्हणजे काय हे अनेक जणांना माहीत नसते. कसले तरी चौकोन आखून त्यात आकडे व ग्रह लिहून काय सांगितले जाते हे तर अगाध ज्ञान.

वास्तविक पणे ज्योतिष शास्त्र आपली सूर्यमाला व त्यातील ग्रहांची आकाशस्थ स्थिती, ग्रहांची गती व त्यांचा एकेमेकांशी साधला जाणारा कोन आणि या सर्वांचा आपल्यावर होणारा परिणाम यावर आधारित आहे.

आपल्या सूर्यमालेतील सूर्याभोवती फिरणार्या ग्रहांचा क्रम पहिला तर लक्षात येईल

  • सूर्य
  • बुध
  • शुक्र
  • पृथ्वी
  • मंगळ
  • गुरु
  • शनी

आता या वर्तुळाकार मार्गास मधून छेद दिला असता त्याचे डावा व उजवा असे दोन भाग होतील.

आता पृथ्वी वरून सूर्यमाला पाहिली असता पृथ्वी सोडून सूर्य, इतर ६ ग्रह व सूर्याचा प्रकाश पृथ्वी वर परावर्तीत करणारा चंद्र आपल्या नजरेस वास्तविक क्रमाने दिसतील.

या सर्व आकाशस्थ स्थितीचा अभ्यास करण्यासाठी मांडलेला नकाशा म्हणजे कुंडली.

कुंडलीची रचना म्हणजे पृथ्वी वरून दिसणारी सूर्यमाला जी ची मांडणी अत्यंत वास्तविक व थक्क करणारी आहे.

सूर्यमालेत ज्याप्रमाणें ग्रहांचा अनुक्रम वास्तविक आहे, त्याप्रमाणे राशींची वाटणी केली गेलीं आहे. सर्व राशींत जी सिंह राशि तिचें स्वामित्व दैदीप्यमान व जगाचें उत्पत्तिस्थान असा मुख्य ग्रह जो सूर्य त्याच्याकडे आलें.

सूर्याच्या खालोखाल चंद्राचें तेज असल्यामुळें  सूर्यराशीच्या पूर्वीची जी कर्क राशि तिचें आधिपत्य चंद्राकडे आलें.

नंतर सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध त्याच्या राशी सिंह राशीच्या पुढील कन्या व कर्क च्या मागील मिथुन असा बुधाचा पट्टा विभागला गेला.

बुधाच्या नंतर शुक्र आहे, म्हणून बुधाच्या ज्या दोन राशि मिथुन व कन्या त्यांच्या मागील एक व पुढील एक म्हणजे वृषभ व तूळ अशा दोन राशींवर, वरील न्यायानें शुक्राचें स्वामित्व ठरलें.

शुक्राच्या नंतर मंगळ आहे. म्हणून शुक्राच्या मागील व पुढील एक एक राशि म्हणजे मेष व वृश्चिक अशा दोन राशि मंगळाच्या झाल्या.

मंगळानंतर गुरु आहे, म्हणून मेष च्या मागील एक व वृश्चिक च्या पुढील एक म्हणजे मीन व धनु अशा दोन राशि गुरूच्या झाल्या.

शेवटीं शनि आहे म्हणून मीन च्या मागील राशि कुंभ व धनु राशीच्या पुढील राशि मकर अशा दोन राशींवर शनीचें स्वामित्व ठरलें. आता लक्षात येईल कि शनीच्या दोन्ही राशी शेजारी का येतात.

खरोखर ही रचना पाहून मनास अत्यानंद वाटतो. ज्योतिषांत अशा तऱ्हेचें सयुक्तिक व चमत्कारिक प्रकार अनेक असतील; किंबहुना प्रत्येक गोष्टीविषय असें मौजेचें कांहींतरी असेल. परंतु आपल्या अल्प बुद्धीला तें गम्य नाहीं इतकेंच. शिवाय आमच्या प्राचीन विद्वान ज्योतिर्विदांनी जरी अनेक शोध, मूल्यवान विचार ग्रंथित करून ठेविले आहेत

वर दिलेल्या सूर्यमालेच्या आकृतीवरून कुंडलीची रचना सहज समजून येईल.

ज्योतिष मित्र मिलिंद

(संदर्भ : ज्योतीर्मयुख)

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी (सशुल्क) संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

Leave a comment