आपल्या राशीनुसार कोणते रुद्राक्ष धारण करणे ठरते फ़ायदेशीर ?


हिंदू संस्कृती तसेच वैदिक ज्योतिष शास्त्रात रुद्राक्षाचे महत्व अनन्यसाधारण आहे तसेच हा एक पूजन, उपासना, आराधना, नामस्मरण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त तसेच रोगनिवारण, व्याधीमुक्तीचा अध्यात्मिक उपाय म्हणून गणला जातो. ज्योतिष शास्त्रात ग्रहांच्या अनुकूलतेसाठी, अशुभ ग्रहांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास राशीनुसार रुद्राक्ष धारण करणे लाभदायक असल्याचे मानले जाते. सामान्य माणसाला ही रुद्राक्षाचा विशिष्ट आकार, रंग व त्यावरील गूढ रेखाकृती यामुळे रुद्राक्षाविषयी कुतुहल व श्रद्धाभाव वाटत आला आहे.

रुद्राक्ष हे भगवान शिव शंकराचे प्रतिक मानले जाते. रुद्राक्ष हा रुद्र आणि अक्ष या दोन शब्दांचा संधी आहे. रुद्र म्हणजे शंकर व अक्ष म्हणजे डोळा. महादेवाच्या डोळ्यातील अश्रुंमुळे रुद्राक्ष तयार झाली असे मानले जाते. वास्तवत: रुद्राक्ष हे हिमालयात येणारे एक प्रकारचे फ़ळाच्या आत मिळणारे बीज आहे.

रुद्राक्ष कोण धारण करु शकतो ?

रुद्राक्ष धारण करण्यासाठी कोणते ही जात, धर्म, स्त्री-पुरुष, भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक असे बंधन नाही.

कोणीही व्यक्ती रुद्राक्ष धारण करु शकतो. लहान मुले, विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, व्यावसायिक, व्यापारी, वृद्ध, आजारी असे कोणीही वेगवेगळ्या लाभासाठी रुद्राक्ष धारण करु शकतो. एकवेळेस वेगवेगळ्या लाभासाठी दोन तीन प्रकारचे रुद्राक्ष एकावेळेस सुद्धा धारण करु शकतो. रुद्राक्षाचा कोणताही वाईट वा नकारात्मक परिणाम होत नाही.

रुद्राक्षांचे अनेक प्रकार आहेत. रुद्राक्षाच्या अस्सलतेची खातरजमा केल्यानंतरच तो धारण करावा, असा सल्ला प्रामुख्याने दिला जातो. रुद्राक्ष खरा नसेल, तर तो धारण करून त्याचे लाभ मिळत नाहीत.

अनु. क्र.रुद्राक्षांचे प्रकारवर्णनया राशींसाठी उपयुक्तराशी स्वामी
01एक मुखीशिवाचे प्रतीक, सूर्यस्वरूप, भुक्ति मुक्ती, धन समृद्धी, पाप मुक्ती, कोणताही त्रासापासून संरक्षण ई. साठी उपयुक्त असे मानले जाते.सिंहरवी
02दोन मुखीव्यक्तिमत्त्वात अनुकुल बदल, कुण्डलिनी जागृती, पती-पत्नीमधील एकोपा, वैवाहिक सौख्य, दु:ख नाश, मनःशांती, व्यवसाय, उद्योग, प्रगती ई. साठी उपयुक्त असे मानले जाते.कर्कचंद्र
03तीन मुखीअग्निरुपी तीनमुखी रुद्राक्ष धारण केल्यास कोणताही विकार होत नाही, वाचा सिद्धी, प्राप्त होते. तहान, भू्क आदि शारिरिक गरजांबाबत आत्मसंयम प्राप्ती, तल्लख बुद्धी, व्यक्तिमत्त्व विकास, कार्यसिद्धी, प्रगती ई. साठी उपयुक्त असे मानले जाते.मेष, वृश्चिकमंगळ
04चार मुखीधनप्राप्ती, धनाचा योग्य विनिमय, प्रभावी वाणी तीव्र स्मरणशक्ती ई. साठी उपयुक्त असे मानले जाते.मिथुन, कन्याबुध
05पंच मुखीपंच महाभूतं, शिवाचे प्रतीक, काळाचा शत्रू, अकाली मृत्यू पासून संरक्षण, मनःशांती,सर्व रुद्राक्षाचे गुण
ई. साठी उपयुक्त असे मानले जाते.
धनु, मीनगुरु
06सहा मुखीकार्तिकेय स्वरूप, शक्तीवर्धक, व्यापारात यश, धन संचय ई. साठी उपयुक्त असे मानले जाते.वृषभ, तुळशुक्र
07सात मुखीसप्त मातृका, अनंत नागाचे प्रतीक, दीर्घायुष्य व अपघातापासून रक्षण, मस्तकशूळ, संधीवात, विषमज्वर, सर्पदंशापासून रक्षण ई. साठी उपयुक्त असे मानले जाते.मकर, कुंभ,शनी
08आठ मुखीभैरवरूप, दीर्घायुष्य,अशांती, सर्पभय, त्वचा रोग, गुप्त रोग इतर आजार ई. साठी उपयुक्त असे मानले जाते.
09नऊ मुखीदुर्गा माहेश्वरी चे प्रतिक, फुफ्फुसासाठी, ताप, नेत्र रोग, कान रोग, संतती, ओटीपोटात वेदना, संक्रामक रोग शांती ई. साठी उपयुक्त असे मानले जाते.
10दश मुखीजनार्दन देवाचे प्रतिक, सर्व इच्छापूर्ती, पिशाच्च, ब्रह्मराक्षस, सर्प भय, सर्व ग्रह अनुकूलता, फुफ्फुसासंबंधी आणि हृद्यासंबंधी आजार ई. साठी उपयुक्त असे मानले जाते.मिथुन, कन्याबुध
11अकरा मुखीरुद्ररूप, इंद्राचे प्रतिक, सर्वत्र विजय, स्त्री रोग, स्नायू रोग आणि वीर्य संबंधी आजार, लाभप्राप्ती ई. साठी उपयुक्त असे मानले जाते.धनु, मीन. मेष, वृश्चिक गुरु, मंगळ
12बारा मुखीसूर्यस्वरूप, १२ ज्योतिर्लिंगाचे प्रतीक, तेजस्वी व्यक्तिमत्व, शत्रू व अपघाता पासून रक्षण, अनमोल लाभ प्राप्ती ई. साठी उपयुक्त असे मानले जाते.
13तेरा मुखीविश्वेश्वराचे प्रतिक, सर्व इच्छापूर्ती, आकर्षकता, सुंदरता, समृद्धी प्राप्ती, मूत्राशय, नपुंसकता, गर्भासंबंधी आजार, किडनी, लिव्हर संबंधी आजार ई. साठी उपयुक्त असे मानले जाते.वृषभ, तुळशुक्र
14चौदा मुखीशिवरूप, हनुमान स्वरूप, पापक्षालन, तंत्र मंत्र, चेटुक, भूत-प्रेत, पिशाच्च यापासून रक्षण, वैराग्य, बेचैनी, भीती, पक्षाघात, कर्करोग, प्रेत बाधा समस्यांवर लाभदायकई. साठी उपयुक्त असे मानले जाते.सिंह, मकर, कुंभ रवी, शनी

ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

2 thoughts on “आपल्या राशीनुसार कोणते रुद्राक्ष धारण करणे ठरते फ़ायदेशीर ?

Leave a comment