कोणती लग्न रास उदित असताना कॊणती कामे करणे मुहुर्तानुसार ठरते फ़ायदेशीर


गधड्या अभ्यास करण्यासाठी मुहुर्त लागतोय की नाही पासून, अहो ऐकलत का? गुरुजींना भेटून लेकीच्या लग्नासाठी येत्या मे मधे काही चांगले मुहुर्त पाहून या…इथपर्यंत मुहुर्त या शब्दाचा बोलबाला आहे. आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यासाठी मग ते एखादे नवीन काम, उद्घाटन, विवाह, मुंज, सण, उत्सव, प्रतिस्थापना असो वा प्रवास करायचा असो आपल्याकडे मुहुर्त बघण्याची प्रथा आहे.

मुहुर्त शास्त्र हे फ़लज्योतिष शास्त्रातील एक महत्त्वाचे अंग मानले जाते. ऋग्वेदामधे देखील मुहुर्ताचा उल्लेख आढळतो. वैदिक पद्धतीनुसार पंचांगातील वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण या पाच अंगांच्या आधारावर मुहूर्त काढला जातो. मुहुर्त याचा अर्थ ठराविक थोडा काळ असा आहे. शुभ कार्यासाठी योग्य असणारा काळ यास ही मुहुर्त संबोधले जाते. दिवसाच्या पंधराव्या भागास मुहूर्त म्हणतात. रात्रीचे ही तेवढेच मुहूर्त असतात.

२ घटिकांचा एक मुहुर्त मानला जातो.
मुहुर्ताचे अनेक प्रकार व नावे आहेत.
१. सूर्योदयापासून ६ घटिका – प्रातःकाळ
२. त्यानंतरचे ६ घटिका – संगवकाळ (गाईंना व वासरांना एकत्र आणून दूध प्राशन व चरायला नेण्याचा काळ.)
३. त्यानंतरचे ६ घटिका – मध्यान्हकाळ
४. त्यानंतरचे ६ घटिका – अपराण्हकाळ – ( श्राद्धासाठी महत्त्वाचा काळ.)
५. त्यानंतरचे ६ घटिका – सायंकाळ -हा कोणत्याही कामांस फ़ारसा प्रशस्त मानला जात नाही.

कामे काही विशिष्ट नक्षत्रांवर. तिथीवर, करणावर वा मुहुर्तावर केली तर त्या ग्रह देवतेच्या आशिर्वादाने कार्यसिद्धी होते, अशी समजूत आहे.
एखादे कार्य करण्याला योग्य असा काळ वा मुहुर्ताला ग्रह, बारा भाव (कुंडलीतील १२ स्थाने) आणि राशी यांची माहिती असणे आवश्यक असते.
कृष्णमूर्ती पद्धतीनुसार कोणतेही कार्य वा घटनेविषयी जाणून घेताना भावारंभावर जास्त लक्ष द्यावे लागते.
मुहुर्त या विषयावर बरेच काही लिहिण्यासारखे आहे. पण जास्त खोलात न जाता कार्य करताना कोणते लग्न उदित आहे यानुसार वेळ ठरवण्यासाठी एक सोपा तक्ता देत आहे. त्यानुसार आपण कामांस सुरुवात केली तर कार्यसिद्धी साठी सहाय्यक ठरेल. लग्न वा लग्न रास म्हणजे कार्याच्या त्या विशिष्ट वेळी कोणती रास पूर्व दिशेला उगम पावली आहे ती रास. या काळाचा भावारंभ गाठता आला तर सर्वोत्तम सहाय्यकारी ठरेल.

कोणती लग्न रास उदित असताना कॊणती कामे करणे मुहुर्तानुसार ठरते फ़ायदेशीर याचा तक्ता

अनु.क्र.लग्न रासकॊणती कामे करणे मुहुर्तानुसार ठरते फ़ायदेशीर
१.मेष चर कार्य. प्रवास, यात्रा, नविन वस्त्र नेसणे, नविन अलंकार धारण करणे, जमीन खणणे, सुलेनामा करणे, साहसी व धाडसाची कामे ई.
२.वृषभस्थिर कार्य. शेतीची, विहिरीची, बागायती कामे करणे, जनावर खरेदी वा विक्री. विवाह, मंगल कार्य, गृह प्रवेश, नवीन दुकान उद्घाटन करणे ई.
३.मिथुनसर्व शुभ कार्य, विवाह, अधिकार ग्रहण, विज्ञान कार्ये, शिल्प, कला, युध्द, ई.
४.कर्कविहिरीची कामे, लेखन करणे, शांतीकार्य, ई.
५.सिंहस्थिर कार्ये. वस्तुची खरेदी, दुकान उदघाटन, अलंकार बनविणे, नोकरीवर रुजु होणे, सर्व शुभ कार्ये, ई.
६.कन्याचर स्थिर कार्ये, विद्यारंभ, औषधी तयार करणे, विवाहादी सर्व मंगल कार्ये, ई.
७.तुळशेतीकाम, पशुपालन, यात्रा, व्यापार, विवाह मौंजी, ई.
८.वृश्चिकस्थिर कार्य, अधिकारग्रहण करणे. नोकरीवर रुजु होणे, ई.
९.धनुविवाह, मौजी, जनावर खरेदी वा विक्री, शुभ कार्ये ई.
१०.मकरशेतीची कामे, जनावर खरेदी वा विक्री, शुभ कार्ये ई.
११.कुंभशेती, व्यापार, जल पर्यटन. ई.
१२.मीनविवाह मौजी. वस्त्र व अलंकार बनविणे व धारण करणे. अधिकार ग्रहण करणे. सरकारी कामे. ई.

टीप : अधिक खोल तपशीलासाठी व मुहुर्तासाठी जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.

ज्योतिष मित्र मिलिंद ( jyotish mitra milind )

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

2 thoughts on “कोणती लग्न रास उदित असताना कॊणती कामे करणे मुहुर्तानुसार ठरते फ़ायदेशीर

Leave a comment