
तुम्हाला म्हणून सांगते, अजून बोलले नाहीय कोणाला, पण लवकरच मी एका बाळाची आई होणार आहे असे ती माऊली लाजत सांगत असते, नवरोजी मिशीला पीळ मारत किंवा गोड हसताना लवकरच बाबा होणार असल्याची प्रौढी चेहऱ्यावर झळकत असते. आजी आजोबा नातवंडे खेळवायला मिळणार म्हणून खुशीत असतात व अनुभवाचे सल्ले द्यायला तत्पर असतात.
घरात बाळाच्या जन्माची नुसती चाहूल लागताच आनंदी आनंद पसरतो.
थोडा आनंद, थोडी उत्सुकता, थोडी भीती, थोडी हुरहूर असा हा काळ.
तर असा हा ९ महिन्यांवरचा काळ बाळ प्रत्यक्षात आकार घेत असताना आईच्या जन्मकुंडली नुसार कोणत्या ग्रहाचा प्रभाव असतो व एखादा ग्रह कमजोर व अशुभ आढळल्यास, काही दोष वा कमतरता निदर्शनास आल्यास वा या काळात दशा वा गोचर ग्रह अनुसार कोणत्या ग्रहाचे उपाय सहाय्यभूत ठरतात या साठी हा लेख प्रपंच…
गर्भधारणा ते प्रसूती काळातील ग्रहांचा प्रभाव
| अनु. क्र. | महिना काळ | गर्भाची अवस्था | ग्रह प्रभाव | ग्रह उपाय |
| १ | 28 दिवसांचा १ला महिना, | फलित समगमा नंतरचा लगेच चा काळ. शुक्राणू आणि बीजांड यांचे मिलन होऊन गर्भ राहतो. भ्रूणातील अतिशय उच्च क्रियाकलापाचा काळ जिथे पेशी नवीन शरीर म्हणून नियुक्त असलेल्या गर्भाशयात स्थिर होण्याचा काळ. कार्य अद्याप निश्चित न झालेल्या द्रवरूप प्रारंभिक पेशीद्वारे अनेक प्रकारच्या पेशींना जन्म देण्याचा काळ. | शुक्र | शुक्राच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे |
| २ | 28 दिवसांचा २रा महिना | शरीराच्या पेशी कडक होण्याचा काळ. एक पेशी विभाजित होऊन अनेक पेशी तयार व ठराविक कार्यासाठी विकसित होण्याचा काळ. यकृतासाठी नियुक्त केलेल्या पेशी स्नायू बनण्यासाठी कार्य करू शकत नाहीत. शरीराचा आकार स्पष्ट होणे. | मंगळ | मंगळाच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे |
| ३ | 28 दिवसांचा ३रा महिना | जलद विकासाचा काळ. गर्भाच्या शरीराचा आकार अधिक ठळक. गर्भ जागृत होऊन आई/वडिलांना योग्य प्रतिसाद देणे. | गुरू | गुरूच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे |
| ४ | 28 दिवसांचा ४था महिना | बाळाच्या बुद्धिमत्तेचा विकास आत्म्याची शक्ती स्थापित होते. शरीराची ताकद वाढते, हाडे आणि स्नायूंची रचना तयार होऊ लागते. | सूर्य | सूर्याच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे. ग्रहण वा अमावस्या दिवशी काळजी घ्या. |
| ५ | 28 दिवसांचा ५वा महिना | गर्भाची रक्ताभिसरण यंत्रणा कार्यरत. रक्त आणि रक्तपेशी कार्यरत. रोगप्रतिकारक शक्ती चा विकास. भावनिक जाणिवेची निर्मिती व व्यक्त करणे. मन आणि भावना ची जडण घडण | चंद्र | चंद्राच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे. ग्रहण व अमावस्या दिवशी काळजी घ्या. |
| ६ | 28 दिवसांचा ६वा महिना | शरीराची हाडे, नसा आणि आधार देणारी शरीराची बनावट, केस आणि नखे यांची वाढ. मुलाची सहनशक्ती कमी होते. | शनी | शनीच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे |
| ७ | 28 दिवसांचा ७वा महिना | बाळाची विचारशक्ती, मज्जासंस्था आणि मेंदू विकासाचा महत्वाचा टप्पा. स्वतःच्या गर्भाच्या शरीराची आणि त्याच्या आई आणि बाह्य वातावरणाकडून प्राप्त होणारे संकेत स्पष्टपणे माहित होतात. बुद्धिमत्ता आणि जागरूकता महत्त्वपूर्ण टप्प्यावर. | बुध | बुधाच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे |
| ८ | 28 दिवसांचा ८वा महिना | संवेदनशील काळ ज्यात संपूर्ण व्यक्तिमत्व ठरते. मातेच्या सकारात्मक व आनंद लहरी गर्भास प्रक्षेपित करण्याचा काळ | आईच्या कुंडलीतील लग्न राशीचा स्वामी | आईच्या कुंडलीतील लग्न राशीचा स्वामीच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे |
| ९ | २८ दिवसांचा ९वा महिना | गर्भाला स्वतःच्या शरीराची समज आणि नियंत्रण प्राप्ती.भूक आणि तहान याची जाणीव. प्रसूतीच्या तयारीत शरीराची रचना अंतिम टप्प्या कडे वाटचाल करण्यास सुरुवात. | सूर्य | सूर्याच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे |
| १० | २८ दिवसांचा १०वा महिना | प्रसूती आधीचा शेवटचा टप्पा. बाळाचे मन आणि भावना सक्रिय आणि प्रसूतीसाठी मानसिकदृष्ट्या तयार | चंद्र | चंद्राच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे |
अशाप्रकारे २८० दिवसांच्या या अविरत क्रिया प्रक्रियांनंतर बाळाचा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगात प्रवेश होतो आणि त्याच्या जन्मवेळे नुसार त्याची स्वतः ची अशी भोग कुंडली अर्थात जन्मकुंडली तयार होते.
शुभं भवतु 🙏🏻
(टीप : एखादी उपाय योजना करण्यापूर्वी जाणकार ज्योतिष सल्ला अवश्य घ्यावा.)
ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)
ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in
2 thoughts on “गर्भधारणा ते प्रसूती काळातील ग्रहांचा प्रभाव”