
रवी चे पारंपारिक उपाय
1. पती – पत्नी पैकी एकाने गूळ खाणे बंद केले पाहिजे
2. मुफ्त वस्तू घेऊ नका
3. आईचा आशिर्वाद सदैव घ्या
4. तांदूळ – दुधाचे दान करा.
5. आंधळ्या व्यकतींची मदत करा.
6. दुसरें सोबत प्रेमाने वागा.
7. जन्मकुंडलीत रवि अनिष्ट असेल व त्यामुळे जीवनात विघ्न बाधा उत्पन्न होत असेल तर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कोणत्याही रविवारी २ किलो गूळ पाण्यात प्रवाहित करावा.
8. जन्मकुंडलीत लग्नी रवि असेल वा सप्तमात शनि असेल तर रवि- अनिष्ट होऊन खूप त्रास करतो. अशा जातकाने आपल्या पैतृक घरात हँडपंप बसवावा. विहीर खोदून घ्यावी.
9. सप्तम स्थानांत रवि व लग्नस्थानी शनि असेल किंवा दृष्टी रविवर असेल तर जातकाला संतती होत नाही. अशा जातकाने जेवणापूर्वी आचमन करावे. तांब्याचे ७ तुकडे जमिनीत गाडावेत. रविवारी बिनशिंगाच्या कपिला गाईला पोळी व गूळ खावयास घालावा.
10. प्रथम स्थानी अनिष्ट रवि असेल तर बापजाद्यांच्या घरात पाण्याचा नळ बसवून घ्यावा.
11. द्वितीय स्थानी अनिष्ट रवि असेल तर वाहत्या पाण्यात गूळ प्रवाहित करावा. चारित्र्यावर लक्ष द्यावे.
12. चतुर्थ स्थानी अनिष्ट रवि असेल तर वडिलोपार्जित घरात गरिबांना जेवण द्यावे. नित्य हवन करावे.
13. पंचम स्थानी अनिष्ट रवि असेल तर रोज सकाळी १८ सूर्यनमस्कार घालावेत. सकाळी पिण्याच्या पाण्यात गूळ घालून ते पाणी दिवसभर थोडे-थोडे प्यावे. प्रयोगाची सुरुवात रविवारी करून ४३ दिवस करावा.
14. सहाव्या स्थानी रवि अनिष्ट असेल तर माकडांना चणे-गूळ व मुंग्यांना साखर-पीठ घालावे.
15. सातव्या स्थानी रवि अनिष्ट असेल तर मीठ कमी खावे. स्वयंपाक झाल्यावर अग्नी दुधाने विझवावा.
16. आठव्या स्थानी पांढऱ्या गाईखेरीज इतर गाईची सेवा करावी.
17. नवव्या स्थानी स्वयंपाक, जेवणासाठी पितळी भांड्यांचा उपयोग करावा.
18. दहाव्या स्थानी बोडक्या डोक्याने हिंडू नये.
19. अकराव्या स्थानी मद्यपान व मांसाहार करू नये.
20. बाराव्या स्थानी घरात जात्यावर धान्य दळावे.
21. बेलाची पत्री ताईतात घालून तो गळ्यात धारण करावा.
22. हरिवंश पुराण वाचावे.
-ज्योतिषमित्र मिलिंद
For any query or Astrological guidance feel free to contact on 7058115947 (whatsapp)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in
One thought on “रवी ग्रह पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Sun)”