मंगळ ग्रह पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Mars)


मंगळाचे पारंपारिक उपाय

1. ज्या व्यक्तीचा मंगळ अधिक प्रभावी आहे अशा व्यक्तीने नारळाचं पाणी पिणे खूप चांगलं असतं. यामुळे मंगळ शांत होतो आणि त्या व्यक्तीचा राग कमी होतो.

2. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन मारूतीरायावर तेल अर्पण करावं आणि शेंदूर लावावा. हनुमंताच्या शेंदूराचा आपल्या कपाळावर टिळा लावावा.

3. बुंदीचे लाडू आपल्या हाताने तयार करावे, त्यात चार लवंगा टाकून हनुमानाच्या चरणी मंगळवारी अर्पण करावेत.

4. विड्याच्या पानावर काथ लावावा आणण असा विडा मंगळवारी बजरंगबलीला अर्पण करावा.

5. दररोज हनुमान चालीसा आणि मारूती स्तोत्राचं पठण करावं.

6. मोहरीच्या तेलात नीळ (पांढरे कपडे धुवायला वापरतो ती नीळ) मिसळून त्याचा दिवा मंगळवारी हनुमानासमोर लावावा.

7. मंगळवारी उपवास करून गुळ आणि फुटाणे दान करावे.

8. असं म्हणतात जो भक्त प्रत्येक मंगळवारी उपवास करतो आणि हनुमंताची विशेष पूजा करतो. त्याच्यावर मारूतीरायाची सदैव कृपा राहते. ज्या तरूण-तरूणींना सौम्य मंगळ किंवा मंगळ आहे. ज्यामुळे त्यांचा विवाह ठरत नाही, अशा तरूणांनी हा उपाय करून बघण्यास हरकत नाही. मंगळाचा प्रभाव कमी झाला तर आपला राग शांत होईल आणि त्यामुळे दूर गेलेले व्यक्ती जवळ येतील आणि जवळचे दूर जाणार नाहीत.

9. वड वृक्षाच्या मूळ मध्ये गोड दूध – पाणी टाकून त्याची ओली माती नाभी वर लावा.

10. घरात ठोस चांदी ठेवा.

11. घरात आलेल्या बहिणीला गोड देऊन घरातून विदा करा.

12. धार्मिक स्थळावर गूळ, चण्याची डाळ इत्यादीचे दान करा.

13. दुसऱयांना गोड खाऊ घाला आणि शक्य असल्यास स्वतः ही गोड खा.

14. अनिष्ट मंगळ शुभग्रहांनी युक्त असेल तर साखरेचे बत्ताशे वाहत्या पाण्यात सोडावेत. तिळगुळाच्या रेवड्या विकत घेऊन वाहत्या पाण्यात सोडाव्यात.

15. मृगचर्माचे आसन नेहमी वापरावे.

16. गुळाच्या किंवा पुरणपोळ्या गरिबांना खाऊ घालाव्यात.

17. चतुर्थ मंगळ असेल तर अडचणी दूर करण्यासाठी रोज सकाळी विहिरीच्या पाण्याने दात स्वच्छ करावेत.

18. साखर घातलेले दूध, वडाची मुळी, जमिनीतील माती या तीन वस्तूंचे गंध तयार करून रोज त्याचा टिळा कपाळी लावावा.

19. अग्निभय असेल तर आपल्या घरावर थोडी साखर टाकावी.

20. अनिष्ट मंगळामुळे पत्नीच्या मृत्यूची भीती असेल तर एका नव्या भांड्यात मध ठेवून यावे.

21. दीर्घ आजारातून बचाव होण्यासाठी मृगचर्मावर झोपावे. घराच्या दक्षिण दिशेला लोखंडाची नखे अडकवून ठेवावीत. घरात कुत्रा पाळावा.

22. कुंडलीच्या बाराव्या स्थानात मंगळ असेल व बुध ३,८,९,१२ यापैकी कोणत्याही स्थानी असल्यास दुष्परिणाम भोगावे लागतात. अशा स्थितीत दुधात बत्ताशे व मध मिसळून मारुतीच्या मंदिरात अर्पण करावेत.

23. मंगळवारी अनंत मूळ वनस्पतीची मुळी आणून लाल धागा बांधावा व ही मुळी आपल्या दंडावर बांधावी.

24. दर मंगळवारी ‘ॐ हनुमंते नमः’ या मंत्राचा जप १०८ वेळा करावा

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment