
बुधाचे पारंपारिक उपाय
1. बुधवारी गणपती अथर्वशीर्षाचे पाठ करणे फलदायी ठरेल. तसेच महिन्यातून येणारे दोन्ही चतुर्थीला देखील पाठ करणे शुभ ठरेल.
2. या व्यतिरिक्त आपण गणपती मंदिरात जाऊन दूर्वा अर्पित कराव्या आणि लाडू किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवावा.
3. बुधवारी किन्नरांना पैसे दान करावे. आंणि त्यांच्याकडून काही पैसे आशिर्वाद म्हणून घ्यावे. त्यांनी दिलेले पैसे पूजा स्थळी ठेवून धूप-उदबत्ती दाखवावी. नंतर हिरव्या कपड्यात गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागी ठेवून द्यावे. याने बरकत येते.
5. आपण तांत्रिक उपाय करू इच्छित असल्यास बुधवारी 7 कवड्या घ्याव्या. यासि मूठभर अख्खे मूग घ्यावे आणि दोन्ही वस्तू हिरव्या कपड्यात गुंडाळून गुपचुप एखाद्या मंदिराच्या पायरीवर ठेवून यावे. याबद्दल कोणालाही सांगू नये. याची चर्चा करू नये.
6. दारू, मांस, अंडे खाणे टाळा
7. रात्री डोक्याजवळ पाणी ठेऊन सकाळी ते पाणी पिंपळाच्या झाडाला चढवा.
8. मुंग डाळ रात्री भिजवून सकाळी जनावरांना खाऊ घाला.
9. मेंढी, बकरी आणि पोपट पाळू नका.
10. तांदूळ किंवा दुध मंदीर किंवा धार्मिक स्थळावर दान करा.
11. कावळ्याला जेऊ घाला.
12. बुधाची अनिष्टता दूर करण्यासाठी तांब्याच्या गोल नाण्याला मधोमध भोक पाडून वाहत्या पाण्यात सोडावे किंवा कवड्यांची राख करून ती समुद्रात सोडावी.
13. बुध केतूबरोबर लग्न व सुखस्थान सोडून इतर कोणत्याही स्थानी असेल तर अनिष्ट होतो. अशा जातकाने नाक टोचून घ्यावे. तुरटीने दात स्वच्छ करावेत. लहान मुलींना पिवळ्या रंगाचा हलवा खाऊ घालावा. मंदिरात केशर अर्पण करावा.
14. बुध तृतीय स्थानी बसून अनिष्ट फले देतो. मंगळवारी रात्री मूठभर मुगाची डाळ भिजत घालावी व बुधवारी सकाळी ही डाळ पक्ष्यांना खाऊ घालावी. असे ४३ वेळा करावे. हिरवे मूग दान करावेत.
15. वरधारा वनस्पती ताईतात बंद करून धारण करावी.
16. गहूला वनस्पती ताईतात बंद करून त्या पाण्याने स्नान करावे.
17. मातीच्या भांड्यातून पाणी प्यावे.
18. लिंबाचे झाड लावल्यास बुधाची अनिष्टता संपते.
19. दुर्गादेवीची उपासना करावी. घरात शंख किंवा ताईत ठेवावा.
20. मुलाच्या वाढदिवशी फरसाण वाटावे.
21. मांसाहार करू नये. दारू पिऊ नये. घरात मनीप्लांट लावू नये.
22. मेव्हणीला आपल्या घरात ठेवू नये.
23. तांदूळ व दूध मंदिरात दान केल्यास बुधाची अनिष्टता संपते.
24. लोखंडाच्या गोल गोळीवर रंग चढवून ती गोळी नेहमी जवळ ठेवावी.
25. बुधवारचा उपवास किंवा बुध प्रदोष करावा. शुभ्र बुधवार व्रत करावे.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)