छायाग्रह राहू पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Rahu)


राहूचे पारंपारिक उपाय

1. चांदीचा शिक्का सदैव आपल्या जवळ ठेवा.

2. वाहत्या पाण्यामध्ये राहूच्या वस्तुंना प्रवाहित करा.

3. गंगा स्नान करा

4. काळ्या कुत्र्याला पाळा अथवा त्याला जेवण खाऊ घाला.

5. आंधळ्या लोकांची मदत करा

6. मांस- मासे, मद्यपान इत्यादी मादक पदाथाांचे सेवन करू नका

7. भ्रष्टाचारापासून सदैव दूर रािा

8. निर्धन व्यक्तीस आर्थिक रूपात मदत करा

9. लोखंडाचा छल्ला अथवा कडे घालणे लाभदायक ठरेल.

  • राहूची अनिष्टता दूर करण्यासाठी प्रभावी उपाय – –

) राहूची अनिष्टता दूर होण्यासाठी एक लोखंडी खिळा, तांब्याचा पैसा व लाकडी कोळसे सव्वा किलो या तीन वस्तू वाहत्या पाण्यात सोडाव्यात.

) पंचम स्थानी राहू असेल, तसेच पत्नी व संतती या दोघांच्या सुखात अडथळे येत असतील तर त्याच पत्नीशी पुन्हा विधिपूर्वक लग्न लावावे. वडिलोपार्जित घराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीवर चांदीचे स्वास्तिक ठोकावे.

३) अनिष्ट राहूमुळे सडकून ताप येतो. शत्रू वाढतात. विनाकारण भटकावे लागते. मानसिक तोल ढळतो अशा वेळी
अ) सकाळी लवकर उठून मसूर डाळ व काही नाणी भंग्याला द्यावीत. आ) जवसाचे काही दाणे उशाला ठेवून झोपावे व सकाळी लवकर उठून पक्ष्यांना खायला घालावेत.

इ) जवसाचे काही दाणे दुधाने धुऊन वाळवून वाहत्या पाण्यात सोडावेत.

ई) क्षयरोग झाला असेल तर जवसाचे काही दाणे गोमूत्राने धुऊन वाळवून लाल फडक्यात बांधून ही पुरचंडी नेहमी जवळ बाळगावी. रोज सकाळी गोमूत्राने दात स्वच्छ करणे.

४) कोर्ट-कचेरीची लफडी चालू असतील व त्यामुळे वैताग आला असेल, दंड होण्याची शक्यता असेल तर स्वत:च्या वजनाएवढे कोळसे वाहत्या पाण्यात प्रवाहित करावेत.

५) राहू जर द्वादश स्थानात असेल, आणि व्यर्थ खर्च अचानक उद्भवत असतील भांडणतंट्यामुळे त्रास होत असेल, चोरी व खोट्या आरोपांची धास्ती वाटत असेल व नेहमी आर्थिक चणचण भासत असेल तर अशा जातकाने स्वयंपाक घरात बसूनच जेवावे. आपल्या झोपण्याच्या खोलीचे व दरवाजांचे पडदे लाल रंगाचे वापरावेत. फर्निचरही लाल रंगाचे असावे. गादीवरील चादर व उशांचे अभ्रेसुद्धा लाल रंगाचे असावेत.

६) एक नारळ समुद्रात सोडावा.

७) ब्राह्मणाला नमस्कार करावा.

८) चांदीची भरीव गोळी सदैव जवळ बाळगावी.

९) चांदीच्या ग्लासामधून पाणी प्यावे.

१०) पायात पादत्राणे न घालता फिरू नये.

११) गळ्यात पिवळा धागा बांधावा.

१२) एक खोटे नाणे अधेली, पावली ४३ दिवस रोज एक याप्रमाणे वाहत्या पाण्यात सोडावे.
१५) काळे कुत्रे पाळावे.

१३) चांदीचा एक चौरस तुकडा नेहमी खिशात ठेवावा.

१४) मुलगी व बहीण यांना खुश ठेवावे.

१६) शरपुंखा वनस्पतीच्या मुळ्या अंघोळीच्या पाण्यात घालून अंघोळ करावी

-ज्योतिषमित्र मिलिंद

For any query or Astrological guidance feel free to contact on 7058115947 (whatsapp)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

Leave a comment