छायाग्रह केतू पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Ketu)


केतूचे पारंपारिक उपाय

1. डोक्यावर केशर किंवा हळदीचा टिळा लावावा.

2. वृद्ध किंवा लाचार व्यक्तीची मदत करा.

3. कानामध्ये सोन्याची बाळी घाला.

4. दुधात केशर घालून प्या

5. पिता किंवा पुरोहितांचा सन्मान करा.

6. कुत्रा पाळणे चांगले असेल.

7. केतूची अनिष्टता निवारण्यासाठी गणेशपूजन करावे व २१ संकष्टी चतुर्थी व्रत करावे.

8. कुत्र्याला चपाती, भाकरी द्यावी.

9. कोणत्याही मंदिरात काळी वाकळ दान करावी.

10. पायाला व लघवीला त्रास होत असेल तर शुद्ध रेशमाचा पांढरा धागा उजव्या मनगटावर बांधावा.

11. अंघोळीच्या पाण्यात लोध वनस्पती टाकून अंघोळ करावी.

12. अनिष्ट केतूमुळे आरोग्य चांगले राहत नसेल तर केशर उगाळून त्याचा गंध कपाळावर ४३ दिवस लावावा.

13. केतूचे अशुभत्व दूर करण्यासाठी सोन्याची अंगठी उजव्या हातात घालावी.

14. अनिष्ट केतुमुळे लघवी थेंब-थेंब होत असेल किंवा सतत मृत्यूचे भय

वाटत असेल तर पायाच्या अंगठ्यात चांदीची रिंग वापरावी.

९) केतूची अनिष्टता दूर करण्यासाठी स्वतःचे कान टोचून घ्यावेत. १०) लोखंडाच्या भरीव गोळीला लाल रंग देऊन ती गोळी कायम जवळ बाळगावी.

११) केतूची अनिष्टता दूर होण्यासाठी मुळ्याची भाजी पानासहित चांदण्या रात्री आपल्या पत्नीच्या उशाला ठेवावी. नंतर सकाळी मंदिरात दान करावी.

१२) माकडांना गूळ खाऊ घालावा.

१३) चारित्र्य शुद्ध ठेवल्यास केतूची बाधा होत नाहीत.

१४) काळे कुत्रे पाळावे.

१५) दुधात अंगठा भिजवून चोखावा धनप्राप्तीस मदत होते.

१६) चांदीच्या लहानशा डबीत मध भरून ठेवावा. १७) पित्याचे श्राद्ध केले तर अनिष्ट केतू संतुष्ट होतो.

१८) केतूची अशुभता दूर करण्यासाठी प्रथम चार दिवस पिवळे चार लिंबू आणि त्यानंतर चार दिवस पिकलेली चार केळी लागोपाठ ४ दिवस मंदिरात अर्पण करावेत.

१९) वारंवार बदली होत असेल तर लागोपाठ चार दिवस चार पिवळ्या सालीचे लिंबू पाण्यात प्रवाहित करावेत.

-ज्योतिषमित्र मिलिंद

For any query or Astrological guidance feel free to contact on 7058115947 (whatsapp)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

Leave a comment