
चंद्राचे पारंपारिक उपाय
1. पुत्र सुखासाठी भूमीमध्ये शोपा (बडीशोप) दाबा.
2. घरात चांदीचे ताट शुभ असेल.
3. समुद्रा मध्ये पैसे टाका.
4. गरजू लोकांना जल आणि दूध पाजा.
5. शंकराची भक्ती, उपासना करा.
6. उशीपाशी स्वच्छ भांड्यात पाणी किंवा दूध ठेवून झोपावे व ते सकाळी तुळशीच्या झाडाला घालावे.
7. तांदूळ, पांढरे वस्त्र, शंख, पांढरे चंदन, पंढरी फुले, साखर, बैल, दही, मोती, मैदा यांचे यथाशक्ती दान करावे.
8. चांदीचे कडे, चांदीची अंगठी, चांदीची साखळी, चांदीचे पैंजण धारण करावे.
9. रात्री उशिरापर्यंत जागत बसू नये.
10. शंकराला खीर किंवा राबडीचा नेवैद्य दाखवावा व मुलीना खाऊ घालावा.
11. चंद्र मातृकारक असल्याने आई किंवा मामाने दिलेली चांदीची अथवा पांढरी भेटवस्तू सांभाळून ठेवा.
12. ‘ओम सोम सोमाय नमः’ हा मंत्रजप रोज १०८ वेळा करणे चांगले.
13. अनिष्ट चंद्रामुळे आईला आजारपणाचा त्रास, रोग, धननाश या घटना घडतात. या दूर करण्यासाठी रविवारी रात्री चांदी/स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात दूध घालून हे भांडे उशाला ठेवावे. सोमवारी सकाळी झोपेतून उठल्यावर कोणाशी न बोलता हे दूध पिंपळ/ बाभळीच्या झाडाला घालावे.
14. कब्रस्तान किंवा स्मशानातील विहिरीचे पाणी नेहमी घरात ठेवावे.
15. वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करावा.
16. लहान मुलांना नियमित दूध पाजावे.
17. रोज चंद्रपूजा करावी.
18. जन्मकुंडलीत चंद्र एकादश स्थानी व केतू तिसऱ्या स्थानी असेल तर बाळंतपणाच्या वेळी मातेला कष्टप्रवास त्रासदायक होतो. रव्याचे २१ लाडू लहान मुलांना खाऊ घालावेत किंवा नदीत प्रवाहित करावे. अनिष्टता दूर होते.
19. ५ सोमवारचे व्रत करावे. सोमप्रदोष करावा.
20. सोमवारी मीठ व अन्नसेवन करू नये. संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन पंचामृताचा शिवलिंगावर अभिषेक करावा. बेलपत्र व पांढरी फुले अर्पण करावीत. धूपारती करून नमस्कार करावा.
-ज्योतिषमित्र मिलिंद
For any query or Astrological guidance feel free to contact on 7058115947 (whatsapp)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in