गुरु ग्रह पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Jupiter)


गुरु चे पारंपारिक उपाय

1. गुरुवारी केळीच्या झाडावर जल अर्पित करुन शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि गुरुच्या 108 नावांचे उच्चारण करावे. असे केल्याने लवकरच जीवनसाथीदाराचा शोध पूर्ण होतो.

2. शीघ्र विवाहासाठी गुरुवारी उपास करावा विशेष रूपाने या दिवशी पिवळे वस्त्र नेसावे.. आहारात देखील पिवळ्या रंगाचे पदार्थ सामील करावे.

3. व्यवसायात अडथळे येत असल्यास गुरुवारी देवघरात हळदीची माळ लटकवावी. आपल्या कार्यस्थळी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा वापर करावा. तसेच भगवान लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरात लाडूचा नैवेद्य दाखवावा.

4. घरातनू दारिद्र्य दूर करण्यासाठी गुरुवारी कुटुंबातील सदस्य विशेषत: स्त्रियांनी केस धुऊ नये. तसेच या दिवशी नखे कापू नये.

5. नोकरीत प्रमोशन होत नसेल किंवा रोजगार संबंधी अडचणी येत असल्यास गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू जसे खाद्य पदाथा, फळं, कपडे इतर वस्तू दान कराव्या.

6. हळदीची गाठ पिवळ्या रंगाच्या धाग्यामध्ये बांधून उजव्या भुजेवर बांधले पाहिजे.

7. 27 गुरुवार पर्यंत केशराचा टिळा लावणे आणि केशरची पुडी पिवळ्या रंगाच्या कपड्यात किंवा कागदात आपल्या आसपास ठेवले पाहिजे.

8. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे आणि घरात पिवळ्या रंगाचे पडदे लावणे शुभ असते.

9. घरात पिवळ्या सुरजमुखीचे रोपटे लावले पाहिजे.

10. सोन्याची चेन आणि बृहस्पती यंत्र धारण केले पाहिजे.

11. व्यक्तीला माता-पिता, गुरुजन आणि अन्य पूजनीय व्यकतींच्या प्रति आदर आणि सन्मानाचा भाव ठेवला पाहिजे.

12. कुठल्या मंदीर किंवा धार्मिक स्थळावर जाऊन नि:शुल्क सेवा केली पाहिजे.

13. गुरुवारच्या दिवशी मंदीरामधे केळीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावला पाहिजे.

14. गुरुवारच्या दिवशी पिठाच्या पेढ्यामध्ये चण्याची डाळ, गूळ आणि हळद टाकून गाईला खाऊ घातले पाहिजे.

15. गुरू अध्यात्मिक ज्ञानाचे कारक असल्याने बुद्धिजीवी व्यक्ती आणि गुरुजनांचा सन्मान करा.

16. गुरुवारच्या दिवशी ‘ॐ बृं बृहस्पतये नमः!’ मंत्राचा जप करा.

17. गुरुवारी बृहस्पतीच्या वैदिक मंत्राचा जप केल्याने जाडपणा आणि पोटासंबंधित आजार दूर होतात.

18. गुरुवारी बृहस्पतीच्या पूजेमध्ये गंध, अक्षत, पिवळे फुल, पिवळे पकवान्न आणि पिवळे वस्त्र यांचे दान करा.

19. गुरुच्या संबंधित उपाय गुरुवारच्या दिवशी गुरुचे नक्षत्र (पुनर्वसू, विशाखा, पूर्वा भाद्रपदा) आणि गुरूच्या होरा मध्ये केले पाहिजे.

20. केशर उपयोगात आणावे. जीभ व बेंबीवर केशराचे गंध लावावे.

21. पिवळ्या रंगाची वस्तू मंदिरात दान करावी, पिंपळाच्या झाडाला नियमित पाणी घालावे.

22. गुरुवारचा उपवास धरावा.

23. एकत्र कुटुंबात राहावे. मंदिर स्वच्छ करावे.

24. दुर्गापूजन करावे. गुरुप्रदोष व्रत करावे.

25. कोणालाही आपले नग्न शरीर दाखवू नये.

26. आरंगमूळ नावाची वनस्पती ताईतात घालून धारण करावी.

27. गुरुवारी अंघोळीच्या पाण्यात नागरमोथा घालून अंघोळ करावी.

28. गळ्यात माळा घालू नये. दारू पिऊ नये.

-ज्योतिषमित्र मिलिंद

For any query or Astrological guidance feel free to contact on 7058115947 (whatsapp)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

Leave a comment