नवग्रह पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Planets)


नमस्कार मित्रांनो,

फार पूर्वी फलज्योतिष हा शब्द प्रचारात नव्हता. ज्योतिष किंवा ज्योति:शास्त्र हा शब्द प्रचारात होता, ज्योति म्हणजे आकाशातील दीप्तीमान गोल. ज्योतिष हा शब्द मुख्यत: खगोलशास्त्र या अर्थाने वापरीत असत. त्याचा उपयोग यज्ञयागादि धर्म-कृत्ये करण्यासाठी चांगला काल कोणता ते ठरवण्यासाठी केला जात असे. त्यात अर्थातच शुभाशुभत्वाचा भाग असे. कालांतराने ज्योति:शास्त्राचे तीन स्कंध होउन त्याना सिद्धांत-स्कंध, संहिता-स्कंध आणि होरा-स्कंध अशी नावे मिळाली. पहिला सिद्धांत-स्कंध पूर्णपणे खगोलगणिताशी संबंधित होता. दुसरा संहिता-स्कंध हा ऋतूमानानुसार नागरी जीवनातील कृत्ये व कर्तव्ये केव्हा म्हणजे कुठल्या नक्षत्रावर व मुहूर्तावर करावीत हे सांगणारा होता. तिसरा होरा-स्कंध हा व्यक्तीच्या आयुष्यातील घटना वर्तवणारा होता, तो म्हणजेच आजचे फलज्योतिष .


ज्योतिष शास्त्राची व्याप्ती आज खुपच वाढत चालली आहे व त्यात तोडगे,यंत्र, मंत्रतंत्र, दैवी उपाय, सिद्धी, उपासना, रत्ने या गोष्टींनी शिरकाव केल्याने व त्याचा आर्थिक फ़ायद्याचे महागडे चक्र अडचणीत असलेल्या जातकाचे डोक्यावर ठेवण्यात आले आहे. तर दुसरीकडे सोपे घरगुती उपाय व तोडगे सांगायला गेले की अंधश्रद्धा चे लेबल चिकटवले जाते.


पण नीट बघितले तर लक्षात येईल की, ग्रहांच्या कारकत्वाचा उदा. देवता, रंग व स्वभाव वैशिष्ट्ये अभ्यास करुन काही पारंपारिक उपाय व तोडगे सांगित्ले जातात. पीडा निवारण, संकट मूक्ती वा सौख्यासाठी याचा वापर करुन पाहण्यास काहीच हरकत नाही. दरवेळी महागडी रत्ने वा खर्चिक शांतीसारखे उपाय करणे गरजेचे नाही. येथे नवग्रहांसाठी वापरण्यात येणारे काही पारंपारिक तोडगे देत आहे. अर्थात त्यात स्थळ, काळानुसार त्यात बदल करण्यास हरकत नाही. त्यामुळे काही नाही तरी सकारात्मक उर्जा नक्की प्राप्त होईल जी तुम्हास बळ देईल.

-ज्योतिषमित्रमिलिंद

1. रवी ग्रह पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Sun)

2. चंद्र ग्रह पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Moon)

3. मंगळ ग्रह पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Mars)

4. बुध ग्रह पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Mercury)

5. गुरु ग्रह पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Jupiter)

6. शुक्र ग्रह पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Venus)

7. शनी ग्रह पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Saturn)

8. छायाग्रह राहू पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Rahu)

9. छायाग्रह केतू पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Ketu)

-ज्योतिषमित्रमिलिंद

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन साठी संपर्क :

whatsapp no. (७०५८११५९४७)

e mail : contact@jyotishmitramilind.in

For More info Visit : jyotishmitramilnd.in

5 thoughts on “नवग्रह पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Planets)

  1. वा सुंदर व खूप छान माहीती दिलीआहे़़ खूप सोपं करून सागितलेआहे़

    Liked by 1 person

  2. आज खूप दिवसांनी पुन्हा एकदा छान माहिती दिलीत.करता येणारे सोपे उपाय. नुकसान काही नाही झाला तर फायदाच होईल. Thank you.

    Liked by 1 person

  3. तुमचा अचूक ,,,, अफाट सूक्ष्म अभ्यास ,, ज्ञान , लगन मी खूप जवळून पाहिलं आहे ,, उत्तम अनुभव पण आहेत 🙏

    विजय भापकर, पुणे

    Liked by 1 person

Leave a comment