तुळ राशीफ़ळ ( Tula Rashiphal )


तुळ राशीफ़ळ ( Tula Rashiphal )

(7) तुळ-

तुळ ही राशी चक्रातील ७ वी राशी आहे. चित्राचे ३ रे व ४ थे चरण, स्वाती व विशाखाचे १ ले २ रे ३ रे चरण ही नक्षत्रे या राशीत येतात. ही वायु, चर, सकारात्मक, पुरुष, वैश्य, मानवीय, व्दिपाद, दीर्घ उदीत राशी आहे.

शनी या राशीमधे उच्च असतो व सूर्य नीच असतो. चंद्र, मंगळ, गुरु या राशीत स्थित असता ते शत्रू घरी मानले जातात.

1.शारिरिक आकृती- तुळ लग्नामधे जन्मलेल्या व्यक्ती ऊंच व उचीत तुलनात्मक शरीराचा असतो. त्याचे ओठ पातळ पण मजबुत असतात. तो दिसण्यामधे रेखीव, हसतमूख, व प्रमाण्बद्ध शरीराचा असतो. त्याच्या भुवया त्याच्या रेखीव पणास बाधा आणू शकतात. वयस्कर झाल्यावर डोक्याला पुढील बाजूस टक्कल पडते. नाक बाकदार असते.

2.विशेषता- तुळ जातक संतुलित डोक्याचे असतात. ते मानसिक स्थिती स्थिर राखू शकतात. गुण व अवगुण दोन्ही मापू शकतात. त्यांची विचार धारा शांत स्वरुपाची असते. ते सर्वोत्तम न्यायवादी आहेत. जेव्हा ते वादविवाद करतात तेव्हा इतरांच्या तुलनेत विशिष्ट ठसा उमटवतात. ते रचनात्मक कार्य करु शकतात.

शुक्र या राशीचा स्वामी असल्याने तुळ जातक द्याळू, सभ्य व विनीत असू शकतो. ( लग्न वा शुक्र शुभ असता) ते नेहमी सुखी व अनुकुल जीवन व्यतीत करणे पसंत करतात.ते स्वत:हून कधी वाम मार्ग स्वीकारत नाहीत. ते कोण्त्याही किंमतीमधे शांती विकत घेतील. ते ईमानदार व सहानुभूतीयुक्त असतील. त्यांना राग आला तरी लवकर शांत होतात. ते आयुष्यातील सर्व सुख उपभोगतात व आनंदी आयुष्य जगायचा प्रयत्न करतात. ते पोषाख, सुगंधी वस्तू, कला, संगीताचे प्रेमी असतात. शुक्र हे दाखवतो की तुळ जातक अनेक गोष्टीत रुची दाखवतील व चर राशी असल्याने त्यांची आवडनिवड बदलत राहील. फ़ोटोग्राफ़ी, वाचन, चित्रकला, पेंटिंग, कशीदाकारी ई. गोष्टींची आवड असू शकते.

तुळ राशी मेष राशीच्या प्रतियोगात आहे त्यामुळे तुळ जातक आपल्या व्यक्तिगत आरामाचा त्याग करेल पण इतरांकरता खुप कष्ट घ्घेतील. तुळ जातक राजनीती कुशल, प्रसिद्ध व लोकप्रिय असू शकतात.

तुळ राशी वायु राशी असल्याने उत्तम कल्पकता देते. वास्तविक आत्म शक्ती, तेज बुद्धी, आनंददायक स्वभाव देते. तुळ जातक अन्य बाबींचा विचार करुन उत्तम योजना बनवण्यास सक्षम असतो. शनी या राशी मधे उच्च असतो त्यामुळे जातक एकाग्र शक्ती, ध्यान मग्न, व अध्यात्मिक मार्गात उच्च स्थानि पोहोचू शकतात. समाजात इतरांना मार्गदर्शन करु शकतात. तुळ जातक वाद्विवाद मधे विश्वास ठेवत नाहीत. उलट मतभिन्नतेमधे मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न करतील. त्यांचा मूळ स्वभाव अहंकाररहित व मानव प्रेमी असतो. जेव्हा कोणी एखादा चूक करतो, तुळ जातक लवकर्च ती विसरुन जातो. ते भौतिकतेपेक्षा अध्यात्मिक जास्त असू शकतात. तुळ जातक चांगल्या कामाकरता दान करतात व उदार व दयाळू असतात.

तुळ पुरुष राशी आहे व राशीमालेतील ७ व्या स्थानाची राशी आहे ( ७वे स्थान स्त्री दर्शवते) त्यामुळे तुळ जातकामधे खुप वैवाहिक प्रेम असते व दुसरेंच्या भावनेला धक्का न देणारे असतात. ते सरळ प्रकृतीचे, चतुर व हृदय जिंकणारे असतात. तुळ जातक आपल्या जोडीदाराबरोबर आनंदपुर्ण जीवन व्यतीत करतात. तुळ जातकास कह्यात घेणे अवघड असते. तो विरोधकांना शांतपणे कूत नीतीने वा छ्ळ कपटाने नामोहरम करेल.

मंगळ व्दितीयेष असल्याने निर्भयता देतो. ते आपला तर्क व विचार स्पष्ट मांडू शकतात. तो कोणत्याही परिस्थितीचा सामना युक्ती-प्रतियुक्ती ने करु शकतात. तुळ जातकाचे काम सुंदर व स्वच्छ असते. त्यांची शैली सुंदर व आकर्षक असते, जी लोकांच्या मनात शांत भावना निर्माण करु शकते.

राशीचा स्वामी शुक्र असल्याने तुळ जातक कपडे, फ़र्निचर, साधन व सुविधांमधे बरीच रुची ठेवतो. ते आपल्या जोडीदारास नेहमी प्रसन्न ठेवतील. जोडीदारा असा असेल की तो याच्या प्रेमात हरखून व हरवून जाईल. पण तुळ जातक आसापासच्या वातावरणावरही लक्ष ठेवून असेल. तुळ जातक तुळ्वर अथवा शुक्रावर मंगळाची दृष्टी असल्यास रसिक असतात व संगीताची आवड असते. शनीची दृष्टी असल्यास दर्दभरे संगीत आवडते. गुरुची दृष्टी असल्यास प्रार्थना वा भजन आवडते, चंद्र श्रोत्यांना मंत्रमूग्ध करणारे मधुर संगीत दाखवतो.

3.कमजोरी- तुळ जातकाने निर्णय वेळेत घेण्याचा प्रयत्न करावा, कारण त्यांच्या मेंदूत एका पाठोपाठ एक विचार उत्पन्न होत राहतात व ते त्यात अडकून राहतात. इतरांचे राहणे व अडाणीपणाची नक्कल करणे टाळावे. ते अहंकारी असतात. सर्व प्रिय राहण्याच्या नादात, काही मित्र तुमचा गैरफ़ायदा घ्यायचा प्रयत्न करतात, तेव्हा अशा मित्रांशी सावधानतेने व्यवहार करावा. तुळ जातक नेहमी माफ़ करण्यास व झालेले विसरण्यास तयार असतात. माफ़ करा पण धडा न घेता विसरणे हे टाळा. तुळ जातक हे नेहमी अनुभव करतील की त्यांना प्रत्येक ठिकाणी नवीन पोषाख हवा व रीती रिवाज सांभाळण्यासाठी जास्त खर्च करतील, पण हे स्वीकारणार नाहीत की उपजत व्यक्तिमत्वाचा प्रभाव असेल तर जास्त सजावट, दिखाव्याची आवश्यकता नाही.

4.धन व संपत्ती- तुळ जातक भागिदारीमधे व्यवसाय करण्यात हुशार असतात. तुळ जातक सल्लागार होऊ शकतो व त्याचा जोडीदार त्याप्रमाणे देखरेख ठेवेल तर ते फ़ायदेशीर ठरते. कारण तुळ जातक योग्य व वास्तविक सल्ला, तार्किक विचार व पुर्वानुभवाचे अवलोकन करुन योग्य सल्ला देऊ शकतो. तुळ जातक प्रशंसक व आलोचक असल्याने व्यावसायिक फ़ायदा मिळवण्यासाठी योग्य असतात. तुळ जातकाची हृदय जिंकण्यात हातोटी असते, त्यांचे व्यक्तीमत्वाचा प्रभाव, ग्राहकास खुश करण्याचे कसब, हसणे, गोड बोलणे याचा प्रभाव पडतो. त्यामुळे नोकरीत मालकाचा वा व्यवसायात अधिक फ़ायदा मिळवू शकतात.

तुळ जातकाची आवश्यकतेची संकल्पना इतरांपासून वेगळी असते. त्यामुळे कधीकधी वायफ़ळ खर्च करतात. ते कमी खर्चिक असणे हे दुर्मिळ, त्यामुळे बरेचसे धन हे खर्च होण्यात जाते. त्यांनी अनावश्यक व अवास्तव खर्च करने टाळले तर चांगली कमाई व संपत्ती राखू शकतात.

5.नोकरी व्यवसाय- १० वे स्थानाचा अधिपती चंद्र असल्याने नोकरी व्यवसाय तरल पदार्थांशि संबंधित, ड्रगिस्ट, केमिस्ट, पेंटर, जलविद्युत इंजिनीयरींग, ट्रान्सपोर्ट, सामुद्रिक, खाद्य, दुध, फ़ळे संबंधित असू शकतो.

तुळ शुक्राची व वायु राशी असल्याने २ रे, ६ वे , १० वे स्थानाशी संबंधित ग्रह, राशीव्दारे दर्शवलेले नोकरी, व्यवसाय, लेखक, कादंबरीकार, संगीत क्षेत्र, शिल्पकार, नर्सरी, वायुसेना, स्त्री पुरुष समुपदेशन, स्वागतकर्ता, ई संबंधित नोकरी व्यवसाय करु शकतो.

6.आरोग्य- साधारणपणे तुळ जातकाची शारिरिक बनावट उत्तम असते. पण संक्रमक रोगापासून लांब राहण्याची प्रतिकार शक्ती कमी पडते, त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावयास हवी. तुळ जातकाने त्रास होऊ नये म्हणून खालचा पाठीचा कणा, किडनी, कुल्हे, कंबरेमधे दुखणे, पोलिओ यां बाबतीत योग्य ती खबरदारी घ्यावी. स्त्रियांना गर्भाशयाचा त्रास होऊ शकतो.

7.कौटूंबिक- तुळ जातकाचे कौटुंबिक जीवन आनंदी असेल. व ते कौटुंबिक शांती टिकवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे घर सुखसुविधा व विलासी गोष्टींनी युक्त असते. इंटेरिअर, डिझाईन, पेंटिंग्ज, पडदे ई सर्व उच्च प्रतीचे असते. परिवारामधे बहुमूल्य दागिणे असतील व आनंदई प्रसंगात मिरवतील. ते जीवनात सर्व उपभोगाचा आनंद घेतात. तुळ जातक आपले घर, परिवार, संपत्तीवर फ़ार प्रेम करतात.

तुळ जातकाचे आई वडील ऒफ़ीसमधून धावत पळत घरी जातील, जेणे करुन अधिक काळ मुलासमवेत घालवता येईल. कार्यालयीन काम कार्यालयातच पूर्ण करुन घरी त्यांना यायला आवडेल.

तुळ जातक संर्वांचे मित्र बनून जातात, कारण ते ईमानदार, न्यायप्रिय, द्याळू, विनम्र व उदार असतात. ते निर्मळ मैत्री कायम करु शकतात. ते मित्रांसमवेत रमतात. सूर्य ११ वे स्थानाचा स्वामी असल्याने त्यांची शासकीय व्यक्तींबरोबर ऊठबस असेल. ते आपले अधिकांश जन जीवन सामाजिक व आर्थिक सफ़लतेमधे व्यतीत करतात. सुर्याची शुभ दृष्टी त्यांना लोकांपासून फ़ायदा देते. ते या लोकांवर खर्च करतील जे पुनर्वसू, विशाखा, पूर्वा भाद्रपदा, आश्लेषा, ज्येष्ठा, रेवती या नक्षत्रांवर जन्मलेले असतील, कारण ते जातकास सहाय्यकारी नाहीत.

8.प्रेम- तुळ जातक यौन जीवनात रमतात व प्रणयांत माहीर असतात. आपल्या विश्वसनीय प्रेमाने आपल्या साथीदारास ताब्यात ठेवतात. या व्यतिरिक्त व्यक्तिमत्त्व, शैली, पोषाख, सुगंधित वस्तू, मधाळ वागणे मोहात पाडणारे असते. तुळ जातकांस वासना आकस्मिक रुपाने उत्पन्न होतात व चर राशी असल्याने लवकर शांत ही होतात. पन ज्यावेळी ते आपल्या जोडीदाराबरोबर आनंदी क्षण अनुभवत असतात तेव्हा धुंद होतात. भौतिक आनंदाची प्रवृत्ती असल्याने आपले विचार, अपेक्षा स्पष्ट रुपाने मांडतात व चांगले विचार विनिमय करुन सुख प्राप्त करतात. तुळ राशीच्या मुलींना माहीत असते की पुरुष त्यांचे बरोबर लगट करेल. पण त्यांना त्याचे आकर्षण असू शकते. व मनपसंत सुखाचा जोडीदार मिळाल्यास हसुन त्याचे आभार मानतील.

9.वैवाहिक- तूळ जातक वयात आल्यावर लवकर विवाहबद्ध होतात. ते एकमकांना फ़ार महत्व देतात. व आपल्या कौटुंबिक व सामाजिक आयुष्यात खुश राहतात. तुळ जातकांना उच्च राहणी आवदत असल्याने मनपसंत जोडीदार न मिळाल्यास असंतुष्ट राहतील.

तुळ कन्या बुद्धिमान, युक्तीबाज, चतुर असतात. त्या कधिही मोठ्या विवादामधे पडत नाहीत व शांतीपूर्ण वातावरण टिकवण्यासाठी प्रयत्न करतात. तुळ स्त्रिया विलासी जीवन जगतील व आपल्या जोडीदारास प्रेम व आराधना करतील.

तुळ पुरुष जातक प्रसन्नचित्त, दयावान, समयोचित स्वभावाचे असतात. ते आपल्या परिवारासाठी लागणारे सुखवस्तू, सुविधा ई उच्च प्रतीच्या उअपलब्ध करुन देतील. ते फ़ार भाऊक असतात. आपल्या प्रेमाचे भरपूर प्रदर्शन करतात. त्यांना जोडीदाराची तशीच साथ नाही मिळाली तर फ़ार निराश होतात. पण साधारणत: घटस्फ़ोट ही देत नाहीत व निभाऊन नेण्याचा प्रयत्न करतात. २ रे ७ वे ११ वे स्थान जे वैवाहिक जीवन दाखवतात त्याचे स्वामी मंगळ व सूर्य आहेत त्यामुळे ते शीघ्र उत्तेजित होणारे व घाई करणारे असतात. ते जोडीदाराचे म्हणणे ऐकून घेतील पण आपल्याला जे वाटते ते वागण्याची घाई करतील. त्यामुळे तुळ जातकास जोडीदाराची चिड्चिड कमी करावी लागते, पण ते मन रिजवण्यात व शांती टिकवून ठेवण्यात कुशल असतात.

मिथुन व कुंभ जातक जोडीदार म्हणून योग्य असतात. मीन, मकर, कर्क यांचेशी सहमत होत नाहीत. बाकी राशींबरोबर तुळ जातक निभाऊन नेतील.

10.संतती- ५ वे स्थानाचा अधिपती शनी असल्यांने साधारणत: तुळ जातकास अल्प संतती असू शकते. कारण शनी कर्तव्यशील ग्रह आहे. तुळ जातकाची मुले त्याची वृद्धावस्थामधे सेवा करतील. तुळ जातक आपल्या मुलांशी असा प्रेमळ व्यवहार ठेवतात की त्यांची मुले आनंदाने त्यांचे आदेशाचे पालन करतील.

जी मुले शनीची उच्च राशी तुळ मधे जन्म घेतात, ते आपल्या कूट्नीतीसाठी प्रसिद्ध असतील. ते कधीही भांडण करत नाहीत. ते इतरांकडे ही लक्ष देतील, त्यांचा दृष्टिकोण समजावून घेतील, ते त्याचा योग्य उपयोग करतील व अतिवादी होणार नाहीत. पक्षपाती नसतात. नम्र व इमानदार असतात. सकारात्मक असतात, नाही म्हणत नाहीत.

11.भाग्य दिवस- रविवार, सोमवार सफ़लतादायक व भाग्यशाली आहेत. शनिवार पन सफ़लता देतो कारण केंद्र व कोण ४ व ५ चा स्वामी आहे. मंगळवार स्पर्धा, मुकादमा, कोर्ट, निवडणूक ई करता शुभ. बुधवार दीर्घ यात्रा, विदेशी लोकांशी स्पर्धा, मौज, सामाजिक कार्य, आरामासाठि चांगला. गुरुवार अनिष्ट आहे. चुलत भाऊ, मित्र, जोडीदार यांचे गैरसमज होतात. ओव्हर्ड्राफ़्ट सुविधेसाठी चांगला आहे. शुक्रवार मिश्र फ़ळ देतो.

12.भाग्य रंग- संत्री, पांढरा, लाल रंग शुभ, हिरवा पिवळा निळा त्याज्य आहे.

13.भाग्य रत्न- हिरा, माणीक शुभ, पाचू, पोवळा, नीलम नको

14.भाग्यशाली अंक– 1, 4, 2, 7

-ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)

संपर्क: ७०५८११५९४७

For More info : Visit : jyotishmitramilnd.in

3 thoughts on “तुळ राशीफ़ळ ( Tula Rashiphal )

Leave a comment