कन्या राशीफ़ळ ( Kanya Rashiphal )


कन्या राशीफ़ळ ( Kanya Rashiphal )
  • (6) कन्या-

कन्या ही राशी चक्रातील ६ वी राशी आहे. उत्तरा फ़ाल्गुनीचे २ रे ३ रे ४ थे चरण, हस्त, चित्राचे १ ले व २ रे चरण या नक्षत्रात येतात. बुध या राशीचा अधिपती आहे. ही पृथ्वी, व्दिस्वभाव, नकारात्मक स्त्री राशी, बंजर, थंड, शुष्क, रात्रकालिन, उत्तरी, दीर्घ कालिन राशी म्हणवली जाते.

बुध या राशीमधे उच्च व शुक्र नीच असतो. सुर्य, चंद्र, मंगळ, गुरु या राशीमधे स्थित असतील तर ते शत्रू घरी मानले जातात. शनी कन्यामधे स्थित असेल तर मित्र घरी असतो.

बुध जातक धनापेक्षा बुद्धीला अधिक प्राधान्य देतात. आत्मिक धन व द्न्यान जे सरस्वती प्रदान करते, ते कधी नष्ट होत नाही व त्यावर डाका ही टाकू शकत नाही. कन्या जातक कोणाचेही, कसलेही कर्ज, ओझे, उधार आपल्यावर ठेवत नाहीत. शुभ बुध त्यास मोक्ष प्रदान करतो तर सांसारिक मोह वा अशुभ बुध त्यास अनैकतेकडे घेऊन जाऊ शकतो.

जेव्हा बुध जातक जन्मास येतो, त्याचे संगोपन सामान्यप्रकारे होते. कन्या जातक भाऊक असतात तरी त्यांचे विचार त्यापासून भिन्न असतात. कन्या राशीचे पृथ्वी तत्व त्यास एकांतप्रिय बनवते. व स्वभाव लाजाळू पण आत्मजागृत असतो. हा जातक कसे अनुभव येत जातात तसे त्यातून धडा घेऊन बदल घडवत जातात इतके की हाच तो जातक आहे हा प्रश्न पडावा व जशास तसे ही कला आत्मसात करतात.

1. शारिरिक आकृती- जातक उंच व दुबळ्या शरीराचा असू शकतो. केस व डोळे काळे असतात. भुवया दाट, केसाळ व वृत्ताकार असू शकतात. आवाज पातळ व तेज असेल. कन्या जातक जलद गतीने चालणारे असतात व पोट सुटलेले नसेल. क्रियाशीलतेमुळे ते वास्तविक वयापेक्षा लहान दिसतात. ते चतुर असतात पण कपटी नसतात. त्यांचे डोळे ईमानदार व स्पष्ट्वक्ते असल्याचे सांगून जातात. (दुसरी राशी तुळ ही शुक्राची राशि आहे)

2. विशेषता- कन्या राशीचा स्वामी परिवर्तनशील बुध आहे त्यामुळे आयुष्यात नेहमी काही ना काही बदल वा घडामोडी अपेक्षित आहेत. यांच्या संपर्कात अनेक स्वभावाचे लोक येत असतात व चांगले वाईट अनुभव देऊन जातात. पण ते आपल्या आंतरात्म्यास फ़ार मानतात व प्रतिकुल परिस्थितीचाही उत्तम तर्हेने सामना करण्यास सक्षम असतात.

कन्या जातक पूर्वनियोजित काम बुधिमत्तापूर्वक पूर्ण करतात. यांच्या व्यापारी प्रवृत्ती भिनलेली असते. आपल्या कामामधे हुशार व  तत्पर असतील व काम पूर्ण करण्याची घाई असेल. कन्या जातक अपेक्षा करतील की कोणतेही कार्य पटकन पूर्ण व्हावे व इतरांनी देखील व्यावसायिक दृष्टीकोण ठेवावा. पण जेव्हा तुम्ही स्वत: काम हाती घेता ते व्यवस्थित व विस्तृतप्रकारे करण्याकडे कल असतो व त्यामुळे लवकर मूळ मुद्य्यावर येत नाही. एखाद्या गोष्टीचे विश्लेषण करुन अगदी मूळापर्यंत जाऊन मग निर्णयावर याल. तुम्ही विवेकी आहात. तुम्ही इतरांच्या चुका पकडण्यामधे हुशार आहात. एखादे काम परत परत तपासून विचारपूर्वक कराल, पण एकदा काम पुर्ण केल्यावर परत परत तेच काम करायला आवडत नाही.

जन्म कुंडलीमधे बुध जर कमजोर असेल तर, तुम्ही असंतुष्ट रहाल. बुध बलवान असेल तर तुमची नेहमी प्रगती होत राहील व बुद्धी विकसित होत जाईल.

पृथ्वी राशि असल्याने तुमची ईच्छा पैसे वाचवण्याची असेल. व काही ना काही गुपचुप बचत करुन ठेवाल ज्याचा इतरांना सुगावाही लागू देणार नाही. जर कोठे प्रवास करत असाल तर काही पैसे एका खिशात व काही दुसरे खिशात ठेवाल व काही पैसे खर्च न करणेचे हिशोबाने सुटकेसमधे लपवून ठेवाल.

तुम्हास कोणतीही वस्तू अथवा माणूस त्याच्या योग्य जागेवर ठेवावयास आवडते. तुम्ही हिशोब व नोटिंग्ज, फ़ाईलिंग अगदी व्यवस्थित मुद्देसूद राखता. तुमचा सहकारी तुमची पद्धत समजून घेणारा नसेल तर तुम्ही ज्या सीमेपर्यंत अपेक्षा करता त्या पूर्ण नसेल तर असमाधानी रहाल.

कन्या ही स्त्री पृथ्वी राशी असल्याने बागायती, शेती, बागकाम, झाडे लावणेचे शौकीन असता. तुम्हास न्यायी व सामाजिक वर्तन आवडते. व बुद्धीने निर्णय घेता व सहानुभूती वा भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेणार नाही. कन्या राशिवर शनिची दृष्टी असेल तर जातक आळशी असतो व सोपे कार्य करणे पसंत करतो. परंतू ईतरांना टोकण्यात आनंद अनुभव करु शकता. व्दिस्वभाव राशी असल्याने नवे मित्र, नवे जोडीदार, नवी माणसे जोडत रहाल.

कन्या ही राशिचक्रातील ६ वी राशी असल्याने विशेष रुपाने औषधी वस्तू, खाद्य, भोजन, ई. चे शौकीन असाल व या बाबतीत वेगवेगळे प्रयोग कराल. जेव्हा तुम्ही आजारी पडता तेव्हा तुम्ची मनस्थिती एकदम कमजोर होऊन जाईल व नेहमी आजारपणाबद्दल विचार करत रहाल. स्वत:स उत्साहित करणार नाही व रमवणार नाहीत. व बरेच वेळा स्वत:च आजारपणाच्या पकडीतून सुटाल. व अशा प्रकारे प्रकृतीचे नुकसान करुन घ्याल. व ईतरांनी लक्ष द्यावे ही अपेक्षा ठेवाल. पण ज्यावेळी तुम्ही स्वस्थ असाल त्यावेळी दुसरे कोणी आजारी असेल तर त्याची उत्तम काळजी घ्याल व उत्तम सेवाभावी असल्याचे सिद्ध कराल.

कन्या राशी मधे नेपच्यून स्थित असेल तर कल्पकता व योजकता देतो. जातक कपटी व अवैध आनंद मिळवणारा असू शकतो. कन्या लग्नाच्या ठीक भावारंभावर जर नेपच्यून असेल तर तो चालाख, कूट नीतीयुक्त, दूष्ट वा चोर असू शकतो. कन्या लग्ना मधे युरेनस असेल तर जातक चतुर, बुद्धीमान व चंचल असेल. शिक्षक, लेखक, अधिक्षक दर्जाचा अधिकारी, युरेनस विश्लेषक बुद्धी व कन्या विश्लेषणात्मक प्रकृती देते, त्यामुळे अनेक शोध लावणारे, हुशार व्यक्ती कन्या राशिचे असू शकतात. युरेनस ची शुभ दृष्टी असेल तर महान संगितकार, गणिती, पत्रकार, संशोधक असू शकतो.

3. कमजोरी- कन्या जातक अतिशय बड्बड्या स्वभावाचा असतो. ते विश्लेषन वादी असतात. व एखाद्या गोष्टीचे इअतके वर्णन करेल की ऐकणारा कंटाळून जाईल. त्यांनी दुसरेचे दोषावर टीका टिपणी करताना संयम ठेवावा. छोट्याछोट्या गोष्टींनी निराश वा नाराज होऊ नये. जे काम कराल त्यामधे दृढता असणे गरजेचे आहे. स्वत: निर्णय कर्ता असल्याने अनेक जणांचे मत विचारावयास जाऊ नये, त्यामुळे डोक्यात विचारांची गर्दी होऊन फ़क्त संभ्रम निर्माण होईल. शक्यतो फ़क्त एखाद्या विश्वासू व्यक्तीचा फ़ारतर सल्ला घ्यावा वा मत विचारावे. कारण तुम्ही करणार तेच असता जे तुम्हाला पटत असते.

6. आरोग्य- तुम्ही साधारणपणे संयमी व्यक्ती आहात. बुद्धिमानी राखता व आरोग्याची निगा राखण्यास प्रयत्नशील असता व खाण्यापिण्याकडे लक्ष देता. पण तुम्ही फ़ार क्रियाशील असता त्यामुळे अतिश्रम होऊन वा दगदगीमुळे त्रास वा आजारपण येऊ शकते. लग्न स्थानी असणारा ग्रह पीडीत असेल तर पचन व आतड्यासंबंधी त्रास निर्माण करतो व शरीर कमजोर राहते. साधारणपणे कन्या राशीत पापग्रह असतील तर ते त्या ग्रहांच्या दशा अंतर्दशेत टायफ़ॊईड, गळ्याचे त्रास, हगवण ई होऊ शकते. व आपणांस बरे व शांत वाटण्यासाठी अत्याधिक विशवासु वातावरण व समजुन घेणारा जोडीदार याची आवश्यकता भासते. तुम्हास योग्य तेवढाच व्यायाम करावयास हवा. तुमचे नाडी मंडळ चेतनात्मक आहे. नियमित योग्य व वेळेवर जेवन व व्हिटामिन बी अधिक घेतल्यास स्वास्थ्य राखण्यास मदत होईल. ६ वे स्थानाचा अधिपती शनी व ८ वे स्थानाचा अधिपती मंगळ असल्याने. जरा त्रास होऊ लागला तरी तुम्ही सतत विचार व चिंता करुन व कल्पनेने स्वत:स फ़ार दु:खी करता. नेहमी खरचटणे, ठेच, किरकोळ दुखापती होत राहतात.

कन्या रास पोट व आतडे दर्शवते. स्वामी बुध असल्याने त्याचा नाडी मंडळावर प्रभाव पडतो. आतड्याच्या गडबडीमुळे व विचारांनी मानसिक स्थितीवर प्रभाव पडतो व नंतर बिघडलेली मानसिक स्थिती व्यवसायिक व पारिवारिक अडचणींवर प्रभाव टाकते.

कन्या रास पित्त व्याधी दर्शवते. कन्या राशीचे कार्य आहे भोजन रस शोषण करणे व त्याचा ऊर्जात्मक उपयोग करणे, पचन करणे, त्यामुळे योग्य आहार अनिवार्य आहे. दु:ख, असंतोष, उव्दिग्नता व दृढ हट्ट कमी करावयास हवे. बाहेरील चमचमीत खाणे, मद्य टाळावे. शेफ़ळ खाने स्वास्थ राखण्यास चांगले.

7. धन व संपत्ती- कन्या जातकांस व्यापारामधे रुची असते. त्यामुळे नोकरी असो वा व्यवसाय तुम्ही पैशाचे व्यवहारामधे नेहमी सावधानी बाळगता. भाग्याने धनवान होण्यापेक्षा कठोर मेहनत घ्याल व पुरेसे धनवान होण्याची ईच्छा ठेवाल. ६ वे स्स्थानाचा स्वामी शनी असल्याने तुम्ही जेवढी मेहनत घेता त्या प्रमाणात तुम्हास त्याचा फ़ायदा मिळत नाही. व धनसंचय करण्यास कष्ट पडतात. तुम्ही किती यशस्वी होता हे तुमच्या बुद्धी व निर्णयक्षमतेवर अवलंबून असते. सामान्यपणे तुम्ही केलेल्या कामाचे पैसे घेऊ शकता किंवा नोकरी करु शकता. तुम्ही कठीन परिश्रमी असाल व एकांतामधे शांतीपूर्वक काम करणे पसंत कराल.

5. नोकरी व्यवसाय- कन्या लग्नावर, २ रे, ६ वे अथवा १० वे स्थानावर सूर्याची दृष्टी असेल तर यशस्वी चिकित्सा अधिकारी व्हाल. मेडिकल अथवा जनारोग्य, विभागात काम करु शकाल. तुम्ही शासकीय इंजिनियरिंग, ऒडिटिंग, शिक्षण खात्यामधे नोकरी करु शकाल.

चंद्राची शुभ दृष्टी जातक अकाऊंट्स क्षेत्रात, इंजिनियरींग अथवा नेव्ही संबंधित काम करेल. अथवा पेट्रोल, पारा, पाणी ई द्रव पदार्थांचा उपयोग वा संबंध येत असेल अशा ठिकाणी अथवा वस्त्रोद्योग, शाई, पेन, दौत ई संबंधित काम करेल.

मंगळाची शुभ दृष्टी असेल तर जातकाचे स्वत:चे नर्सिंग होम,  शल्य चिकित्सा केंद्र असू शकते अथवा शास्त्रीय उपकरणे संबंधी कार्य करेल. क्लेरिकल, स्वतंत्र ऒडीटर, मिलितरी अकाऊंटंट, प्रिंटिंग प्रेस, एडिटिंग, लेखन, स्टील, कीटकनाशक, शेती अवजारे, अथवा प्रतिरक्षा विभागात काम करेल. मंगळ पीडीत असेल तर काळा बाजार, चोरी, दगाबाजी करुन धन कमवेल.

मंगळ पीडित कन्या जातकांनी नोकरी व्यवसाय करताना सतर्क राहणे जरुरी आहे की आजुबाजुला काही लोक कटु बोलणारे वा निंदा करणारे असू शकतात. कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुम्हाला सहकार्य करणारे सहकारी वा तुमच्या मित्रांना त्रास देऊ शकतात, कारण तुम्ही त्यांना संरक्षित करता. ते तुमचे कडे तुमच्या हितचिंतकांच्या तक्रारी करतील, गैरसमज निर्माण करतील, आळ घेतील. यात त्यांना आनंद मिळेल पण तुम्ही ऐकून चुकीचा निर्णय घेतला तर संकटात सापडू शकता किंवा दु:ख होऊ शकते. साधरण पणे असे अनुभव बुध मंगळ दशे अंतर्दशेत अथवा बुध मंगळ दृष्टी संब्म्धात व पीडीत असेल तर येतात.

बुधाची शुभ दृष्टी हे दर्शवते की तुम्ही एक दलाल, कमिशन एजंट, मुनीम, अकाऊंटंट, शिक्षक, वकील, लेखक, संपादक, अथवा औषध विक्रेते असू शकता.

गुरुची शुभ दृष्टी हे दर्शवते की तुम्ही सहित्यिक, संशोधक, बुद्धिजीवी व्यवसाय करनारे, प्रकाशक, संपादक, पत्रकार, धर्म संस्था, न्यायसंस्था, वीमा, मंदीर, चर्च, बैंक, दूतावास, राजदूत, ई संबंधी नोकरी व्यवसाय कराल.

शुक्राची शुभ दृष्टी हे दर्शवते की तुम्ही संगीतकार, अभिनेता, पेंटर, ऒडिटर, सौंदर्य प्रसाधने, दागिणे, वस्त्रोद्योग, खाद्य पदार्थ, हलवाई, भंडरी, हॊटेल, सुगंधी द्रव्ये, अत्तर, इटेरिअर, आर्किटेक्ट ई. संबंधित नोकरी व्यवसाय कराल.

शनीची शुभ दृष्टी हे दर्शवते की कन्या जातक, सांख्यिकी, अकाऊंट्स, फ़िजिक्स, डायनेमिक्स, खाण, खनिज धातू, ट्रस्टी, वारसाहक्क, फ़िंगरप्रिंट्स(मंगळ पण संबंधित असेल तर) ई संबंधित नोकरी व्यवसाय करु शकता.

7. कौटूंबिक- तुम्हाला आपले घर व घरातील वस्तू नीट व सुव्यवस्थित व सुशोभित ठेवायची आवड आहे. व घरातल्या सदस्यांनी सुद्ध ते तसेच राखावे अशी तुमची अपेक्षा असते. व पाहुणे आले तर त्यांच्या नजरेत ते भरावे असे वाटते.गुरु ४ थे स्थानाचा अधिपती असल्याने घर, वाहन प्राप्तीसाठी तुम्ही भाग्यवान असता. संपत्तीची किंमत वा प्राप्तीचा अवसर गुरु दशेमधे अधिक असेल.  शनि ५ व ६ वे स्थानाचा अधिपती असल्याने व मंगळ ८ वे स्थानाचा अधिपती असल्याने शनि व मंगळाच्या दशेमधे खर्च वा नुकसान होईल. गुरु दशेत विनियोग अथवा विक्री फ़ायदेशीर ठरेल व शनी दशेत नुकसानदायक.गुरू ७ वे स्थानाचा पण अधिपती असल्याने सांसारिक सुख व शांती चांगले लाभेल. पण गुरु जर पीडीत असेल तर अथवा त्रिक स्थानात स्थित असेल तर मात्र वैवाहिक सौख्यात काही ना काही कमतरता जाणवत राहील व मन अतृप्त राहील. किंवा नोकरी व्यवसायानिमित्त घरापासून लांब रहाल व त्यातच रमाल.

8. प्रेम- तुमची ही विशेषता आहे की तुम्ही बुद्धीमान लोकांना प्राधान्य देऊ शकता, सहकार्य करायची तयारी असते, पण फ़क्त त्यांनी त्याची जाण ठेवणे तुम्हाला महत्वाचे वाटते. तुम्ही ज्यांना आपले आयुष्यात स्थान देता त्यांनी तुमच्या मैत्रीची, सहयोगाची केलेली स्तुती तुम्हास आवडते. तुम्ही सहसा फ़ारसे कोणाशी मनापासून मैत्री करण्यास जात नाही. तुमची स्वत:ची अशी पसंती असते व निश्चित धारणा असते. तुम्ही अशाच लोकांमधे मनापासून मिसळता जे तुमच्या पसंतीस उतरतात. तुम्हांस तुमची प्रशंसा करणारे लोक आजूबाजूला आढळून ही येतात. पण फ़ार कमी भाग्यवान असतात ज्यांना तुम्ही जवळ करता. तुम्ही तुमच्या मूडनुसार वर्तन करु शकता. ११ वे स्थानाचा स्वामी चंद्र असल्याने जर तुमच्या मनास नारज केले तर तुम्ही त्यापासून लांब राहणे पसंत करता.

9. वैवाहिक- तुम्ही स्वत:च एक आदर्श व्यक्ती असल्याने तुमच्या पसंतीचा वा सर्वस्वी मनासारखा जोडीदार मिळणे कठीण जाते व त्रास होतो. संभव आहे की सुरुवातीलाच तुम्ही तुम्च्या धारनेत बसणारा जोडी दार न मिळाल्याने निराश होऊ शकता.कारण तुम्ही कोणाची निवद करताना रसिकतेपेक्षा बुद्धीस जास्त प्राधान्य देता.प्रणयाच्या बाबतीत तुम्ही नेहमी संकोचित राहता व प्रेमाचे प्रदर्शन करत नाही. तुम्हांस फ़ार चिड्चिडे व्हावयास नको. कारण जोडीदाराबरोबर आनंदी वैवाहिक सौख्याकरता काही प्रमानात का होईना तुम्हास प्रेमाचे प्रदर्शन करावयास हवे.तुम्ही हे जाणता की प्रेमाबरोबरच चांगल्या दृष्टिकोणाची गरज असते. फ़क्त आलोचने वर प्रेम टिकुन रहात नाही. तुमचा स्वभाव चुका काढण्याचा आहे, काही संबंध टिकवताना तो सोडून देणे गरजेचे असते. ज्याप्रमाणे तुम्ही अपेक्षा करता की तुमच्या सहकार्याची व मैत्रीची इतरांनी जान ठेवावी, त्याप्रमाणे तुमचा जोडीदार बुद्धिमान असो वा नसो तिच्याकडे गुण असो वा नसो तुम्ही थोडीतरी स्तुती करावयास मनास तयार केले पाहीजे. अथवा थोडातरी दिखावा तरी शिकला पाहिजे. कन्या जातक कमी कामुक असतात व म्हणून निदान काही गोष्टी स्वीकारुन जोडीदारास प्रसन्न केले पाहीजे. व अशी पुस्तके वाचावित अथवा आपल्या अहदी जवळच्या व विश्वासू मित्राबरोबर अशी चर्चा मोकलेपनाने करावी जेणेकरुन तुम्ही तुमच्या वैवाहिक कामजीवनास उत्सुक व्हाल.

कन्या जातक आपला विवाहाचा जोडीदारास भागिदाराच्या नजरेने पाहतात. कारण व्यापार व सामाजिक व्यवहार हे त्यांच्या मूळ स्वाभवाचा एक कंगोरा आहे. हेच कारण आहे की अनेक कन्या जातक आपला विवाह लांबणीवर टाकत राह्तात वा मनाप्रमाणे विवाह झाल्यास अपेक्षाभंगाची शक्यता असते. कन्या जातकास जास्त काळ कुमार अथवा स्वतंत्र आस्तित्वात राहणे व त्यांची इच्छा एकांतात शांतीपूर्ण व चिंतनशील राहण्याची असते. पण विवाह झाल्यावर तुम्ही आपल्या पतीच्या व कुटूंबियांच्या सोयी, सुविधा बघण्यात कसुर करत नाहीत. हे देखील संभव आहे कि तुमच्या प्रकृतीच्या नेहमी तक्रारी राहतील व त्याने तुम्ही धास्तावून जाता.

कन्या स्त्री जातक संतापी व मनात राग धरणारी असू शकते. ती कंजूष वा काटकसरी असते. ती भागिदारी तत्वाप्रमाणे जोडीदारास हात राखून खर्च करावयास सांगते व अर्थिक व्यवहारात तिला बरोबरीने शामिल करावे असे वाटते. ती घर उत्तम रीत्या चालवू शकते व स्वत: वा जोडीदाराने अनावश्यक खर्च केलेला तिला रुचत नाही. ती आपले घर जबाबदारीने सांभाळेल. कन्या स्त्री असा विचार करु शकते की प्रेमक्रीडा हा तुच्छ, नीच व काळवेळ वा मूड विरुद्ध दु:खदायक प्रकार आहे. चतुर जोडीदार होण्यासाठी तिने हे आपले मत बाजूला ठेवून रममान व्हावयास हवे.

10. संतती- ५ वे स्थानाचा स्वामी शनी असल्याने संततीची संख्या मर्यादित वा कमी असेल. त्यांना त्यांच्या शिक्षणावर अधिक खर्च करावा लागतो. कन्या जातकाची संपत्ती चा त्यांची मुले उपभोग घेतात. जरी तुम्ही मुलांच्या भल्यासाठी तुम्चे प्रेम त्यांचेकडे नेहमी व्यक्त करत नाही तरी त्यांना योग्य शिक्षण, संस्कार देण्यास कधीही विसरणार नाहीत व त्यांना अधिकार पदासाठी योग्य व सक्षम बनवाल. तुमची ज्येष्ठ संतती ही परिश्रमी, उद्यमशिल, धैर्यशील, समृद्ध होईल. दुसरी व तीसरी संतती असेल तर आरोग्य चांगले असेल पण कमी सुखाचा अनुभव करेल.

11. भाग्य दिवस- बुधवारी भाग्य साथ देईल. गुरुवार विनियोग, मोटर खरेदी, रसिकतेसाठी, नव्या घरात परिवाराबरोबर वा जवलच्या व्यक्तींचा सहवास प्राप्त करण्यासाठी, व्यापारी भागिदारी व साहसी कार्यासाठी शुभ आहे.शुक्रवार आर्थिक स्थिती करता शुभ आहे. शनीवारी उशीर, असफ़लता व निराशेचे भय राहील. रविवारी नुकसान व मनस्ताप होऊ शकतो. सोमवार मित्रभेटीस, नवे मित्र बनवण्यास, जोखीम घेण्यास, लाभ प्राप्तीसाठी चांगला आहे. मंगळ अशुभ असून सट्टा, जुगार, छोटा प्रवास, पत्रव्यवहार, करार, संपर्का साठी अनिष्ट आहे. 

12. भाग्य रंग- हिरवा, पांधरा, पिवळा, लाल शुभ, निळा अशुभ स्वास्थ्य व जखमा, व अडचणीदायक रंग

13- भाग्य रत्न- पाचू, मोती, हिरा, पोवळा, नीलम

14- भाग्यशाली अंक- ५, २, ७, ६, ३ शुभ व १,४,८,९ अशुभ

-ज्योतिषमित्रमिलिंद (७०५८११५९४७) Whatsapp only

For More info : Visit : jyotishmitramilnd.in

3 thoughts on “कन्या राशीफ़ळ ( Kanya Rashiphal )

Leave a comment