ग्रहण-एक खगोलिय़ घटना, पौराणिक कथा व पथ्ये


ग्रहण-एक खगोलिय़ घटना, पौराणिक कथा व पथ्ये

भारतात चंद्राच्या ग्रहणाविषयी अनेक लोकापवाद आहेत. ग्रहण काळात काय करावे आणि काय करु नये यामागे शास्त्रीय कारणे आहेत, पण ती जाणून न घेता सांगोपांगी काही समज गैरसमज पसरल्याने अंधश्रद्धा देखील वाढीस लागली आहे. परंतु विज्ञानाच्या मते ही एक पूर्णपणे खगोलीय घटना आहे.

पौराणिक कथांनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी अमृतपान साठी देव आणि राक्षस यांचा वाद चालू होता, तेव्हा भगवान विष्णूने मोहिनी रुपात एकादशीच्या दिवशी निराकरण केले. भगवान विष्णूंनी देवता आणि असुरांना स्वतंत्रपणे बसवले. पण असुरांनी कपटपूर्वक देवतांच्या ओळीत बसून अमृत प्राशन केले. देवाच्या ओळीत बसलेल्या चंद्र-सूर्याने राहूला हे करताना पाहिले. त्यांनी ही माहिती भगवान विष्णूला दिली, त्यानंतर भगवान विष्णूने राहूचे डोके त्याच्या सुदर्शन चक्रातून तोडले. परंतु राहू अमृत पित होता, ज्या मुळे तो मरण पावला नाही आणि त्याच्या मस्तकाचा भाग राहू आणि धड भाग केतु म्हणून ओळखला जातो. या कारणास्तव, राहू आणि केतु सूर्य आणि चंद्राला आपला शत्रू मानतात आणि पौर्णिमेच्या दिवशी ते चंद्र ग्रासतात म्हणूनच चंद्रग्रहण होते.

खगोलशास्त्रानुसार, जेव्हा पृथ्वी चंद्र आणि सूर्यामध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान अशा प्रकारे येते की चंद्राचा संपूर्ण भाग किंवा भाग व्यापला जातो आणि सूर्याच्या किरणां चंद्रापर्यंत पोहोचत नाहीत. अशा परिस्थितीत चंद्रग्रहण होते. जेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मधे सरळ रेषेत येतो तेव्हा सूर्य ग्रहण होते.
आजही ग्रहण प्रत्यक्षात डोक्याच्या (वरच्या) बाजूने लागते म्हणून चंद्राला डोक्याने गिळावयाचे व रवीला धडाने गिळंकृत करायचे हा क्रम अविरत चालू आहे.
हे आपण प्रत्यक्ष व ज्योतिष गणिताच्या सहाय्याने पाहू शकतो. याचे नकाशे वर्षभर आधी पंचांगात प्रसिद्ध होतात व दिलेल्या समयी ग्रहन लागते. ग्रहणाचे वेळी सूर्य किरण किंवा चंद्र किरण लंब रुपाने पडतात व त्याचा परिणाम जास्त होतो. हे बिंदू ग्रह तीव्र रुप धारण करतात. तसेच सूर्याचे इंद्रनील किरण वा चंद्र प्रकाश पूर्ण स्वरुपात व स्वच्छ पृथ्वीवर येत नसल्याने जिवाणू, विषाणू, कीटाणू यांचा संचार व प्रादुर्भाव वाढू शकतो व आरोग्यास अपायकारक ठरु शकतो हेच कारण ग्रहण काळात पाळावयाची पथ्ये सांगण्यामागे आहे.

ग्रहण काळात सांगितली जाणारी पाळावयाची पथ्ये :

१) ग्रहणात स्नान करुन पुजा,पाठ करावेत,मंत्र जप करावा.
२) ग्रहण काळात झोपू नये. मानसिक परिणाम होऊ शकतो.
३) घराची साफ सफाई करू नये.
४) गर्भवती स्त्रियांनी देवाची उपासना करावी.जप करावा.घरातून बाहेर जाऊ नये.व ग्रहण काळी काहीही खाऊ नये.नाहीतर बाळाला शारीरिक त्रास होतो.
५)ग्रहणकाळात कोणाशीही भांडण करु नका.शांत रहा,ध्यान करा, मौन पाळा, जप करा
६) ग्रहणकाळात झोपू नका नाहीतर रोग पकडतो.
७) ग्रहणकाळात लघुशंका, लघवी करु नये, शौचास जातो त्यास पोटाचे विकार होतात.
८) ग्रहणकाळात संभोग करु नये.
९) ग्रहणकाळात भोजन,मालीश करु नका,नाहीतर अनेक रोग शरीराला जखडतील.
१०) ग्रहणकाळात, नशापाणी, स्वयपाक करु नये, धुने धुवू नये.पाणी भरु नये.

-ज्योतिषमित्र मिलिंद

2 thoughts on “ग्रहण-एक खगोलिय़ घटना, पौराणिक कथा व पथ्ये

Leave a comment