
फुलवा आयुष्याचे रंग – राशिनुसार फुले व रोपांची लागवड
वैज्ञानिक संशोधनाद्वारे हे सिद्ध झाले आहे की रंग प्रकाशाद्वारे तयार झालेली उर्जा शारीरिक कार्ये, मन आणि भावनांवर परिणाम करतात. घेण्यात आलेल्या अभ्यासानुसार मेंदू, सर्जनशीलता, उत्पादकता आणि शिक्षणाशी संबंधित असलेल्या रंगांचे फायदे दिसून आले आहेत. आधुनिक विज्ञानात अल्फा ब्रेन वेव्ह बदलण्यासाठी ठराविक रंग दर्शविले गेले आहेत. ईईजी आणि नाडी मोजण्याच्या प्रणालीनुसार, पुरुष आणि स्त्रिया रंगांवर भिन्न प्रतिक्रिया देतात. रंग डोळ्यापासून मेंदूमध्ये प्रसारित केला जातो तेव्हा मेंदू भावना, मनाची स्पष्टता आणि उर्जा पातळीवर परिणाम करणारे हार्मोन सोडतो. रंगांचा नकारात्मक आणि सकारात्मक मानसिक प्रभाव माणसांमध्ये वापरल्या जाणार्या संयोजनांच्या आधारावर दिसू शकतो.
समोहन, समुपदेशन, मानस शास्त्र या मधे अन्तर्मनात काही गोष्टी प्रक्षेपित करण्यासाठी रंगां चा प्रभावी वापर केला जातो. ज्योतिष शास्त्रातील काही उपाय सांगताना याची विज्ञानाशी कशा प्रकारे सांगड घातली आहे याची कल्पना देखील नसते. उदाहरणच द्यायचे झाले तर शानिला काळे उड़ीद वहा, गणपतीला लाल फूल वहा, वेगवेगळ्या रंगाचे खड़े, रत्न यांचा वापर ई.
आज आपण आयुष्यात समृद्धी, शांती, समाधान नांदावे, यासाठी रंगांचा असाच एक कल्पक व अल्हाददायक उपाय पाहणार आहोत.
आपल्या राशीनुसार रंगांचा उपयोग करुन त्या त्या विशिष्ट रंगांच्या फ़ुलझाडे, रोपटे, तुमच्या बाल्कनीमधे वा तुमच्या घरातला खास कोपरा असेल तेथे लागवड केली तर तर तो विशिष्ट रंग तुमच्या अंतरंगास भावेल व त्याचे निश्चितच चांगले परिणाम अनुभवास येतील.
मेष व वृश्चिक राशी च्या व्यक्तींनी लाल रंगाची फ़ुले असणारे रोप लावावे.
वृषभ व तूळ राशी च्या व्यक्तींनी पांढरा रंगाची फ़ुले असणारे रोप लावावे.
मिथुन व कन्या राशी च्या व्यक्तींनी फ़ुले नसणारे हिरवट रोप लावावे.
कर्क राशी च्या व्यक्तींनी तुळशीचे वा सफेद रंगछटा असलेले फूल रोप लावावे.
सिंह राशी च्या व्यक्तींनी लाल रंगछटा असलेले रोप लावावे.
धनु व मीन राशी च्या व्यक्तींनी पिवळ्या रंगाची फ़ुले असणारे रोप लावावे.
मकर व कुंभ राशी च्या व्यक्तींनी गडद निळा, जांभळा वा फ़ुले नसणारे शोभेचे रोप लावावे.
आपले आयुष्य हे फ़ुलां झाडां सारखे रसभरीत, टवटवीत व सदाबहार असावे ही सदिच्छा…
-ज्योतिषमित्रमिलिंद
Good suggestion. Thank you.
LikeLike
🙏
LikeLike