“नवपंचम योग / त्रिकोण योग”


“नवपंचम योग / त्रिकोण योग”

आपल्याला खुप वेळा आपल्या गुरुजींच्या मुखातुन नवपंचम अथवा शुभ पंचम योग आहे असे शब्द प्रयोग कानावर पडत असतात.
म्हणजे नक्की काय हे आपल्याला कळत नसते पण नवपंचम व शुभपंचम या शब्दांवरुन काही तरी खास आहे असे आपण तर्क लावत असतो. आज आपण याच योगाविषयी जाणून घेणार आहोत.

दोन ग्रहांच्या मधील अंतर हे १२० अंश असते तेव्हा नवपंचम योग तयार होतो. या योगाचे वैशिष्ट्य म्हणजे तत्वाच्या राशीतून हा योग आकारास येतो, त्यात तत्व हे समान असते.
म्हणजेच १-५-९ (मेष-सिंह-धनु) या अग्नी तत्वाच्या राशी, २-६-१० (वृषभ-कन्या-मकर) या पृथ्वी तत्त्वाच्या राशी, ३-७-११ (मिथुन-तुळ-कुंभ) या वायु तत्वाच्या राशी व ४-८-१२ (कर्क-वृश्चिक-मीन) या जलतत्वाच्या राशीं मधून हा योग साकारला जातो.
नक्षत्र चक्राचा विचार केला तर योग अचुक १२० अंशाचा असेल तर एकाच नक्षत्र स्वामीच्या विभागातुन साकारला जातो. कारण १२० अंशांवर केतू पासून सुरु झालेली एक माला पूर्ण होऊन एकूण ३ वेळा अशी माला येऊन २७ नक्षत्रे ३६० अंशाचा फ़ेरा पूर्ण करतात.

याप्रमाणे १-५-९ (मेष-सिंह-धनु) हा धर्म त्रिकोण (धर्म, कर्तव्य, पूर्वकर्म, कीर्ती कारक योग)
२-६-१० (वृषभ-कन्या-मकर) हा अर्थ त्रिकोण (संपत्ती कारक, चालू कर्म कारक योग)
३-७-११ (मिथुन-तुळ-कुंभ) हा काम त्रिकोण (वैवाहिक / शरीर सुख, मैत्री कारक योग)
४-८-१२ (कर्क-वृश्चिक-मीन) हा मोक्ष त्रिकोण (मुक्ती, मोक्ष, अध्यात्म कारक योग)

या चार त्रिकोणां मधुन नवपंचम योग / त्रिकोण योग होतो.

थोडक्यात नवपंचम वा त्रिकोण योगात संकल्पना पुढे नेणे, विस्तार वा नवनिर्मिती करणे हे सूत्र दिसते. अर्थात या योगाशी पूरक ग्रह त्यामधे स्थित असतील व त्या संबंधित ग्रहांची दशा चालू असतील तेव्हा ही फ़ळे प्राप्त होतील.

– ज्योतिष मित्र मिलिंद jyotish mitra milind

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

5 thoughts on ““नवपंचम योग / त्रिकोण योग”

Leave a comment