न्यूटन चा गती प्रतिगती चा नियम आणि कुंडली


न्यूटनचा गती व प्रतिगती चा नियम व कुंडली

आज आपण न्यूटनचा गती व प्रतिगती चा जो नियम आहे, त्याची कुंडली अनुसार सोप्या भाषेत उकल करण्याचा प्रयत्न करु.

NEWTON’S LAW : To every Action there is equal & opposite Reaction provided that there is no external unbalanced force act upon it.

गती तेथे प्रतिगती, कर्म व परिणाम हे सिद्धांत आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत.

कुंडली मधे गती किंवा कर्म १ले स्थान दाखवत असेल तर प्रतिगती विरुद्ध दिशेला म्हणजेच १८० अंशावर असणारे ७वे स्थान प्रतिगती किंवा परिणाम दाखवेल. जोपर्यंत त्या्चेवर कोणताही इतर ग्रहाचे बाह्य व असंतुलित बल प्रभाव टाकत नाही. न्यूटन हा फ़ार महान संशोधक होता.

जसे की सूर्य सकाळी पुर्वेला उगवताना दिसतो आणि संध्याकाळी पश्चिमेला १८० अंशावर ७वे स्थान पाशी मावळताना दिसतो, तुम्ही दोन्ही वेळांची त्या दिवसाची कुंडली बघितली तर हे स्पष्ट दिसून येईल. एखादे स्थानापासून ७वे स्थान पूरक असणे फ़ार महत्त्वाचे असते. कारण कोणत्याही स्थानातील शुभ अथवा बिघडलेला ग्रह ७व्या स्थानावर संतुलित अथवा असंतुलित प्रभाव टाकतो. व अशावेळी पूरक ऐवजी प्रतिकूल परिणाम निर्माण करतो.

आता या नियमाची एखादे स्थानापासून ७वे स्थानाची कार्य परिणामाची थोडी गंमत सोबतच्या चार्ट मध्ये दिलेली आहे. आपणही १ ले व ७ वे स्थान मध्ये कोणते ग्रह, राशी येतात व त्याचा परिणाम हा पूरक असेल का प्रतिकूल याचा अभ्यास करू शकता. प्रत्येक ग्रहाला ७ वी पूर्ण दृष्टी असते. याचाच अर्थ स्थित ग्रह त्याचे ७ वे स्थानाचा पुरकता अथवा प्रतिकुलता याचे परिणाम बदलू शकतो.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

2 thoughts on “न्यूटन चा गती प्रतिगती चा नियम आणि कुंडली

Leave a comment