म नो ग त ( Preface )

नमस्कार,

आजच्या धकाधकीच्या काळात प्रत्येक जन तनावपूर्ण व संघर्षमय आयुष्य जगतोय. कोणाला लग्नाची चिंता तर कोणाला नोकरी व्यवसायाची चिंता. कोणी मूल होत नाही म्हणून दुःख तर कोणाला दत्तक घेतलेली संतती सांभाळेल की नाही याची हुरहुर. कोणाला पास व्हायची चिंता तर कोणाला परदेशी स्थायिक व्हायची ओढ़. कोणाचे आजारपन तर कोणाला मिळकतीचा घोर. किती आणि काय काय लिहू. या सगळ्यात योग्य विश्वासु सल्ला सोडा मनमोकळे बोलायला, आपली व्यथा ऐकायला सुद्धा कोणाकडे वेळ नाही.

बरेच वेळा आपल्याला अचूक ज्योतिष सल्ल्याची गरज असते व येणारा काळ मग तो चांगला असो वा क्लेशदायक, पण तो अचूक काळ जानता आला तर…

…त्या प्रमाणे मानसिक रित्या भक्कम राहून सुनियोजन करुन संधी चे सोने करु शकतो. किमान पक्षी आपले शारीरिक, मानसिक आर्थिक नुकसान कमी कसे होईल यासाठी पूर्व तयारी करु शकतो. अशा वेळी “ज्योतिषमित्र मिलिंद” ना संपर्क करण्यास संकोचू नका.

आपला,

ज्योतिष मित्र मिलिंद

jyotish mitra milind