मंगळ ग्रह पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Mars)

मंगळाचे पारंपारिक उपाय

1. ज्या व्यक्तीचा मंगळ अधिक प्रभावी आहे अशा व्यक्तीने नारळाचं पाणी पिणे खूप चांगलं असतं. यामुळे मंगळ शांत होतो आणि त्या व्यक्तीचा राग कमी होतो.

2. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन मारूतीरायावर तेल अर्पण करावं आणि शेंदूर लावावा. हनुमंताच्या शेंदूराचा आपल्या कपाळावर टिळा लावावा.

3. बुंदीचे लाडू आपल्या हाताने तयार करावे, त्यात चार लवंगा टाकून हनुमानाच्या चरणी मंगळवारी अर्पण करावेत.

4. विड्याच्या पानावर काथ लावावा आणण असा विडा मंगळवारी बजरंगबलीला अर्पण करावा.

5. दररोज हनुमान चालीसा आणि मारूती स्तोत्राचं पठण करावं.

6. मोहरीच्या तेलात नीळ (पांढरे कपडे धुवायला वापरतो ती नीळ) मिसळून त्याचा दिवा मंगळवारी हनुमानासमोर लावावा.

7. मंगळवारी उपवास करून गुळ आणि फुटाणे दान करावे.

8. असं म्हणतात जो भक्त प्रत्येक मंगळवारी उपवास करतो आणि हनुमंताची विशेष पूजा करतो. त्याच्यावर मारूतीरायाची सदैव कृपा राहते. ज्या तरूण-तरूणींना सौम्य मंगळ किंवा मंगळ आहे. ज्यामुळे त्यांचा विवाह ठरत नाही, अशा तरूणांनी हा उपाय करून बघण्यास हरकत नाही. मंगळाचा प्रभाव कमी झाला तर आपला राग शांत होईल आणि त्यामुळे दूर गेलेले व्यक्ती जवळ येतील आणि जवळचे दूर जाणार नाहीत.

9. वड वृक्षाच्या मूळ मध्ये गोड दूध – पाणी टाकून त्याची ओली माती नाभी वर लावा.

10. घरात ठोस चांदी ठेवा.

11. घरात आलेल्या बहिणीला गोड देऊन घरातून विदा करा.

12. धार्मिक स्थळावर गूळ, चण्याची डाळ इत्यादीचे दान करा.

13. दुसऱयांना गोड खाऊ घाला आणि शक्य असल्यास स्वतः ही गोड खा.

-ज्योतिषमित्र मिलिंद

For any query or Astrological guidance feel free to contact on 7058115947 (whatsapp)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in