बुध ग्रह पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Mercury)

बुधाचे पारंपारिक उपाय

1. बुधवारी गणपती अथर्वशीर्षाचे पाठ करणे फलदायी ठरेल. तसेच महिन्यातून येणारे दोन्ही चतुर्थीला देखील पाठ करणे शुभ ठरेल.

2. या व्यतिरिक्त आपण गणपती मंदिरात जाऊन दूर्वा अर्पित कराव्या आणि लाडू किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवावा.

3. बुधवारी किन्नरांना पैसे दान करावे. आंणि त्यांच्याकडून काही पैसे आशिर्वाद म्हणून घ्यावे. त्यांनी दिलेले पैसे पूजा स्थळी ठेवून धूप-उदबत्ती दाखवावी. नंतर हिरव्या कपड्यात गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागी ठेवून द्यावे. याने बरकत येते.

4. आपण तांत्रिक उपाय करू इच्छित असल्यास बुधवारी 7 कवड्या घ्याव्या. यासि मूठभर अख्खे मूग घ्यावे आणि दोन्ही वस्तू हिरव्या कपड्यात गुंडाळून गुपचुप एखाद्या मंदिराच्या पायरीवर ठेवून यावे. याबद्दल कोणालाही सांगू नये. याची चर्चा करू नये.

5. बुधवारी सव्वा पाव मूग उकळून त्यात तूप आणि साखर मिसळून गायीला खाऊ घालावे. याने लवकरच कर्जापासून मुकती मिळते.

6. दारू, मांस, अंडे खाणे टाळा

7. रात्री डोक्याजवळ पाणी ठेऊन सकाळी ते पाणी पिंपळाच्या झाडाला चढवा.

8. मेंढी, बकरी आणि पोपट पाळू नका.

9. मुंग डाळ रात्री भिजवून सकाळी जनावरांना खाऊ घाला.

10. तांदूळ किंवा दुध मंदीर किंवा धार्मिक स्थळावर दान करा.

11. कावळ्याला जेऊ घाला.

-ज्योतिषमित्र मिलिंद

For any query or Astrological guidance feel free to contact on 7058115947 (whatsapp)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in