दोन शब्द

नमस्कार,

बरेच दिवसांपासून लोकांच्या आग्रह व वधुवर सूचक केंद्राचा २००७ पासून चा शेकडो स्थळांचा विवाह जुळणे, ज्योतिष मार्गदर्शन, समुपदेशन, इव्हेंट, वेळोवेळी प्रसिद्ध झालेले लेख ई. चा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असल्याने आजच्या पिढीला उपयुक्त असणारी ऑनलाईन वधुवर सेवा सुरू करावी. पण ज्योतिष सेवेचा वाढलेला व्याप व इतर गोष्टींमधून वेगळा वेळ काढणे अवघड होते. तरीही सुरुवात केल्याशिवाय कोणतेच कार्य रूप घेत नाही या विचाराने प्रत्यक्ष कामास सुरुवात केली आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व सहकार्य कायम असेल ही खात्री आहे.
ह्या उपक्रमाव्दारे जास्तीत जास्त लोकांना लाभ व्हावा हीच मनोकामना.

  • पेटकर काका (वधू – वर वाले काका)